Join us  

मुलांना लहानपणीच चष्मा लागला, आहारात हव्या ५ भाज्या- नजर सांभाळा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2022 7:06 PM

Eye Problems in Child लहान मुलांमध्ये गॅझेटचा वापर वाढत चालला आहे, त्यामुळेही डोळ्यांना ताण पडतो.

सध्या लहान मुलांना देखील स्क्रीनची एवढी सवयी लागली आहे, की त्यांच्यामध्ये लहान वयातच डोळ्यांच्या निगडीत समस्या निर्माण होत आहे. कोरोना महामारीच्या काळात प्रत्येकाने मोबाईल फोन, लॅपटॉप, संगणकाच्या माध्यमातून कामं केली आहेत. अनेक मुलांनी मोबाईल फोन आणि लॅपटॉपचा वापर करून शिक्षण घेतलं आहे. यासह परीक्षा ही दिल्या आहेत. मात्र, यामुळे लहान मुलांना या गॅझेटची सवयी लागली आहे. त्यामुळे डोळ्यांच्या निगडीत समस्या लहान मुलांमध्ये वाढत चालली आहे. डोळ्यांना जर तंदुरस्त ठेवायचे असेल तर, आपल्या आहाराकडे लक्ष देणे तितकेच महत्वाचे आहे. मुलं भाज्या खायला नाकं मुरडतात. मात्र, याच भाज्या आपल्या पाल्यांच्या डोळ्यांना पौष्टीक तत्वे देतील. 

बथुआ

बथुआ ही एक पालेभाजी आहे. ही हिरवी भाजी आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यामध्ये पॉलीफेनॉल आणि काही अँटिऑक्सिडंट असतात जे दृष्टी वाढवण्यास आणि निरोगी ठेवण्यास मदत करतात.

सिमला मिरची

सिमला मिरची या भाजीमध्ये व्हिटॅमिन सी आढळून येते. जे दृष्टी वाढवण्यास मदत करतात. त्यातील हिरवे अँटिऑक्सिडंट डोळ्यांच्या पेशी निरोगी ठेवण्यास मदत करतात. 

गाजर

गाजरमध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी असते, जे डोळे निरोगी ठेवण्यास मदत करतात. विशेष म्हणजे त्यामध्ये कॅरोटीनोइड्स आणि ल्युटीन देखील आढळून येते. ज्याने डोळ्यांना उर्जा मिळते. गाजर नियमित खाल्ल्याने डोळ्यांचे स्नायू मजबूत होतात. यासह मेंदूचे आरोग्य राखण्यास मदत करतात. 

पालक

पालकामध्ये अँटिऑक्सिडंट्सचे प्रमाण भरपूर असते. बहुतांश मुलांना पालक खायला आवडत नाही. अशा परिस्थितीत आपण पालक सूप, पालक डाळ आणि पालक पराठा बनवून मुलांना खाऊ घालू शकता. हे त्यांच्या आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर ठरेल.

रताळी

हिवाळ्यात रताळी खाणे खूप गरजेचं आहे. रताळी देखील बाजारात सहज उपलब्ध होतात. रताळ्यामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि ल्युटीन असते. त्यामुळे दृष्टी वाढण्यास मदत होते. त्यामुळे मुलांना  रताळी उकडून अथवा विविध पदार्थ बनवून खायला द्या.

टॅग्स :पालकत्वहेल्थ टिप्सडोळ्यांची निगा