Join us  

Children's Day Special : आपल्या मुलांसाठी बालदिन करा स्पेशल, ५ आयडिया - मुले खुश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2022 1:02 PM

Children's Day Special दरवर्षी १४ नोव्हेंबर रोजी बाल दिन म्हणून साजरा करण्यात येतो. हा दिवस आपल्या बालकांसाठी स्पेशल बनवा, त्यांना खुश करा

भारतात दरवर्षी १४ नोव्हेंबर रोजी बाल दिन म्हणून साजरा करण्यात येतो. हा दिवस सर्वत्र उत्साहाने आणि जल्लोषाने साजरा करण्यात येतो. या दिवशी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचा जन्म झाला होता. त्यांचं बालाकांप्रती असलेलं प्रेम हे अफाट होते. त्यांना स्मरण करण्यासाठी १४ नोव्हेंबर रोजी बाल दिन म्हणून साजरा करण्यास सुरुवात झाली. या दिवसाची चिमुकल्या वर्गाकडून आतुरतेने वाट पाहिली जाते. या दिवशी बालकांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. बालदिनानिमित्त शाळेत जाण्यासाठी मुलेही उत्सुक असतात. मात्र, जर आपल्या बालकांसाठी खास पद्धतीने घरी बालदिन साजरा करायचे असेल. तर, आपण खालील दिलेल्या आयडियांचा विचार करून साजरा करू शकता. यंदाचं बालदिन आपण आपल्या बालकांसाठी एक अविस्मरणीय क्षणांसारखे रंगवू शकता.

आवडता पदार्थ बनवा

बालदिनानिमित्त घरी मुलांसाठी काही खास करायचं असेल तर त्यांच्या आवडीचा पदार्थ बनवा. मुलांना जेवणाची आवड असते. अशा परिस्थितीत जेव्हा आपण आपल्या मुलांची आवड जपता. त्यांच्या आवडीचा पदार्थ बनवता.  तेव्हा ते आनंदित होतात. आणि त्यामुळे त्यांचा पूर्ण दिवस खास बनून जातो. त्यामुळे बालदिनी मुलांच्या आवडीची डिश तयार करा.

सरप्राईज गिफ्ट

बाल दिन आपल्या पाल्यांसाठी खूप खास असतो. या दिनानिमित्त जर तुम्ही आपल्या बालकांसाठी काही विशेष सरप्राईज गिफ्ट आणून देत असाल तर अतिउत्तम. कारण मुलांना सरप्राईज गिफ्ट खूप आवडतात. त्यांना गिफ्टची खूप आवड असते. छोट्यातली छोटी गोष्ट देखील त्यांना आनंदी करू शकते. गिफ्ट देऊन त्यांचा हा दिवस अविस्मरणीय करा.

आवडता चित्रपट अथवा कार्टून पहा

बाल दिनानिमित्त आपल्या बालकांसह आवडणारे चित्रपट अथवा कार्टून बघा. त्यांच्यासोबत आपण देखील लहान होऊन जा. त्यांच्या आवडीचा चित्रपट अथवा कार्टून बघण्याचा आनंद त्यांच्यासोबत घ्या. जेणेकरून ते अधिक तुमच्यासह जवळीक साधतील, आणि आनंदित राहतील.

सहलीचा बेत आखा

बालदिनाच्या निमित्ताने आपल्या बालकांना कुठेतरी फिरायला घेऊन जा. त्यांच्या आवडत्या ठिकाणी आपण फिरण्याचा बेत आखू शकता. याशिवाय कॉलनीच्या उद्यानात मुलांसोबत झाडेची रोपटे लावून एक चांगला उपक्रम करू शकतो. जेणेकरून त्यांना एक चांगला संदेश मिळेल. आणि एक शिकवण देखील मिळेल.

टॅग्स :बालदिनपालकत्व