Lokmat Sakhi >Parenting > आई होणं सोपं नाही, पण त्यासारखा आनंदही नाही! गिरिजा सांगते, तिचा पालकत्वाचा प्रवास!

आई होणं सोपं नाही, पण त्यासारखा आनंदही नाही! गिरिजा सांगते, तिचा पालकत्वाचा प्रवास!

Girija Oak Goadbole motherhood: Girija Oak parenting journey: Motherhood is not easy quote: Real talk on parenting: मूल कोणत्या वयात झालेलं बरं, त्यानं आयुष्य कसं बदलतं याची गोष्ट सांगतेय अभिनेत्री गिरिजा ओक गोडबोले.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2025 15:36 IST2025-04-09T10:43:40+5:302025-04-10T15:36:11+5:30

Girija Oak Goadbole motherhood: Girija Oak parenting journey: Motherhood is not easy quote: Real talk on parenting: मूल कोणत्या वयात झालेलं बरं, त्यानं आयुष्य कसं बदलतं याची गोष्ट सांगतेय अभिनेत्री गिरिजा ओक गोडबोले.

Being a mother is not easy, but neither is it a joy Girija oak goadbole shares her journey of parenthood | आई होणं सोपं नाही, पण त्यासारखा आनंदही नाही! गिरिजा सांगते, तिचा पालकत्वाचा प्रवास!

आई होणं सोपं नाही, पण त्यासारखा आनंदही नाही! गिरिजा सांगते, तिचा पालकत्वाचा प्रवास!

आई होणं सोपं नाही. मातृत्वाचा हा प्रवास जितका सुखद- आनंदी असतो तितकाच खडतर. आई होणार हे कळल्यापासून आई झाल्यानंतर कोणतीही गोष्टी करताना डोक्यात आधी विचार येतो तो आपल्या बाळाचा. (Girija Oak Goadbole motherhood) कोणत्याही संस्कृतीत लग्न झाल्यानंतर मुलीचं संपूर्ण आयुष्य बदलतं. अगदी चूल आणि मूल सांभाळण्याचा काळ सध्या नसला तरीही आईच्या वाटेला येणारे परिश्रम कायमच. मात्र लग्न झाल्यानंतर जितका बदल स्त्रियांच्या आयुष्यात होत नाही तितका बदल आई झाल्यानंतर होतो. (Girija Oak parenting journey) आपण जे काही करु ते आपल्यासोबत आपल्या मुलांच्या मनावरही थेट परिणाम करणारं असतं. (Honest motherhood experiences) कोणताही निर्णय घेताना आईच्या डोक्यात सगळ्यात आधी येतं ते आपलं बाळ. आईपण आणि आई झाल्यानंतरचं आयुष्य कसं बदलत जातं हे सांगताना अभिनेत्री गिरिजा ओक गोडबोले सांगते आई होण्याचं योग्य वय कोणतं, मूल जन्माला घालताना काय विचार करायला हवा? (Balancing career and parenting)

अनुष्का शर्मा सांगते, मी रोज लेकीसोबत सायंकाळी साडेपाच वाजताच जेवते, रात्री काही खात नाही कारण...
 
गिरीजा गोडबोले ही मराठी सिनेसृष्टीतील सुंदर, सोज्वळ अभिनेत्री. तिने अनेक मालिका आणि चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. एका मुलाखती दरम्यान तिला तिच्या मातृत्वाचा प्रवास विचारण्यात आला. तिने सांगितलं की, आई झाल्यानंतर आयुष्य खूप बदललं आहे. रोजच्या गोष्टींसह माझ्या कामात देखील खूप फरक पडला आहे. असं सांगितलं जातं 'आईच्या आयुष्यातील सगळ्यात आनंदाचा क्षण हा असतो जेव्हा आपण पहिल्यांदा आपल्या बाळाला पाहातो.' पण माझ्या बाळाला पाहिल्यानंतर मला अशी कोणतीच भावना उमगली नाही. पंचविसाव्या वर्षी आई झाल्यानंतर जन्मलेल्या बाळासोबत बॉण्ड तयार करणं खूप गरजेचं होतं. मी माझ्या मुलासाठी एक चांगली आई बनू शकते का? हे देखील मला माहित नव्हतं. आई झाल्यानंतर मनातील अनेक भावना बदलल्या, बाळाशिवाय दुसरं काहीच सुचत नाही.

">

मला असं वाटतं की, मूल हवं असं वाटत असेल तर तो निर्णय लवकर घेतलेला बरा. एरव्ही आपल्याला फोन बदल्यानंतर त्रास होतो ना तसा 'लाईफस्टाल' बदल्यानंतर देखील त्रास होतो. माझ्या मैत्रिणींच्या बॅचलेटर पार्टीसाठी गोव्याला गेले होते, तेव्हा मी माझ्या सात महिन्याच्या मुलाला आऊटिंगसाठी घेऊन गेले. तो सतत 'बेबी कॅरिअर'मध्ये माझ्यासोबत असायचा. मी वाटेल तिथे मैत्रिणीसोबत फिरले आहे, त्याच्यासोबत नाटकाचे प्रयोग केले आहे. नाटकाच्या प्रयोगामधून वेळ काढून मी त्याला दूध पाजायचे, त्याच्यासोबत खेळायचे. करिअर आणि पालकत्व  यांचा ताळमेळ राखणं किती अवघड असतं हे ही मला समजलं. मूल जन्माला घालण्यासाठी योग्य वय नसतं. परंतु, हार्मोन्स बदलणाऱ्या काळात या सगळ्या गोष्टी झाल्यातर बरं असं मला वाटतं. 


आई झाल्यानंतर बाळाला नाटकाच्या प्रयोगात, चित्रपटाच्या शुटिंगसाठी सोबत घेऊन जाणं त्रासदायक होतं. एकाच वेळी शुटिंग आणि बाळाला सांभाळणं, आपण जे काही करत आहोत ते चूक आहे की, बरोबर हे देखील आपल्याला समजत नाही. पण आई होण्याचा हा अनुभव सुंदर असतो. जसं जसे मूल मोठं होऊ लागते तसं तसे आई म्हणून आपण आपल्या भूमिका व्यवस्थित पार पाडतो आणि त्यानुसार बाळ देखील आपल्या कामाला समजून घेतं.


 

Web Title: Being a mother is not easy, but neither is it a joy Girija oak goadbole shares her journey of parenthood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.