Join us  

मुलं ‘या’ ४ वाईट सवयी चटकन शिकतात, आईबाबा वेळीच लक्ष द्या-गोष्टी जातील हाताबाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2024 6:31 PM

Bad Habits Your Child May Easily Pick Up From You : मुलांनी केलेल्या 'या' गोष्टी अजिबात दुर्लक्ष करू नका; कारण

लहान मुलं ही पाण्यासारखी असतात (Parenting Tips). पाणी जसे कोणत्याही भांड्यात किंवा कोणत्याही गोष्टी मिसळते. त्याचप्रमाणे मुळे देखील इतरांच्या सवयी आत्मसात करतात (Parenting). लहान वयात मुलांना योग्य-अयोग्य हे समजत नाही, त्यामुळे कोणत्या सवयी लावाव्यात आणि कोणत्या नाही हे समजत नाही (Child Care).

लहान मुलं चांगल्या सवयींपेक्षा वाईट सवयी लवकर घेतात. वाईट सवयींपासून मुलांना दूर कसं ठेवावं? असा प्रश्न नक्कीच तुमच्याही मनात आला असेल. मुलांना वाढत्या वयात कोणत्या चांगल्या गोष्टी शिकवाव्यात? कोणत्या सवयींपासून लांब ठेवावं? मुलांना नक्की कोणत्या वाईट सवयी लवकर लागतात? पाहूयात(Bad Habits Your Child May Easily Pick Up From You).

मुलांना कोणत्या वाईट सवयी लवकर लागतात?

बहाणा करणे

काहींना होत असलेलं काम काम पुढे ढकलण्याची सवय लागते. या सवयीमुळे ते प्रत्येक काम पुढे ढकलत राहतात. शाळेचे गृहपाठ असो किंवा स्वतःची काही कामे करणे. ही काम करताना ते बहाणा देतात. किंवा ही कामं पुढे ढकलतात. पालकांनी ही सवयी मुलांना लागणार नाही याची काळजी घ्यावी.

बेसनाचे करा तोंडात विरघळणारे लाडू; ना फसतील ना कडक होतील; पौष्टीक लाडवाची पाहा रेसिपी

गॉसिपिंग

मुलं एकदा गॉसिपिंग करायला लागले की त्यांना याची सवय लागते. मुलांना गॉसिपिंग करायला खूप मज्जा येते. या सवयीमुळे कळत नकळत ते आपल्या मित्रांना किंवा इतरांना दुखवतात. आपापसात भांडणं होतात. जे योग्य नाही. मुलं जर गॉसिपिंग करत असतील तर, वेळीच ही सवय मुलांची मोडा.

नखे चावणे

लहानपणी लागलेली ही सवय मोठे होईपर्यंत आपल्यासोबत राहते. नखे चावणे ही एक वाईट सवय आहे. मुलं नखं खाताना दिसत असतील तर, त्यांना वेळीच ओरडून सवय मोडण्याचा प्रयत्न करा. जर मुलांची नखे घाणेरडे असतील तर, त्यातील घाण पोटात जाऊ शकते. ज्यामुळे मुलं आजारी पडू शकतात.

ऐश्वर्या राय म्हातारपणी कशी दिसेल? व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल; कुठून आला हा व्हिडिओ

खोटे बोलणे

मुलांना खोटं बोलण्याची सवय लवकर लागते. आणि मुलं खोटं बोलायला लागली तर, ते छोट्या मोठ्या गोष्टी लपवण्यासाठीही खोटं बोलतात. त्यामुळे पालकांनी मुलांकडे लक्ष द्यायला हवे, आणि त्यांना खोटं बोलण्याचे तोटे समजावून सांगा. आपले मुल आपल्यासोबत खोटे का बोलत आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न करा, आणि त्यावर शिकवण द्या. 

टॅग्स :पालकत्वसोशल व्हायरल