आमिर खान आणि किरण राव यांचा झालेला घटस्फोट (divorce)आणि त्यानंतर आमिरच्या तिसऱ्या लग्नाविषयी होणारी चर्चा, हे सगळं सोशल मिडियावर (social media) सध्या चांगलंच गाजतं आहे. मुळातच आमिर आणि किरण यांचा घटस्फोट हीच मुळी त्यांच्या चाहत्यांसाठी सगळ्यात धक्कादायक गोष्ट होती. कारण बॉलीवूडमधील एक balanced couple म्हणून या दोघांकडे पाहिलं जायचं. नवरा- बायको म्हणून आम्ही दोघे निश्चितच वेगळे झालो आहोत, पण आई- बाबा (Celebrity parents) म्हणून आम्ही आमच्या मुलांसाठी कायम एकत्रच राहू, असे त्या दोघांनी घटस्फोट झाल्यानंतर लगेचच स्पष्ट केले होते. त्यामुळे जसे बोलले, तसेच ते दोघे नुकतेच वागले आहेत.
मुलगा आझाद (Aamir- Kiran's son Aazad's 10th birthday) याच्या १० व्या वाढदिवसानिमित्त ते दोघे नुकतेच एकत्र आले हाेते. दोघांनी एकत्र येऊन मोजक्याच पाहुण्यांच्या उपस्थितीत आझादचा वाढदिवस साजरा केला. वाढदिवसाचे सेलिब्रेशन (birthday celebration) अतिशय छोटेखानी आणि घरगुती स्वरूपाचे होते, तरी ते खूपच थाटात आणि हौशीने झाल्याचे फोटोंवरून दिसून येते. लेखिका शोभा डे (Shobha De), आमिर आणि त्याची पहिली पत्नी रिना दत्ता यांचा मुलगा इम्रान यांची यावेळी उपस्थिती होती. शोभा डे यांनीच आझादच्या वाढदिवसाचे काही फोटो सोशल मिडियावर पोस्ट केले आहेत.
आमिर आणि किरण या दोघांसोबतच आझादही यावेळी खूप खुश दिसला. दोघांनी एकत्र येऊन आझादसोबत वाढदिवसाचा केक कापला. काही दिवसांपुर्वीच आमिर खान, किरण राव आणि मुलगा आझाद यांचा आणखी एक फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाला होता. यामध्ये आमिर आणि आझाद दोघे मिळून टेबल टेनिस खेळत होते. तर किरण त्या दोघांचा खेळ मागे बसून बघत होती. यावरूनच ते दोघेही पालक म्हणून आपल्या मुलाबाबत किती संवेदनशील आहेत हे दिसून येते.
बॉलीवूडमधील विभक्त झालेली अनेक जोडपीही आपल्या मुलांबाबत अशीच भूमिका घेताना दिसून आले. मलायका आणि अरबाज (Malaika- Arbaaz) यांचाही असाच किस्सा. त्यांचा मुलगा जेव्हा उच्च शिक्षणासाठी परदेशी गेला तेव्हा मलायका आणि अरबाज दोघांनी एकत्र येत त्याच्यासोबत उत्तम वेळ घालविला. लाँगड्राईव्ह, फॅमिली लंच आणि गेट टुगेदर, मुलासाठी शॉपिंग अशा अनेक गोष्टी त्या दोघांनीही केवळ मुलाच्या आनंदासाठी एकत्र येऊन केल्या. तसेच काहीसे ऋतिक रोशन आणि सुझान खानचे (Hrithik Roshan and Sussanne Khan). ते दोघेही एकमेकांशी कितीही फटकून वागत असले, तरी मुलांची जेव्हा वेळ येते, तेव्हा ते दोघेही कायम आई- बाबा म्हणून मुलांसाठी एकत्र आलेले दिसतात.