Lokmat Sakhi >Parenting > ताप आल्यावर मुलं काहीच खात नाहीत? डॉक्टर देतात महत्त्वाचा सल्ला, अशावेळी...

ताप आल्यावर मुलं काहीच खात नाहीत? डॉक्टर देतात महत्त्वाचा सल्ला, अशावेळी...

Diet tips for children if they have cold-cough and fever : खाल्लं नाही तर अंगात ताकद कशी राहणार, असा स्वाभाविक प्रश्न पडणाऱ्या आई-वडीलांसाठी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2024 03:33 PM2024-09-26T15:33:03+5:302024-09-26T15:36:32+5:30

Diet tips for children if they have cold-cough and fever : खाल्लं नाही तर अंगात ताकद कशी राहणार, असा स्वाभाविक प्रश्न पडणाऱ्या आई-वडीलांसाठी...

Diet tips for children if they have cold-cough and fever : Children do not eat anything when they have a fever? Doctors give important advice, in case... | ताप आल्यावर मुलं काहीच खात नाहीत? डॉक्टर देतात महत्त्वाचा सल्ला, अशावेळी...

ताप आल्यावर मुलं काहीच खात नाहीत? डॉक्टर देतात महत्त्वाचा सल्ला, अशावेळी...

सध्या राज्याच्या बऱ्याच भागात जोरदार पाऊस आहे. अचानक पडणारे ऊन, रात्रीचा गारवा आणि एकाएकी येणारा मुसळधार पाऊस यांमुळे सध्या सर्वच वयोगटात व्हायरल इन्फेक्शन झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे येणारा ताप, सर्दी, खोकला यांमुळे अनेक जण बेजार आहेत. मोठ्यांना हे त्रास झाले तर किमान सांगता येते. पण लहान मुलांना ताप, सर्दी, घसादुखी यांसारख्या समस्या झाल्या तर काहीच सांगता येत नाही. अशावेळी मुलं मलूल होतात, नुसती पडून राहतात. बरीच मुलं तर सतत किरकिर करतात आणि आईला अजिबात सोडत नाहीत (Diet tips for children if they have cold-cough and fever). 

एकदा सर्दी-खोकला किंवा ताप झाला की लहान मूल त्यातून बाहेर यायला काही किमान कालावधी जावा लागतो. या काळात मुलं अजिबात खात नाहीत. खाल्लं नाही तर अंगात ताकद कशी राहणार असा स्वाभाविक प्रश्न आई वडीलांना पडतो. मग आई-आजी मुलांना त्यांना आवडेल असे काही ना काही करुन खाऊ घालण्याचा प्रयत्न करत राहतात. पण तोंडाला पडलेली कोरड, कडवटपणा यामुळे मुलांना काहीच नकोसे वाटत असते. अशावेळी नेमकं काय करावं, काय द्यावं असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर डॉ. प्राची घोडे काही महत्त्वाच्या टिप्स देतात, त्या काय सांगतात पाहूया...

१. मुलांना ताप असेल तर खूप जबरदस्ती खायला घालणे योग्य नाही.

२. तसेच काहीतरी खाऊदे म्हणून त्यांना बिस्कीटे, चॉकलेट किंवा जंक फूड देणे अजिबात चांगले नाही. 

३. ताप असताना अग्नी मंद झालेला असतो, अशात आपण तेलकट किंवा जंक दिले तर पचनशक्तीवर त्याचा ताण येतो आणि त्याचे रुपांतर ताप वाढण्यात होऊ शकते. 

४. त्यामुळे अशावेळी पचनाला हलके पण ताकद देणारे पदार्थ द्यायला हवेत. असे पदार्थ कोणते ते पाहूया..

काय देऊ शकता? 

 1.भाताची पेज
2.भाताची लापशी
3.तांदुळाचे आटवल
4.मुगाचे कढण
5.कुळीथचे कढण
6.भोपळ्याचे सार
7.आमसूलचे सार
8.साळीच्या लाह्याची पेज
9.सातूची बिन दुधाची खीर
10.नॉनव्हेज चे पिवळं
11.साळीच्या लाह्याच पाणी
12.साळीचा चिवडा
12.मुगाचे थालीपीठ किंवा धीरडे

(Image : Google)
(Image : Google)

काय द्यायचे नाही

1.जंक फूड
2.बिस्कीट-दूध
3.चहा-बिस्कीट
4.फळ
5.पालेभाजी
6.कडधान्य
7.मासे, मटण, चिकन
8.पॅकेट सूप
9.पॅकेट ज्यूस
10.चिवडा, 
11.जाम, सॉस


Web Title: Diet tips for children if they have cold-cough and fever : Children do not eat anything when they have a fever? Doctors give important advice, in case...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.