सध्या स्मार्ट फोन आपल्या आयुष्यातला महत्वाचा घटक बनला आहे. मोबाईल फोन शिवाय कित्येक लोकांचे पान हालत नाही. कोरोना या वैश्विक महामारीनंतर अनेकांना मोबाईलची जणू लत लागली आहे. त्यावेळी संपूर्ण शिक्षण, काम स्क्रीनद्वारे पार पडले आहे. या काळात मोठ्यांसह लहान मुलांना देखील मोबाईल फोनची सवय लागली आहे.
आजकाल लहान मुलं मोबाईल फोन बघितल्याशिवाय जेवत नाही. २ वर्षांवरील मुलं युट्युब, इंस्टाग्राम, फेसबुक, यातील शोर्ट व्हिडिओच्या अधीन गेली आहेत. मात्र, याचा गंभीर परिणाम मुलांच्या आरोग्यावर होत आहे. याचा थेट परिणाम मुलांच्या डोळ्यांवर आणि मेंदूवर होत आहे. मुलांची ही सवयी कमी करण्यासाठी काही टिप्स आपल्याला मदत करेल.
स्मार्ट टीव्हीचा करा वापर
सतत मोबाईल फोन वापरल्याने मुलांच्या झोपेवर परिणाम होतो. छोटे छोटे रील्स पहिल्याने मोबाईल फोनची सवयी लागते. ज्याचा थेट परिणाम स्लिपिंग सायकलवर पडतो. जर आपल्या घरी स्मार्ट टीव्ही असेल तर, त्यावर मुलांना शिक्षणाच्या संबंधित व्हिडिओ लावून द्या. याने त्याचं मनोरंजन होईल, यासह मोबाईल फोनची सवयी सुटेल.
मुलांना पेंटिंग शिकवा
पेंटिंग प्रत्येकाला आवडते. पेंटिंग केल्याने आपली कला पण वाढते यासह मन दुसऱ्या ठिकाणी व्यस्त होते. मुलांची मोबाईल फोनची सवयी मोडण्यासाठी त्यांना पेंटिंग क्लासला लावा. त्यांची रंगाशी मैत्री करून द्या. याने त्यांच्यामधील एक्स्ट्रा स्कील वाढेल. यासह त्या नव नवीन गोष्टी शिकतील.
फेवरेट फूड कुकिंग
मोबाईल फोनचे व्यसन सोडवण्यासाठी मुलांना कुकिंग शिकवा. त्यांच्यामध्ये जेवणाची आवड निर्माण करा. त्यांना सुरुवातीला त्यांच्या आवडीचे पदार्थ बनवायला शिकवा. आठवड्यातून २ वेळा त्यांना जेवण बनवायला शिकवा. याने त्यांच्यामध्ये जेवण बनवण्याची रुची निर्माण होईल. यासह मोबाईल फोनचे व्यसन सुटेल.