Lokmat Sakhi >Parenting > मुलांना जंक फूड खाण्याची चटक लागली? ३ उपाय, पोटभर जेवतील भरपूर वाढतील

मुलांना जंक फूड खाण्याची चटक लागली? ३ उपाय, पोटभर जेवतील भरपूर वाढतील

Child Addicted to Junk Food? Why Your Child is Obsessed With Snacks मुलांसाठी हानिकारक आहे जंक फूड, ही सवय सोडवण्यासाठी करा ३ उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2023 04:06 PM2023-05-21T16:06:58+5:302023-05-21T16:10:21+5:30

Child Addicted to Junk Food? Why Your Child is Obsessed With Snacks मुलांसाठी हानिकारक आहे जंक फूड, ही सवय सोडवण्यासाठी करा ३ उपाय

Child Addicted to Junk Food? Why Your Child is Obsessed With Snacks | मुलांना जंक फूड खाण्याची चटक लागली? ३ उपाय, पोटभर जेवतील भरपूर वाढतील

मुलांना जंक फूड खाण्याची चटक लागली? ३ उपाय, पोटभर जेवतील भरपूर वाढतील

लहान मुलांनाच काय तर आपल्याला देखील जंक फूड खाण्याची चटक लागते. जंक फूड चवीला भन्नाट व बजेट फ्रेंडली असतात. सायंकाळ झाली की बाजारात विविध प्रकारचे जंक फूडच्या स्टॉल्स लागतात. मुले बर्‍याचदा जंक फूड खाण्याचा आग्रह धरतात, ज्यामुळे मुलांना जंक फूड खाण्याची सवय लागते. मुले निरोगी आणि पौष्टिक पदार्थ खाणे टाळतात. अशी सवय त्यांच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. अशा स्थितीत मुलांच्या शरीरात पौष्टिकतेची कमतरता निर्माण होऊ शकते.

बहुतांश मुलांना स्ट्रीट फूड खायला प्रचंड आवडते. त्यांना लंच व डिनरमध्ये देखील तेच हवे असते. अशा परिस्थितीत अनेक पालकांना त्यांच्या जिद्दीपुढे नमते घ्यावे लागते. परंतु, याचा थेट परिणाम त्यांच्या आरोग्यावर होतो. मुलांची जंक फूडची ही सवय सोडायची असेल तर, काही टिप्स फॉलो करून पाहा. या ट्रिकमुळे मुलांची ही सवय नक्कीच सुटेल(Child Addicted to Junk Food? Why Your Child is Obsessed With Snacks).

मुलांची आवडती डिश तयार करा

मुलांची जंक फूड खाण्याची सवय मोडायची असेल तर, आपल्याला त्यांच्या आवडीचे पदार्थ करावे लागतील. हो, आपल्या पाल्यांना काय आवडतं, काय नाही. हे जाणून घेऊन ते पदार्थ करणे आवश्यक आहे. रोज - रोज तेच पदार्थ खाऊन मुलांसह घरातील इतर सदस्यांना देखील कंटाळा येतोच. म्हणून ते बाहेरचं जंक फूड खाण्यास प्राधान्य देतात. आपण देखील घरी बर्गर, पिझ्झा या पदार्थात भाज्या व पौष्टीक पदार्थांचा वापर करून करू शकता. जे मुलं आवडीने खातील.

स्तनदा मातेनं वारंवार छाती पाण्यानं धुवावी, हे कितपत खरं? डॉक्टर सांगतात, चुकीच्या माहितीचे गंभीर तोटे

मुलांसमोर पदार्थ आकर्षकरित्या प्रेझेंटे करा

मुलांना चवीपेक्षा प्रेझेंटेशन पाहून बाहेरच्या गोष्टी खायला आवडतात. त्यामुळे जेवणासाठी जे काही बनवता ते चांगले सजवून त्यांच्यासमोर मांडणे महत्त्वाचे आहे. यासाठी लहान मुलांचे जेवणाचे ताट आकर्षक पदार्थांचा वापर करून सजवा. चपाती बनवताना साधी नसून, त्यात भाज्यांच्या रसांचा वापर करा. यामुळे, मुले हळूहळू रंगीबेरंगी गोष्टींकडे आकर्षित होऊ लागतील. व हे पदार्थ चवीने खातील.

लहान मुलं माती का खातात? ही सवय तोडण्यासाठी ४ उपाय, सांभाळा आरोग्य

हेल्दी पदार्थ खायला शिकवा

मुलांना जंक फूड खाण्याची सवय लागू नये म्हणून, मुलांच्या आहाराचा दिनक्रम निश्चित करा. त्यांना वेळोवेळी काहीतरी आरोग्यदायी खायला देत राहा. अशा प्रकारे त्यांचे पोट भरलेले राहील. व भूक लागल्यावर ते जंक फूड खाण्याचा आग्रह धरणार नाहीत.

Web Title: Child Addicted to Junk Food? Why Your Child is Obsessed With Snacks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.