जेव्हा आपली मुलं लहान असतात तेव्हा प्रत्येक गोष्ट येऊन सांगतात. पण मुलं जेव्हा मोठी होतात तेव्हा याचं उलंट होऊ लागतं. आई वडील मुलांच्या मागे धावतात पण अनेकदा मुलं आई वडीलांना खोटं सांगतात. (Parenting Tips) जेव्हा मुलं मोठी होतात तेव्हा आपलं म्हणणं मुलांशी शेअर करतात तेव्हा मुलं हे व्यवस्थित स्विकार करू शकत नाहीत. मुलांच्या वागण्यातील बदल पालकांना स्विकरता येत नाही. मुलांना आई वडीलांपेक्षा मित्र मैत्रिणी जास्त जवळचे वाटतात. (Talk By BK Shivani Parenting Tips)
उदाहरण देऊन समजवा
बी. के शिवानी सांगतात की आपली मुलं मोठी झाल्यानंतर शाळेत जाऊन सांगतात की, आई मी आज शाळेत न जाता मित्रमैत्रिणींसोबत चित्रपट पाहायला गेलो होते, मूल तुम्हाला प्रामाणिकपणे त्याने जे काही केले आहे ते सांगत असेल तर त्याला आधी काय चुकीचे काय बरोबर ते समजावून सांगा, मुलांना ओरडण्याआधी त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करा.
वरण-भातावर 'हा' पदार्थ घालून खा; रोजचं साधं वरण होईल अमृतासमान, थकवा-कमजोरी होईल दूर
रिजेक्शन
पुढे त्या सांगतात की मुलांचे कौतुक न होता त्यांना सतत रिजेक्शन मिळत असेल आणि सतत हेच होत असेल तर मुलं तुम्हाला हळूहळू काही गोष्टी सांगणं बंद करतील. तुम्हाला वाटेल की त्यांनी ते काम करणं बंद केलं आहे. खरं तर असं आहे की त्यांनी तुम्हाला काही गोष्टी सांगणंच बंद केलं आहे.
मुलं योग्य आहेत का ते पाहा
मुलाचं मन अभ्यास सोडून चित्रपट पाहणं, बंक करणं या गोष्टींमध्ये लागत असेल तर यात काहीच वाईट नाही. मुलांना जे काही वाटतं ते वर्गातील इतर मुलांना पाहून वाटतं त्यामुळे मुलांना ओरडणं आधी बंद करा. त्यांना समजून घेऊन नंतर रिएक्ट करा.
तुमच्यासाठी योग्य नाही ते करू नका
मुलांना सांगा की तुम्ही जे काही विचार करत आहात किंवा जी फिलिंग तुमच्या मनात येत आहे ती मुलांसाठी चूक किंवा बरोबर जे काही असेल. मुलांसाठी काय चूक काय बरोबर हे समजून घेता यायला हवं. तुम्ही मुलांना सांगू शकता की तुम्ही चुकीचे आहात. तुम्ही हे काय केले, लोक पालकांना म्हणतील तुम्ही असे संस्कार दिले का, मुलं तुमच्यापासून दूर जातील आणि तुम्ही काही करू शकणार नाही. आजकालच्या वातावरणात मुलांना प्रोटेक्ट करण्यासाठी त्यांच्याशी तसं नातं बनवायला हवं.