मुलांचा मेंदू शार्प आणि स्मार्ट बनवण्यासाठी आई वडिलांनी मुलांचे डाएट आणि त्यांच्या सवयी याकडे लहानपणापासूनच लक्ष द्यायला हवं. जर तुम्हाला वाटत असेल की तुमचं मूल सगळ्यात स्मार्ट आणि इंटेलिजेंट व्हावं (Smart Kids) तर काही पदार्थांचा त्यांच्या आहारात समावेश करायला हवा. (Healthy Kids Food)
हेल्दी डाएटमुळे मेंदूचा चांगला विकास होण्यात मदत होते. मुलांच्या मानसिक आणि शारीरिक ग्रोथसाठी हे उत्तम आहे तेच मुलांना खाऊ घातलं पाहिले. मुलांचा मेंदू तेज करण्यासाठी ५ सुपरफूड्स कोणते ते समजून घेऊ. (Kids Superfood) या पदार्थांचा आहारात समावेश केल्यास तुमचा गंभीर आजारांपासून बचाव होईल.
1) ड्रायफ्रुट्स
लहानपणापासूनच मुलांना नट्स आणि सिड्स घालण्याची सवय लावा. जी मुलं रोज ड्राय फ्रुट्सस खाता त्यांचा मेंदू निरोगी राहण्यास मदत होते. मुलांना बदाम, काजू, अंजीर, अक्रोड खायला द्या. ज्यामुळे त्यांना एनर्जी मिळेल आणि मेंदूचा चांगला विकास होण्यासही मदत होईल.
2) पिनट बटर
आहारतज्ज्ञ एन्ड्रे गियानकोली सांगतात, शेंगदाणे आणि शेंगदाण्यांपासून तयार करण्यात आलेले बटर व्हिटामीन ई चा चांगला स्त्रोत आहे. (Ref) यातील थायमीन मेंदू आणि नर्व्हस सिस्टीमला ग्लुकोज उर्जेसाठी वापरण्यात मदत करतात. पिनट बटरचे बनाना सॅण्डविच तुम्ही बनवू शकता किंवा सफरचंदाचे काप पिनट बटरमध्ये बुडवून खाऊ शकता.
१ महिन्यात ४ किलो वजन कमी करा-आहारतज्ज्ञांनी सांगितलं खास डाएट; मेंटेन राहण्याचं साधं सिक्रेट
3) तूप
मुलांच्या आहारात तुपाचा समावेश असायलाच हवा तूपात मोठ्या प्रमाणात डिएचए आणि गुड फॅट्स असतात. ज्यामुळे मुलांची मानसिक ग्रोथ होते. साजूक तूप खाल्ल्याने इम्यूनिटी मजबूत राहते. तूपात एंटीबॅक्टेरिअल, एंटीफंगल गुण असतात. ज्यामुळे पचनक्रिया चांगली राहण्यास मदत होते.
पोट कमी करायचंय-पण डाएट नको? रोज किती चपात्या खाव्यात याचं सोपं गणित पाहा; स्लिम राहाल
4) फळं आणि भाज्या
मुलांच्या आहारात फळं, भाज्यांचा समावेश असायलाच हवा. याशिवाय डाळी आणि दहीसुद्धा मुलांना द्या. ज्यामुळे मुलांचे पोट आणि मेंदू दोन्ही चांगले राहते. फळं आणि भाज्या खाल्ल्याने शरीर निरोगी राहते, इम्यूनिटी मजबूत होते. याशिवाय रोज १ केळी खाल्ल्याने मुलांच्या मेंदूचा विकास होतो
5) दूध
मुलं दूध प्यायला खूप त्रास देत असतील तर आई वडील मुलांना दूध देणंच बंद करतात. याचा त्यांच्या मेंदूवर परिणाम होतो. दूधात भरपूर प्रमाणात कॅल्शियम आणि व्हिटामीन्स असतात. ज्यामुळे मुलांचा मेंदू मजबूत होतो. दूधात फॉस्फरस आणि व्हिटामीन डी सुद्धा चांगल्या प्रमाणात असते. म्हणून रोज १ कप दूध मुलांना द्यायला हवे.