Lokmat Sakhi >Parenting > मुलांना ३ खेळ शिकवा, एकाग्रता वाढेल- डोकं होईल सुपीक आणि मोबाइलचं वेडही होईल कमी 

मुलांना ३ खेळ शिकवा, एकाग्रता वाढेल- डोकं होईल सुपीक आणि मोबाइलचं वेडही होईल कमी 

Memory Games or Brain Gym For Kids: मुलांचा बौद्धिक विकास होऊन त्यांचा मेंदू तल्लख होण्यासाठी हे काही खेळ त्यांना शिकवा आणि त्यांच्यासोबत तुम्हीही खेळा.... बघा त्यांच्या अभ्यासात कसा फायदा होतो.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2023 07:09 PM2023-08-28T19:09:55+5:302023-08-28T19:10:39+5:30

Memory Games or Brain Gym For Kids: मुलांचा बौद्धिक विकास होऊन त्यांचा मेंदू तल्लख होण्यासाठी हे काही खेळ त्यांना शिकवा आणि त्यांच्यासोबत तुम्हीही खेळा.... बघा त्यांच्या अभ्यासात कसा फायदा होतो.

Brain boosting activities for kids, memory games or brain gym for kids | मुलांना ३ खेळ शिकवा, एकाग्रता वाढेल- डोकं होईल सुपीक आणि मोबाइलचं वेडही होईल कमी 

मुलांना ३ खेळ शिकवा, एकाग्रता वाढेल- डोकं होईल सुपीक आणि मोबाइलचं वेडही होईल कमी 

Highlights मुलांचं मोबाईलचं वेड कमी करायचं असेल आणि त्यांचा बौद्धिक विकास करून मेंदू तल्लख करायचा असेल, तर त्यांना हे काही खेळ शिकवा

हल्ली बहुतांश पालकांची एकच तक्रार असते की मुलं ऐकतच नाहीत. सारखं टीव्ही बघत बसतात नाहीतर मग मोबाईलवर गेम खेळत बसतात. हल्लीची पिढी जन्मापासून मोबाईल, टीव्ही बघत आली आहे. त्यामुळे त्यांना त्या गोष्टींचं आकर्षण असणं साहजिकच आहे. त्यात आता बऱ्याच सोसायटीमध्ये मुलांना खेळायला जागा नसते. किंवा जागा असली तर सोबत खेळणारी समवयस्क मुले नसतात. त्यामुळे मग मुलं कंटाळतात आणि मोबाईलमध्येच मन रमविण्याचा प्रयत्न करतात. मुलांचं मोबाईलचं वेड कमी करायचं असेल आणि त्यांचा बौद्धिक विकास करून मेंदू तल्लख करायचा असेल, तर त्यांना हे काही खेळ शिकवा (Brain boosting activities for kids). यामुळे मुलांची एकाग्रता वाढेल आणि अभ्यासातही मन लागेल. (How to improve concentration?)

 

मुलांचा बौद्धिक विकास करणारे ब्रेन गेम
हे सगळे खेळ ३ वर्षे आणि त्यापेक्षा पुढील वयाच्या मुलांसाठी आहेत. कमी वयाच्या मुलांसोबत कमी वेगात तर जास्त वयाच्या मुलांसोबत जास्त वेगात हे खेळ खेळावेत. याविषयीची लिंक इन्स्टाग्रामच्या 2monkeys.and.me या पेजवर शेअर करण्यात आली आहे. यामध्ये एकूण ४ खेळ सुचविण्यात आले असून ते पुढीलप्रमाणे आहेत.

लेक आजारी होती म्हणून..! सुश्मिता सेन सांगतेय, करिअर की मुलं आईला ठरवावंच लागतं कारण..
१. यामध्ये दोन्ही तळहात एका टेबलवर ठेवा. एक तळहात उलटा करा तर दुसरा सुलटा. यानंतर जो उलटा असेल तो सुलटा करा आणि सुलटा असेल तो उलटा करा. वेळ वाढवून झटपट हा खेळ खेळा.

 

२. दुसरा खेळ खेळण्यासाठी एक तळहात सरळ ठेवा तर दुसऱ्याची मुठ घाला. आता ज्याची मुठ असेल तो उघडा आणि जो उघडलेला होता, त्याची मुठ घाला. एकानंतर एक याप्रमाणे ही कृती झटपट करा.

वजन लवकर कमी करायचंय? रोज सकाळी १ गोष्ट करायला मुळीच विसरु नका, आहारतज्ज्ञ सांगतात..

३. तिसऱ्या खेळात एका हाताची मुठ आणि एक तळहात सरळ ठेवा. दोन्ही हातांचे अंगठे मात्र एकमेकांजवळ ठेवा. ज्या हाताची मुठ आहे, त्याचा अंगठा दुसऱ्या हाताच्या अंगठ्याखाली ठेवा. आता असेच दुसऱ्या हाताने करा. ही क्रिया जलद करा आणि करताना अंगठ्याच्या खाली- वर होण्याकडे लक्ष द्या.. 

हवा बदलली की लगेच सर्दी- कफाचा त्रास होतो? १ सोपा उपाय, नाक होईल मोकळं- कफ कमी 

४. चौथ्या खेळात दोन्ही तळहात टेबलवर ठेवा. एक टाळी टेबलावर द्या. दुसरी टाळी एका हाताने दुसऱ्या हातावर द्या. एकानंतर एका हाताने टाळी देत चला आणि शक्य होईल तेवढ्या लवकर अचूकपणे ही कृती करा. 

 

Web Title: Brain boosting activities for kids, memory games or brain gym for kids

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.