मुलांची शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक वाढ व्हावी यासाठी त्यांच्या आहारात सर्व गोष्टींचा योग्य प्रमाणात समावेश असणे अतिशय आवश्यक असते. म्हणूनच चांगले पोषण मिळावे यासाठी आपण त्यांना दूध प्यायला द्या, वेगवेगळ्या पदार्थांमधून भाज्या द्या, प्रोटीन्स मिळतील यासाठी अंडी, पनीर, डाळी असं सगळं देतो. सुकामेवा, फळं असं सगळं वेळच्या वेळी नीट देऊनही अनेकदा त्यांची वजन, उंची वाढतच नाही. दुसरीकडे मूल इतकं बारीक का म्हणून घरच्यांचे आणि मित्रमंडळींचे टोमणेही ऐकावे लागतात. तर कधी मुलांचे पाय खूप दुखतात, दातांच्या तक्रारी उद्भवतात. अशावेळी मुलांना शेवग्याचे सूप देणे अतिशय फायदेशीर ठरते असे डॉ. पवन मांडविया यांचे म्हणणे आहे. यामुळे मुलांच्या वाढीत महिन्याभरात उत्तम फरक दिसून येतो याची कारणं आणि हे सूप करण्याची रेसिपी पाहूया (benefits of moringa soup for children)...
शेवगा खाण्याचे फायदे
१. हाडे आणि दात बळकट होण्यास मदत
२. पायदुखी कमी होते.
३. प्रतिकारशक्ती वाढते.
४. मेंदूचा विकास होण्यास उपयुक्त
५. उंची आणि वजन वाढण्यासाठी फायदेशीर
पाहा शेवग्यातून किती पोषण मिळते..
1. यामध्ये दुधाहून 17 पट जास्त कॅल्शिअम असते
2. पालकाहून 25 पट जास्त लोह
3. अंड्याहून 30 पट जास्त मॅग्नेशियम
4. केळ्याहून 15 पट जास्त पोटॅशियम
5. संत्र्याहून 7 पट जास्त व्हिटॅमिन सी
6. दाण्याहून 50 पट जास्त व्हिटॅमिन बी असते
हे सूप कसे करायचे ?
1. कुकरमध्ये शेवग्याचे तुकडे, कांदयाच्या आणि टोमॅटोच्या फोडी घ्यायच्या.
2. यामध्ये लसूण, मीठ, जीरे पावडर, हळद घालावी.
3. यामध्ये भिजवलेली मूगाची डाळ घालून २ कप पाणी घालावे.
4. कुकरच्या २ शिट्ट्या काढून गॅस बंद करावा.
5. कुकरचे झाकण पडल्यानंतर हे सगळे चांगले मॅश करायचे.
6. मग हे मिश्रण गाळणीने चांगले गाळून घ्यायचे.