Lokmat Sakhi >Parenting > अमेरिकेतून भारतात परतल्यावर वाटलं, आपल्याच घरात मुलांसाठी बुक क्लब सुरु करावा!

अमेरिकेतून भारतात परतल्यावर वाटलं, आपल्याच घरात मुलांसाठी बुक क्लब सुरु करावा!

आपली लेक तर वाचतेच, पण तिच्या वयाच्या अनेक मुलांसाठी तिच्यासोबत एक पुस्तक उपक्रम सुरु करावा असं वाटून एका आईनं सुरु केलेल्या उपक्रमाची गोष्ट.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2022 05:23 PM2022-03-17T17:23:55+5:302022-03-17T17:27:18+5:30

आपली लेक तर वाचतेच, पण तिच्या वयाच्या अनेक मुलांसाठी तिच्यासोबत एक पुस्तक उपक्रम सुरु करावा असं वाटून एका आईनं सुरु केलेल्या उपक्रमाची गोष्ट.

“Bond Over Books by BuffBrainery” , story of a book club for kids, an initiative by mother and daughter. | अमेरिकेतून भारतात परतल्यावर वाटलं, आपल्याच घरात मुलांसाठी बुक क्लब सुरु करावा!

अमेरिकेतून भारतात परतल्यावर वाटलं, आपल्याच घरात मुलांसाठी बुक क्लब सुरु करावा!

Highlights(छायाचित्रं : प्रातिनिधिक)

प्राची देशमुख

वाचनाने माणूस घडतो असं म्हणतात. वाचनाचे फायदे आपल्या संगळ्यानाच माहीत आहेत. वाचनामुळे पर्सनॅलिटी डेव्हलपमेण्टला तर मदत होतेच पण वाचनाचा स्मरणशक्ती आणि फोकस इम्प्रूव्हमेण्टसाठीही खूप उपयोग होतो. पालक म्हणून मुलांनी वाचावं असं सगळ्यांनाच वाटतं, मुलं वाचत नाहीत अशी तक्रारही असते. प्रश्न असतो तो पालक वाचतात का आणि मुलं आईबाबांना वाचताना पाहतात का? मुलांनी वाचावं म्हणून पालक म्हणून आपण काय प्रयत्न करु शकतो? त्या प्रश्नाचं उत्तर मी माझ्यापरीने शोधत एका अनोख्या बुक क्लबची सुरुवात केली आहे.
मला लहानपणापासूनच वाचनाची आवड होती. माझी आई आणि दोन्ही मामा यांनी वाचनाची गोडी लावली आणि विविध पुस्तके उपलब्ध करून देत ही आवड जोपासली. माझ्या लहानपणी वाचनाचे वातावरण सगळीकडेच होते. कोणी किती आणि कोणती पुस्तके वाचली आहेत यावरून आम्हा मित्रमैत्रिणींमध्ये नेहेमीच चढाओढ असे. माझ्या वाचनाच्या आवडीचा मला माझ्या वक्तृत्व स्पर्धा, काव्य लेखन ह्यासाठी खूप उपयोग झाला.

(Image : Google)

लग्नानंतर मी जेंव्हा अमेरिकेला शिफ्ट झाले तेंव्हा अमेरिकेतील शाळा आणि विद्यापीठांमधून वाचनाला असलेले अनन्यसाधारण महत्व बघून मी खूपच अचंबित होते. माझी मुलगी जेंव्हा ४ वर्षांची होती त्या वयापासूनच स्थानिक वाचनालयांमध्ये तिच्यासाठी वाचनाशी निगडीत बरेच उपक्रम उपलब्ध होते. शाळेतून पण वाचनाची गोडी लागावी म्हणून विशेष प्रयत्न केले जात होते. ह्या सगळ्या उपक्रमांमुळे, पुस्तकांच्या मुबलक उपलब्धतेमुळे आणि घरातील प्रोत्साहनामुळे माझ्या मुलीला वाचनाची आवड निर्माण झाली. तिला वाचनाच्या आवडीमुळे, लेखनाची आणि काव्यलेखनाची आवड निर्माण झाली. तसेच तिच्या वेल राऊण्डेड डेव्हलपमेण्टसाठी वाचनाची नक्कीच मदत होत आहे.
आम्ही २०२१ मध्ये भारतात नाशिकमध्ये स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. जसा पुस्तके आणि वाचनालय यांचा शोध सुरू केला तसं हळूहळू लक्षात आलं की मोस्टली मराठी कादंबऱ्या उपलब्ध आहेत आणि बाल साहित्याची आणि इंग्रजी साहित्याची बरीच वानवा आहे. आमच्याकडे मागच्या काही वर्षांमध्ये विविध पुस्तकांचा बराच खजिना जमलेला होताच. तेंव्हा एक अनोखा प्रयोग करावासा वाटला आणि त्यातूनच “Bond Over Books by BuffBrainery” ची कल्पना साकार झाली आहे.
हा उपक्रम अतिशय सोपा पण इंटरेस्टिंग आहे. आठवड्यातून एक दिवस एक तास आमच्या छोट्या पण वैविध्यपूर्ण लायब्ररीमध्ये येऊन मुलं  कोणतेही पुस्तक/पुस्तके वाचू शकता. आणि दर महिन्याला आम्ही एक बुक टॉक आयोजित करु. त्यामाध्यमाने वाचकांना त्यांनी वाचलेल्या पुस्तकांबद्दल मत व्यक्त करायला एक व्यासपीठ उपलब्ध होईल. ह्याच उपक्रमाद्वारे छोट्या वाचकांसाठी विविध आकर्षक उपक्रमही राबवले जातील.
ह्या उपक्रमाद्वारे वाचन चळवळीला आमचा एक छोटासा हातभार लागावा हीच एक प्रांजळ इच्छा आहे. 
माझी मुलगी आता भरपूर वाचते. तिनं बारा-तेरा वर्षांचीच असताना पुस्तकही लिहिलं आहे. 
वाचन म्हणजे काय ते तिच्याच  भाषेत सांगायचं झालं तर “Books are the seed of a plant that grows into endless imagination. They are nourishment for the soul, and with their many genres, like fantasy and nonfiction, they inspire wonder. Unlike other forms of entertainment, like TV or video games, books force you to create pictures in your mind instead of having them in front of you. Think of going to the gym and lifting a dumbbell. You exercise your arms and your back. Just like this, reading books exercises your brain.”

Web Title: “Bond Over Books by BuffBrainery” , story of a book club for kids, an initiative by mother and daughter.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.