Lokmat Sakhi >Parenting > Benefits of Shankha Mudra: आत्मविश्वास कमी, मुलं बोलतातही अडखळतच? रोज करायला हवी शंख मुद्रा, पाहा 5 फायदे

Benefits of Shankha Mudra: आत्मविश्वास कमी, मुलं बोलतातही अडखळतच? रोज करायला हवी शंख मुद्रा, पाहा 5 फायदे

Yoga for Children: मुलांमध्ये असणारे अनेक दोष कमी करून त्यांचा आत्मविश्वास, एकाग्रता वाढविण्यासाठी तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढवून त्यांना शारीरिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी शंख मुद्रा (Benefits of Shankha Mudra) अतिशय उपयुक्त ठरते.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2022 03:50 PM2022-04-14T15:50:11+5:302022-04-14T15:51:13+5:30

Yoga for Children: मुलांमध्ये असणारे अनेक दोष कमी करून त्यांचा आत्मविश्वास, एकाग्रता वाढविण्यासाठी तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढवून त्यांना शारीरिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी शंख मुद्रा (Benefits of Shankha Mudra) अतिशय उपयुक्त ठरते.

Benefits of Shankha Mudra: Do regular Shankha Mudra for the better academics and mental growth of your child | Benefits of Shankha Mudra: आत्मविश्वास कमी, मुलं बोलतातही अडखळतच? रोज करायला हवी शंख मुद्रा, पाहा 5 फायदे

Benefits of Shankha Mudra: आत्मविश्वास कमी, मुलं बोलतातही अडखळतच? रोज करायला हवी शंख मुद्रा, पाहा 5 फायदे

Highlightsलहान मुलांनी तसेच मोठ्या माणसांनीही शंखमुद्रा का केली पाहिजे, त्यामुळे शरीराला काय नेमके फायदे होतात, याविषयीची सविस्तर माहिती...

काही मुलं अतिचंचल असतात, तर काही मुलं खूपच शांत असतात. काही मुलांना चारचौघांसमोर बोलण्याची खूपच लाज वाटते. घरी अनोळखी नातेवाईक आले तरी ते बावरून जातात. आपल्याच घरात शांत बसतात.. लाजऱ्या स्वभावामुळे काही जणांना मित्रमैत्रिणीच नसतात. काही मुलांना अडखळत बोलण्याची (speech defect) सवय असते. काही मुलं वारंवार आजारी पडतात कारण त्यांची रोगप्रतिकारक शक्ती (low immunity) खूपच कमी असते. काही मुलांना शिकवलेलं पटकन समजत नाही, कारण त्यांची एकाग्रताच नसते.. मुलांबाबत असणाऱ्या अशा अनेक अडचणींवरचा उत्तम उपाय म्हणजे शंख मुद्रा. (benefits of Shankha Mudra for adults)

 

योग शास्त्रानुसार अशा काही मुद्रा, प्राणायाम किंवा आसन असतात जे केल्यामुळे शरीरातील विशिष्ट नाडी, चक्र यांच्यावर परिणाम होत जातो आणि त्यातून आपल्यातले अनेक शारिरीक, मानसिक दोष कमी होत जातात. योग शास्त्रामध्ये हस्त मुद्रांचेही विविध प्रकार सांगितले आहेत. यापैकी लहान मुलांच्या प्रगतीसाठी उत्तम मानल्या गेलेल्या मुद्रांपैकी एक म्हणजे शंखमुद्रा. लहान मुलांनी तसेच मोठ्या माणसांनीही शंखमुद्रा का केली पाहिजे, त्यामुळे शरीराला काय नेमके फायदे होतात, याविषयीची सविस्तर माहिती theyoginiworld या पेजवर शेअर करण्यात आली आहे..

 

कशी करायची शंखमुद्रा?
- शंखमुद्रा करण्यासाठी दोन्ही हातांचे तळवे तुमच्या समोरच्या दिशेला असावेत.
- यानंतर डावा तळवा थोडा आडवा करा. डाव्या हाताचा अंगठा जिथे संपतो तिथे उजव्या हाताचा अंगठा ठेवा. असे करताना उजव्या हाताचा तळवा तुमच्या दिशेने असावा.
- आता डाव्या हाताची अंगठ्या व्यतिरिक्त इतर बोटे उजव्या अंगठ्याभोवती लपेटून घ्या. 
- उजव्या हाताची बोटे डाव्या हाताच्या बोटांवर ठेवा. असे करताना डाव्या हाताच्या अंगठ्याचे वरचे टोक आणि उजव्या हाताच्या मधल्या बोटाचे वरचे टोक एकमेकांना जोडले जावे. 
- या स्थितीला शंखमुद्रा म्हणतात. कारण या स्थितीत तुमच्या हाताचा आकार एखाद्या शंखाप्रमाणे झालेला दिसतो. शंखमुद्रा करून हात त्याच अवस्थेत आपल्या छातीजवळ ठेवावे. 
- दिवसभरातून ४ ते ५ मिनिटे शंखमुद्रा करावी. मुले खेळताना, टिव्ही पाहताना, वाचताना कधीही शंखमुद्रा करू शकतात. 

 

शंखमुद्रा करण्याचे फायदे
- उंची छान वाढते
- मन एकाग्र होऊन अभ्यासात प्रगती होते.
- चालण्या- बोलण्यात आत्मविश्वास येतो.
- अडखळत बोलण्याचे प्रमाण कमी होते.
- रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

 

मोठ्यांनीही केली पाहिजे शंखमुद्रा... कारण....
- रोगप्रतिकारक शक्ती वाढते
- आत्मविश्वास वाढतो
- थायरॉईड संदर्भातील समस्यांसाठी उपयुक्त
- आवाजाची गुणवत्ता सुधारते
- शांत झोप येते. त्यामुळे निद्रानाशाचा त्रास असणाऱ्यांसाठी फायदेशीर 

 

Web Title: Benefits of Shankha Mudra: Do regular Shankha Mudra for the better academics and mental growth of your child

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.