Join us  

अभ्यासाला बसताच मुलं पेंगायला लागतात, पुस्तक डोळ्यासमोर धरलं की झोपे येते, असं का होतं?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2023 4:57 PM

मुलं सिनेमा पाहतान, गेम खेळतात तेव्हा जागतात पण अभ्यासाला बसले की झोप येते, असं खरंच होतं की नाटक करतात?

ठळक मुद्देझोप आली म्हणून रागवू -मारु तर मुळीच नये.

मुलं एरव्ही तासंतास सिनेमे पाहतात, दंगा करतात, मोबाइल गेम खेळतात. तेव्हा त्यांना रात्री झोप येत नाही पण अभ्यासाला बस म्हंटलं किंवा पुस्तक त्यांनी स्वत:हून जरी डोळ्यासमोर घेतलं तर लगेच हातात अभ्यासाचं पुस्तकं धरलं की झोप यायला लागते. हे असं का होतं? एरवी टाइमपास करताना फुल्ल एनर्जी असते पण अभ्यास करतानाच नेमकं काय होतं हेच कळत नाही. खूप कंटाळा येतो, झोप येते. झोपून घ्यावंसं वाटतं.  नेमकं अभ्यासाला बसल्यावरच कंटाळा कसा येतो?मुलं नाटकं करतात म्हणून मुलांना रागवण्यापेक्षा खरंच मुलांना झोप येत असेल का असा विचार करुन पाहा.

अभ्यास करताना झोप येण्यामागे मुख्यत: दोन कारणं असतात असं तज्ज्ञ सांगतात. एक म्हणजे अभ्यास करण्यात इंटरेस्टच नसेल, अभ्यास करण्याची आवडच नसेल तर आणि दुसरं कारण म्हणजे एकावेळी एकाठिकाणी बसून खूप वेळ अभ्यास केला तर झोप येते. खाण्यापिण्याच्या सवयी, अभ्यास करण्याची चुकीची पध्दत या गोष्टीही अभ्यास करताना झोप येण्यास कारणीभूत ठरतात. या प्रत्येक गोष्टीत बदल घडवल्यास अभ्यास करताना छान ताजं तवानं वाटेल आणि झोप येणार नाही.

(Image : google)

अभ्यास करताना झोप येवू नये म्हणून...१. तेलकट, तूपकट पदार्थ अती प्रमाणात खावू नये. दिवसातून एकदा तरी एखादं फळ खावं. भाज्या-फळं यातून शरीराला आवश्यक असलेली पोषणमुल्यं आणि खनिजं मिळतात. जंक फूड, फास्ट फूड खाणं जास्त असेल तर शरीरातले अनावश्यक फॅट्स वाढतात. त्याचा परिणाम म्हणजे अभ्यासाच्या वेळेस, महत्त्वाची कामं करताना आळस येतो, उत्साही वाटत नाही. झोपावंसं वाटतं.२. अभ्यासाच्या वेळेस झोप येणे ही बाब मुलं रात्री किती वेळ झोपतात यावरही अवलंबून असते. रात्री उशीरा झोपणं आणि सकाळी शाळेसाठी लवकर उठत असलो तर त्यांची झोप पूर्ण होत नाही. त्याचा परिणाम म्हणजे अभ्यास करताना झोप येते. त्यामुळे रात्री लवकर झोपून पुरेशी झोप घेणे हाच त्यावरचा उपाय. ३. अनेकांना शाळेतून दुपारी घरी आल्यावर जेवण करुन झोपायची सवय असते. एकदा झोपले की २-३ तास उठतच नाही. अशी झोप नंतर अभ्यासावर परिणाम करते. दुपारी झोपण्याची सवय मोडलेलीच बरी.

४. दिवसभर पुरेसं पाणी प्यावं. अभ्यास करतानाही पाण्याची बाटली आपल्याजवळ भरुन ठेवावी. पुरेसं पाणी प्यायल्यास शरीरात ओलावा राहातो. त्यामुळे शरीराची ऊर्जाही वाढते. ५. एकाजागी तासनतास बसून अभ्यास करण्याऐवजी थोड्यावेळ उभ्याने किंवा हातात पुस्तक घेवून खोलीत फिरता फिरता अभ्यास करावा. फारच झोप येत असेल तर सरळ हातातलं पुस्तक बाजूला ठेवावं, खोलीतून बाहेर पडावं. घराच्या बाहेर पडून ५ मिनिटं पायी फिरुन यावं. पण ५ मिनिटं टीव्ही पाहणं हा काही त्यावर उपाय नाही.६. अभ्यास करताना एक सलग न करता मधे मधे छोटे ब्रेक घ्यावे. ब्रेकमुळे अभ्यासात अडथळा येत नाही. ७. वाचन करुन झोप आली तर लिहावे, लिहून कंटाळा आला तर वाचावे हे उत्तम. 

८. रोज नियमित व्यायाम करा, खेळा. अभ्यास गोष्टीचं पुस्तक आहे असं समजून वाचलं म्हणजे मग झोप पळून जाते.९. आईबाबांनी झोप उडवायची म्हणून स्वत: काही करु नये.१०. झोप आली म्हणून रागवू -मारु तर मुळीच नये. 

 

टॅग्स :विद्यार्थीशिक्षणपालकत्व