Join us  

कपड्यांना इस्त्री केली नाही म्हणून १२ वर्षांचा मुलगा आईवर ओरडला- म्हणून त्याच्या बाबांनी काय केलं पाहा....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2023 3:23 PM

Viral Story of A Dad And His 12 Years Son: १२ वर्षांचा मुलगा त्याच्या आईवर ओरडला.... ते काही वडिलांना आवडलं नाही. म्हणून मग त्याला शिक्षा देण्यासाठी त्या बाबांनी काय केलं पाहा....

ठळक मुद्दे त्यांनी त्या मुलाला दिलेली शिक्षा खरोखरच कठोर होती का, हा प्रश्न ते आता सोशल मिडियावर विचारत आहेत.

आई- वडील आपल्या मुलांसाठी त्यांना जमेल तसं किंवा त्याहूनही जास्त करत असतात. पण बऱ्याचदा मुलांना त्याचं महत्त्व समजत नाही. किंबहुना आई- वडिलांचा त्याग किंवा त्यांचे कष्ट लक्षात यावे, एवढं त्यांचं वयही नसतं. त्यामुळे मग मुलं बऱ्याचदा हट्टीपणा करतात, आपल्या पालकांवर चिडचिड करतात. एका १२ वर्षांच्या मुलाचंही तसंच झालं. आईने त्याच्या कपड्यांना इस्त्री केली नाही, म्हणून तो त्याच्या आईवर ओरडत होता. हे नेमकं त्याच्या वडिलांनी पाहिलं आणि त्याला एक शिक्षा दिली. त्यांनी त्या मुलाला दिलेली शिक्षा खरोखरच कठोर होती का, हा प्रश्न ते आता सोशल मिडियावर विचारत आहेत. (Dad gave punishment to son of 12 years yelling at hardworking mom for not doing his laundry)

 

boreddaddy.com या पेजवर वडिलांनी ही स्टोरी शेअर केली आहे. त्यात ते असं म्हणतात की ते आणि त्यांची पत्नी दोघेही दिवसभर नोकरी करतात. घरातली सगळी काम करतात.

प्लास्टिकच्या खुर्च्या काळपट झाल्या- डाग पडले? करा २ सोपे उपाय- खुर्च्या होतील नव्यासारख्या चकाचक 

पण तरीही ते न ओळखता मुलाने असं वागणं त्यांना खूपच त्रासदायक वाटलं. म्हणून एकदा त्या मुलाची आई बाहेरगावी गेली असता त्यांनी एक युक्ती केली. आता आईची सगळी कामं तसेच लहान भावाला सांभाळण्याची तसेच त्याला खाऊ घालण्याची जबाबदारीही त्यांनी त्या मुलावर सोपवली.

हिवाळ्यासाठी उबदार ब्लँकेटची खरेदी करायची? ३ पर्याय- उत्तम दर्जाची खरेदी खिशाला परवडणाऱ्या किमतीत....

यातून मुलाला आई- वडिलांच्या कामाची किंमत कळेल, असा त्यांचा अंदाज होता. पण मुलगा ही सगळी कामं करून त्याच्या आईवर जास्तच संतापला आणि त्याने सरळ त्याच्या आजीला फोन करून बाबांची तक्रार केली.

 

यावर आजीने बाबांना सुनावलं की तु त्या मुलाशी वागतो आहेस, ते चुकीचं आहे. त्याला अशी अवघड शिक्षा देऊ नको. यावर बाबांनी आजीला आठवण करून दिली की ते लहान असताना आई म्हणून तेव्हा आजीने त्यांना यापेक्षाही जास्त कठोर शिक्षा केली होती.

बाग नेहमीच हिरवीगार राहण्यासाठी 'हा' पदार्थ नियमितपणे झाडांना द्या- इतर कोणत्याही खताची गरजच नाही

वेळप्रसंगी मारही दिला होता. मुलाला चूक लक्षात यावी, म्हणून वडील जे काही वागत होते, ते आजीला खूप कठोर वाटत होतं. ते तुम्हालाही तसंच वाटतंय का, हा प्रश्न त्या वडिलांनी सोशल मिडियावर विचारला आहे. त्यावर अनेकांनी वेगवेगळ्या कमेंट टाकल्या आहेत. तुम्हालाही आजी म्हणतेय तसंच वाटतेय का?

 

टॅग्स :पालकत्वलहान मुलं