Join us  

मुलांची तब्येत बिघडू नये म्हणून आईबाबांनी काय करावं? बी. के. शिवानीचा यांचा खास सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 03, 2024 9:33 PM

Bk Shivani Important Tips For Indian Mothers : पौष्टीक आणि संतुलित आहार घ्यायला हवा. व्हिटामीन, मिनरल्स आणि पोषक तत्वांची आवश्यकता पूर्ण  करता येते.

आपल्या मुलांवर चांगले संस्कार व्हावेत असं प्रत्येकाला वाटतं.  यासाठी लोक वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब करतात. मुलांसमोर कसं वागायचं, काय बोलायचं याची एक पद्धत असते. (Parenting Tips in Marathi) मुलांचे मित्र बनून राहायला हवं मुलांचे चांगले पालन पोषण करण्यसाठी घरी वेळच्यावेळी खायला हवं. मोटिव्हेशल स्पीकर शिवानी यांनी याबाबत आपलं मत व्यक्त केलं आहे.  (Bk Shivani Important Tips For Indian Mothers)

स्कूलदेखो.ऑर्गमध्ये प्रकाशित झालेल्या रिपोर्टनुसार घरी स्वंयपाक करताना आई वडीलांनी  क्वालिटी आणि क्वांटिटीकडे लक्ष द्यायला हवं. पौष्टीक आणि संतुलित आहार घ्यायला हवा. व्हिटामीन, मिनरल्स आणि पोषक तत्वांची आवश्यकता पूर्ण  करता येते. मुलांचा विकास आणि डेव्हलपमेंटसाठी मदत होते. (Parenting Tips)

१) मुलांमध्ये चांगल्या सवयी

नॉर्थ शोर पीडियाट्रिक थेरेपीनुसार  घरात बनवलेलं  जेवण खाल्ल्याने मुलांना खाण्यापिण्याशी संबंधित काही  चांगल्या सवयी लागतात.  जेव्हा तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी स्वंयपाक बनवता तेव्हा त्यात काही हेल्दी पदार्थांचा समावेश करा. तुम्ही तुमच्या मुलांनाही आवडीनिवडी विचारू शकता. सध्याच्या स्थितीत हेल्दी इंग्रेडीएंटकडे लक्ष द्यायला हवं. मुलांना हेल्दी इटींगबाबत काही गोष्टी समजावून सांगायला हव्यात.

कंबर दुखते-हाडं ठणकतात; ICMR सांगते १० रूपयांत कॅल्शियम देणारे ५ पदार्थ खा, हाडं बळकट होतील

२) फॅमिली बॉन्ड

कुटुंबासोबत मिळून स्वंयपाक बनवल्याने आणि खाल्ल्याने नाती मजबूत होतात. यामुळे कम्यूनिकेशन चांगले राहते. मुलं जेवण बनवताना हूशार होतात आणि प्रशंसा करणारे गुण त्यांच्यात विकसित होतात. नात्यांमध्ये मजबूती येते आणि पॉझिटिव्ह फूड कल्चर वाढते.

पोट कमी करायचंय, पण जीम नको? रोज सकाळी 'या' वेळेत वॉक करा, झरझर कमी होईल वजन 

३) आईच्या हातचे जेवण

आईच्या हातची चव मुलांना नेहमीच जाणवते. आईच्या हाताच्या हाताच्या चवीने मन आणि पोट दोन्ही भरते. मुलांमध्ये प्रेम वाढते आणि मन, पोट दोन्ही तृप्त होते.  घरी जेवण बनवल्याने इतर कौशल्य विकसित होण्यास मदत होते. यामुळे मुलं आत्मनिर्भर होतात आणि जेवण करण्याची आवड येते. मनही चांगले राहते. 

टॅग्स :पालकत्व