लहान मुलांना गुदगुल्या करायला मजा येते. जेव्हा जेव्हा पालक किंवा कुटुंबातील कोणताही सदस्य मुलांना गुदगुल्या करतो तेव्हा ते घर हसण्याच्या आनंदात रमतं. पण तुम्हाला माहिती आहे का की, मुलांना जास्त गुदगुल्या करणं हे त्यांच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतं. अनेक रिसर्चमधून असं दिसून आलं आहे की जास्त गुदगुल्या केल्यामुळे मुलांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. गुदगुल्या करताना पालकांनी काळजी घेतली पाहिजे.
गुदगुल्या केल्याने मुलांचं काय होतं नुकसान?
जबरदस्तीने हसणं म्हणजे आनंद नाही
मुलाला गुदगुल्या झाल्यावर ते नक्कीच हसतात, पण ते खरोखर आनंदी असतात असं नाही. कधीकधी गुदगुल्या इतक्या जोरात असतात की मुलं हसण्याशिवाय काहीही करू शकत नाहीत. जबरदस्तीने हसणं म्हणजे आनंद नाही.
श्वास घेण्यास त्रास होणं, घाबरणं
सतत गुदगुल्या केल्याने मुलाला श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो आणि ते घाबरू शकतात. लहान मुलांमध्ये ही समस्या आणखी गंभीर असू शकते कारण त्यांची श्वसनसंस्था तितकीशी मजबूत नसते.
स्वसंरक्षणाची भावना नष्ट होते
गुदगुल्या करताना मुलाला स्वतःचं संरक्षण करता येत नाही असं वाटू शकतं. यामुळे 'नाही' किंवा 'थांबा' म्हणण्याची त्याची प्रवृत्ती कमकुवत होऊ शकते. जर हे बराच काळ चालू राहिले, तर तो मोठा झाल्यावरही, त्याला त्याची अस्वस्थता इतरांना सांगणं कठीण होऊ शकतं.
मानसिक ताण आणि भीती
काही मुलांना जास्त गुदगुल्या झाल्यास भीती आणि अस्वस्थता वाटू शकते. ज्यामुळे त्यांच्यात असुरक्षिततेची भावना निर्माण होऊ शकते.
स्नायूंवर परिणाम आणि वेदना
सतत गुदगुल्या केल्याने मुलांच्या स्नायूंवर अनावश्यक दबाव येऊ शकतो, ज्यामुळे त्यांना वेदना होऊ शकतात. म्हणूनच मुलांना कधीही गुदगुल्या करू नये. हे त्यांच्या आरोग्यासाठी चांगलं नाही. त्याचा मुलांना त्रास होऊ शकतो.