Join us  

स्मरणशक्ती वाढून मुलांचा मेंदू होईल तल्लख, ५ सोपे ब्रेन गेम- मुलांसह खेळून आईबाबाही होतील हुशार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2024 11:56 AM

Brain Boosting Activities For Kids: हे काही साधे- सोपे ब्रेन गेम मुलांना शिकवले तर मेंदू तल्लख होण्यासाठी, स्मरणशक्ती वाढविण्यासाठी त्याचा नक्कीच उपयोग होतो.

ठळक मुद्देहे व्यायाम मोठ्या माणसांनी करणंही फायदेशीर असतं. त्यामुळे वाढत्या वयासोबत होणारे विस्मरण, अल्झायमर असे मेंदूशी संबंधित आजार होण्याचा धोका बऱ्याच प्रमाणात कमी होतो.

आपल्या शरीरासाठी, चेहऱ्याच्या स्नायूंसाठी, डोळ्यांसाठी जसे व्यायाम असतात, तसेच व्यायाम आपल्या मेंदूसाठीही असतात. त्यालाच ब्रेन जीम किंवा ब्रेन गेम म्हणून ओळखलं जातं (Brain game or Brain gym for children). हे व्यायाम जर लहान मुलांकडून नियमितपणे करून घेतले तर मुलांचा मेंदू तल्लख होऊन स्मरणशक्ती, बुद्धीमत्ता वाढण्यासाठी त्याचा नक्कीच उपयोग होताे (Activities for sharpening the brain of children). हे व्यायाम मोठ्या माणसांनी करणंही फायदेशीर असतं (How to improve child's brain function). कारण त्यामुळे वाढत्या वयासोबत होणारे विस्मरण, अल्झायमर असे मेंदूशी संबंधित आजार होण्याचा धोका बऱ्याच प्रमाणात कमी होतो. (Brain Boosting Activities For Kids)

लहान मुलांचा मेंदू तल्लख करणारे ब्रेन गेम

 

मुलांच्या मेंदूचा अधिक चांगला विकास होण्यासाठी त्यांना कोणते व्यायाम करायला लावावे, याविषयीचा एक छानसा व्हिडिओ wellnesswithmanisha या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. यामध्ये जवळपास ५ प्रकारचे व्यायाम सांगितले आहेत. यातला प्रत्येक व्यायाम दोन्ही हातांनी १०- १० वेळा करून हळूहळू स्पीड वाढवत न्या.

डायमंड फेशियलसारखा ग्लो मिळेल घरीच, फेशियलवर भरमसाठ पैसे खर्च करण्यापेक्षा हा उपाय करा...

१. पहिला व्यायाम करण्यासाठी एका हाताची मूठ घाला आणि दुसऱ्या हाताचा तळवा टेबलावर किंवा जमिनीवर ठेवा. एकानंतर एक अशा पद्धतीने दोन्ही हातांनी हा व्यायाम करा. 

'घरचोला' साडी नेसून मैत्रिणीच्या लग्नाला गेली साेनम कपूर, बघा या गुजराथी साडीचं वैशिष्ट्य काय....

२. दोन्ही हातांच्या मुठी घाला. एका हाताची पहिली दोन बोटे वर करा आणि त्याच वेळी दुसऱ्या हाताचे एकच बोट वर करा. यानंतर दुसऱ्या हाताची दोन बोटे वर करा आणि त्यानंतर पहिल्या हाताचे एक बोट वर करा. 

 

३. तिसऱ्या व्यायामात सुरुवातीला दोन्ही हातांच्या मुठी घाला. यानंतर एका हाताची दोन्ही बोटे वर करा. त्या बोटांवर दुसऱ्या हाताचे पहिले बोट आडवे ठेवा. एकानंतर एक या पद्धतीने दोन्ही हातांनी हा व्यायाम करा.

कोटिंग खराब न होऊ देता बघा कसं स्वच्छ करायचं सॅण्डविच मेकर, ग्रिलर- काही सेकंदातच चकाचक

४. दोन्ही हातांच्या करंगळीकडचा भाग जमिनीवर किंवा टेबलावर ठेवा. यानंतर हातांच्या मुठी घाला आणि पुन्हा मुठी उघडून हाताचा तळवा जमिनीवर किंवा टेबलावर चिटकवा. या ३ स्टेप एकानंतर एक १० वेळा करा.

५. दोन्ही हातांच्या मुठी घाला. यानंतर एका हाताची मुठ उघडून अंगठा आणि पहिले बोट एकमेकांना लावा. बाकी बोटे सरळ ठेवा. असं दोन्ही हातांनी प्रत्येकी १०- १० वेळा करा. 

 

टॅग्स :पालकत्वलहान मुलं