Lokmat Sakhi >Parenting > मुलगे वयात येतात तेव्हा काय होतं? वयात येणारी मुलं चोरुनलपून माहिती मिळवतात कारण..

मुलगे वयात येतात तेव्हा काय होतं? वयात येणारी मुलं चोरुनलपून माहिती मिळवतात कारण..

वयात येणाऱ्या मुलींशी पालक बोलतात पण मुलांचं काय, त्यांना शास्त्रीय माहिती कुणीच का देत नाही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2024 04:26 PM2024-04-29T16:26:12+5:302024-04-29T17:06:19+5:30

वयात येणाऱ्या मुलींशी पालक बोलतात पण मुलांचं काय, त्यांना शास्त्रीय माहिती कुणीच का देत नाही?

boys and puberty, physical and mental changes, what parents should tell the boys, how to deal with puberty changes in boys? | मुलगे वयात येतात तेव्हा काय होतं? वयात येणारी मुलं चोरुनलपून माहिती मिळवतात कारण..

मुलगे वयात येतात तेव्हा काय होतं? वयात येणारी मुलं चोरुनलपून माहिती मिळवतात कारण..

Highlightsबहुतेक पालकांकडे उत्तरं नसतात.

' मला पाळी का येते?' असा प्रश्न श्रावणीने तिला नियमित पाळी सुरु झाल्यानंतर आईला विचारला होता. आईने तिला जेवढं माहिती होतं त्या आधारावर श्रावणीला उत्तर देण्याचा प्रयत्न केला होता. पण वैभवही खरंतर वाढीच्या वयातलाच आहे. त्याच्यातही बदल होतच आहेत. पण तो कधीच आपल्याला किंवा त्याच्या बाबाला या बदलांबद्दल विचारत नाहीत. त्याला प्रश्न पडत नसतील का? आणि समजा पडलेच प्रश्न आणि विचारलं आपल्याला तर आपल्याला काय सांगता येणार आहे? या विषयावर वैभवशी बोलताना कसं वाटेल? असा विचार अलकाच्या मनात कायम यायचा. अलकासारख्या अशा अनेक आया असतील ज्यांना खरोखर वाढीच्या वयातल्या मुलांनी आपल्या शरीरात हे काय होतं? असं विचारलं तर मुलांना काय सांगावं? असा प्रश्न पडतो.

श्रावणीसारख्या वाढीच्या वयातल्या मुलींना जसे प्रश्न असतात तसेच प्रश्न वैभवसारख्या मुलांनाही नक्की असतात. फक्त त्यांना ते कोणाला विचारायचे हे कळत नाही. बहुतांश पालकांना वाटतं की मुलींना त्यांच्या शरीराबद्दल बोलायला संकोच वाटतो. मुलं तर काय एकदम बिनधास्त असतात. मोकळी ढाकळी असतात ते काहीही बोलू शकतात, विचारु शकतात. पण प्रत्यक्षात तसं नसतं. वाढत्या वयातली मुलंही बुजरी होतात. आपल्या शरीर-मनात-विचारात होणाऱ्या बदलांमुळे गोंधळतात. शरीरात जे बदल होत आहेत ते फक्त आपल्याच बाबतीत होताय का? आपल्याला काही झालं तर नाही ना? असे प्रश्न त्यांना पडतात. आणि म्हणूनच वाढीच्या वयातल्या मुलांना त्यांच्या शरीरातील बदलांविषयी, त्यामागच्या कारणांविषयी अवगत करणं फार महत्त्वाच आहे. 
काही पालक हे करु शकतात. तर बहुतेक पालकांकडे याची उत्तरं नसतात. जे वैभवच्या बाबतीत झालं.

(Image :google)

शरीर मनातल्या बदलांबाबत १० प्रश्न

वाढीच्या वयात शरीर मनात होणारे बदल हे सगळ्या मुलांच्या बाबतीत होतात हे मुलांना सांगण्यासाठी डाॅक्टरांनी मुलांना १० प्रश्न विचारले. या प्रश्नाला हो किंवा नाही एवढंच उत्तर मुलांना द्यायचं होतं.
१. उंची वाढली का?
२. काखेत, जांघेत, केस यायला लागले का?
३. ओठांवर बारीक केस म्हणजे लवा दिसायला लागली का?
४. चेहरा तेलकट होवून चेहेऱ्यावर पिंपल्स यायला लागले का?
५. दोन पायांच्या मध्ये असलेल्या नळीसारख्या लिंगाची लांबी आणि घेर वाढला का?

६. लिंगामागच्या अंडाशयाची पिशवी आकाराने मोठी आणि गडद झाली का?
७. डोक्यात काहीतरी विचार येतात आणि लिंग ताठर होतं असं कधी होतं का?
८. ताठर झालेलं आपलं लिंग कोणाच्या लक्षात तर येणार नाही ना? या विचाराने ओशाळल्यासारखं होतं का?
९. रात्रीच्या वेळी कधी कधी लिंगातून पांढरट द्रव बाहेर येतो का?
१०. पूर्वी ज्या मैत्रिणींसोबत दंगा करायचो आता त्यांच्याशीच बोलताना ऑकवर्ड होतं का?
डाॅक्टरांनी विचारलेल्या या दहाही प्रश्नांना सर्व मुलांनी हो असं उत्तर दिलं. यापुढे जावून डाॅक्टरांनी हे असं का होतं? हे समजावून सांगितलं.

(Image :google)

मुलग्यांच्या बाबतीत हे असं का होतं?

१. पुरुष जननसंस्थेचं काम पुरुष बीज तयार करणं हे असतं. मेंदूतल्या ग्रंथीतून पाझरणाऱ्या हार्मोन्सचा परिणाम जननेद्रियांवर होतो. त्यामुळे हे बदल शरीरात दिसतात.
२. अंडाशयात टेस्टोस्टेराॅन तयार व्हायला लागतं. त्याचा परिणाम म्हणून शुक्राणू किंवा पुरुषबीज (स्पर्म्स) तयार होतात. ते मधून मधून बाहेर टाकले जातात.
३. वाढीच्या वयातल्या मुलग्यांशी पालक बोलू शकतात. शास्त्रीय माहिती देण्याचा प्रयत्न तर करा.

वाढीच्या वयातल्या मुलांच्या बदलणाऱ्या शरीर मनाविषयी वाचा 
https://urjaa.online/physical-and-mental-development-in-adolescent-boys-how-parents-can-communicate-with-boys-about-their-puberty/
 

Web Title: boys and puberty, physical and mental changes, what parents should tell the boys, how to deal with puberty changes in boys?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.