Lokmat Sakhi >Parenting > मुलांचं पाठांतर होत नाही- वाचलेलं लगेच विसरून जातात? ३ गोष्टी करा, धाडधाड उत्तरं देतील

मुलांचं पाठांतर होत नाही- वाचलेलं लगेच विसरून जातात? ३ गोष्टी करा, धाडधाड उत्तरं देतील

Parenting Tips: मुलांचं पाठांतर उत्तम होण्यासाठी आणि जे काही वाचलं आहे ते त्यांच्या कायमचं लक्षात राहण्यासाठी या काही गोष्टी तुम्ही करू शकता....(how to make kids learn fast)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2024 04:33 PM2024-07-26T16:33:26+5:302024-07-26T16:34:10+5:30

Parenting Tips: मुलांचं पाठांतर उत्तम होण्यासाठी आणि जे काही वाचलं आहे ते त्यांच्या कायमचं लक्षात राहण्यासाठी या काही गोष्टी तुम्ही करू शकता....(how to make kids learn fast)

Children don't learn - do they forget what they read immediately? Do 3 things to make them fast learner | मुलांचं पाठांतर होत नाही- वाचलेलं लगेच विसरून जातात? ३ गोष्टी करा, धाडधाड उत्तरं देतील

मुलांचं पाठांतर होत नाही- वाचलेलं लगेच विसरून जातात? ३ गोष्टी करा, धाडधाड उत्तरं देतील

Highlights त्या प्रश्नाचं उत्तर किंवा तो लक्षात न राहणारा धडा त्यांना एवढा चांगला समजेल की ते कायमसाठी तो लक्षात ठेवतील.

हल्ली शालेय अभ्यासक्रमाचा विस्तार खूप जास्त वाढला आहे. मुलांच्या पालकांनी ज्या गोष्टी हायस्कूलमध्ये जाऊन शिकल्या त्या अनेक गोष्टी हल्ली प्राथमिक, माध्यमिक अभ्यासक्रमातच आहेत. अशावेळी मुलांवर अभ्यासाचा ताण येणं अगदी साहजिक असतात. त्यामुळे मुलांना बऱ्याचदा एखादा धडा समजतच नाही किंवा एखाद्या प्रश्नाचं उत्तर कितीही प्रयत्न केला तरी पाठच होत नाही. अशावेळी मुलांवर चिडून, ओरडून उपयोग नसतो. त्यामुळे मुलं नाराज होता, रडतात आणि मग अशाने जे पाठ झालं आहे, ते देखील ते विसरून जातात. म्हणूनच अशावेळी मुलांना न रागवता, ओरडता थोडी मदत करा. त्या प्रश्नाचं उत्तर किंवा तो लक्षात न राहणारा धडा त्यांना एवढा चांगला समजेल की ते कायमसाठी तो लक्षात ठेवतील. (how to make kids learn fast)

मुलांचं पाठांतर होत नसेल तर काय करावं?

 

१. उदाहरणं देऊन समजावून सांगा

मुलांना बऱ्याचदा पुस्तकी भाषा खूपशी लक्षात राहात नाही. अशावेळी ती संकल्पना त्यांना तुमच्या बोली भाषेत समजावून सांगा.

मेहंदी लावल्यानंतर केस कोरडे होतात? बघा मेहंदी लावण्याची योग्य पद्धत- केस होतील मऊ, चमकदार

तुमच्या अवतीभोवतीची, नेहमीच्या बघण्यातली काही उदाहरणं त्या संकल्पनेशी जोडा आणि त्या पद्धतीने मुलांना समजावून सांगा. त्यांच्या चांगलं लक्षात राहील.

 

२. कविता, गाण्यांची मदत घ्या..

मुलांच्या एखाद्या आवडीचं गाणं किंवा कविता कोणती आहे ते बघा. त्या कवितेच्या किंवा गाण्याच्या चालीवर त्यांना ती संकल्पना समजावून सांगा.

दीपिका पादुकोणसारखी चमकदार फ्लॉलेस त्वचा पाहिजे? करा तिनेच सांगितलेले ३ उपाय, पिंगमेंटशनही टळेल

हसतखेळत, गंमत करत मुलं ते अगदी सहज शिकून जातील आणि कायमचं लक्षात ठेवतील. गणिताची सूत्र, विज्ञानाच्या व्याख्या, इतिहासाच्या सनावळी पाठ करायला ही पद्धत खूप उपयोगी येते. 

 

३. छोटं छोटं घेऊन पाठ करा

एकदा संकल्पना समजली की ती टप्प्याटप्प्याने पाठ करण्याची सवय मुलांना लावा. एकदम सगळं एका दमात पाठ होणं अवघड आहे.

भरजरी कपड्यांना घरीच इस्त्री कशी करावी?३ स्मार्ट ट्रिक्स- काम झटपट होऊन पैसेही वाचतील 

त्यामुळे जे पाठ करायचं आहे, त्याचे छोटे छोटे तुकडे करा आणि मग ते मुलांकडून पाठ करून घ्या. कमीतकमी वेळात जास्तीतजास्त पाठांतर होईल. 

 

Web Title: Children don't learn - do they forget what they read immediately? Do 3 things to make them fast learner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.