Lokmat Sakhi >Parenting > मुलांचा हट्टीपणा वाढलाय, ४ टिप्स; मुलं होतील समजूतदार, चिडचिडही होईल कमी

मुलांचा हट्टीपणा वाढलाय, ४ टिप्स; मुलं होतील समजूतदार, चिडचिडही होईल कमी

Tips for Child Stubbornness लहान मुलांचं मनासारखे झाले नाही तर त्यांचा हट्टीपणा वाढत जातो. अश्यातच त्यांना हाताळने कठीण जाते.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2023 05:03 PM2023-01-03T17:03:02+5:302023-01-03T17:04:15+5:30

Tips for Child Stubbornness लहान मुलांचं मनासारखे झाले नाही तर त्यांचा हट्टीपणा वाढत जातो. अश्यातच त्यांना हाताळने कठीण जाते.

Children's stubbornness has increased, 4 tips; Children will become sensible, irritability will also be less | मुलांचा हट्टीपणा वाढलाय, ४ टिप्स; मुलं होतील समजूतदार, चिडचिडही होईल कमी

मुलांचा हट्टीपणा वाढलाय, ४ टिप्स; मुलं होतील समजूतदार, चिडचिडही होईल कमी

मुले ही देवा घरची फुले असतात. असं आपण नेहमी ऐकलं असेल. त्यांचा सोज्वळ स्वभाव, निरागसता प्रत्येकाला आवडते. मात्र, पोरं कधी कधी प्रचंड हट्टी होतात. त्यांचे हट्ट वेळेवर पुरवले नाही तर, ते आणखी बिघडतात. जर आपल्या घरात एकुलता एक मुलगा किंवा मुलगी असेल तर आपण त्यांचे म्हणणे नेहमी ऐकतो. त्याचे हट्ट वेळेवर पुरवतो. अशाने मुलं आणखी हट्टी आणि लाडवतात. मुलांचा हा स्वभाव बदलायचा असेल तर काही टिप्स फॉलो करा.

वाद घालू नका

हट्टी मुलं प्रचंड चिडचिडे असतात. त्यांचे म्हणणे ऐकले नाही तर ते वाद घालू लागतात. पालकांनी त्यांच्या हट्टीपणाला आणि वादाला तशाच प्रकारे प्रतिसाद दिले तर मुलं अधिक हट्टी होतात. जर त्यांचा हट्ट पूर्ण झाला नाही तर मुलं आपले म्हणणे ऐकत नाही. प्रत्येक गोष्टीत रुसून बसतात. त्यामुळे हट्टी मुलांना धीराने सांभाळ्याला हवे. त्यांचे म्हणणे ऐका. याने तुमचा संयम त्यांचा राग आणि हट्टीपणा कमी होईल.

प्रतिक्रिया देऊ नका

जर मुलं चांगले वागत असतील तर त्यांची प्रशंसा करा, परंतु जेव्हा ते कोणत्याही गोष्टीसाठी आग्रह धरू लागले किंवा काहीतरी चुकीचे करू लागले तर प्रतिक्रिया देऊ नका. ओरडण्यापैक्षा तुमचे मौन त्यांच्यासाठी शिक्षा म्हणून काम करेल. अथवा त्यांचा राग शांत झाल्यावर शांतपणे त्यांना त्यांची चूक समजावून सांगा.

कामात पर्याय द्या

लहान मुलं आपल्या कामाबाबतीत प्रचंड गोंधळली असतात. आपण त्यांना काही कामं करण्यास मनाई करतो. मात्र, त्यांना नकार न देता इतर पर्याय देणं उत्तम उपाय ठरू शकतो. जर तो एखाद्या गोष्टीसाठी आग्रह धरत असेल तर त्याऐवजी दुसरा पर्याय त्याच्यासमोर ठेवा. जेणेकरून तो आपला हट्ट विसरेल. अशा प्रकारे मूल हट्टी होणार नाही.

नियम तयार करा

मुलांवर तुमचे कितीही प्रेम असले तरी त्यांच्या चांगल्या वागणुकीसाठी काही नियम ठरवले पाहिजेत. त्यांच्यासाठी नियम आखा त्यांना समजावून सांगा की नियमांचे उल्लंघन केल्याने त्यांचेच नुकसान होईल. नियम लावल्याने मुलांना शिस्त लागेल आणि हट्टीपणा काही प्रमाणात कमी होईल.

Web Title: Children's stubbornness has increased, 4 tips; Children will become sensible, irritability will also be less

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.