विकेंडला किंवा एरवीही बाहेर जेवायला जायचं म्हटलं की मुलांची पहिली फर्माईश असते ती म्हणजे फ्रेंच फ्राइज. कॅफे, हॉटेल किंवा एखादा मॉल सगळ्याच ठिकाणी हे फ्राइज सहज मिळत असल्याने मूल लहान असेल तर पालकही निर्धास्त असतात. आमची मुलं हॉटेलमध्ये गेल्यावर स्वतःच फ्रेंच फ्राइज ऑर्डर करतात असं काही पालक अभिमानाने सांगतात. एवढेच नाही तर आजकाल फ्रोझन फ्रेंच फ्राइज आणून घरच्या घरी ते मुलांना स्नॅक्स म्हणून झटपट बनवून दिले जातात. लहान मुलांची बर्थडे पार्टी असो किंवा ख्रिसमस, न्यू इयर पार्टी त्यात फ्रेंच फ्राइज असलाच हवेत. अगदी पिझ्झा, बर्गरचा कोम्बो पॅकही या फ्रेंच फ्राइज शिवाय पूर्ण होत नाही (Disadvantages of French fries).
पण तुम्हाला माहीत आहे का की, याचा परिणाम थेट मुलांच्या आरोग्यावर होतो. बटाटा किंवा तळलेले म्हणूनच नाही तर त्यात वापरलेले प्रीझर्वेटिव्हज आरोग्यासाठी मोठ्या प्रमाणात घातक ठरू शकतात. आम्ही काही हे फ्राइज रोज नाही देत, कधीतरीच देतो. पण हे तुम्ही मुलांना कमी प्रमाणात देत असलात तरी यातील घटक त्याची सवय किंवा व्यसन लावण्यास करणीभूत ठरू शकतात. त्यामुळे मुले पुन्हा पुन्हा फ्रेंच फ्राइज खाण्याचा आग्रह धरतात. याच फ्रेंच फ्राइजमुळे मुलांच्या आरोग्यावर होणारे तीन गंभीर परिणाम व त्यांची कारणं आरोग्य आणि लाईफ्स्टाईल तज्ज्ञ डिंपल जांगडा सांगतात, ती कोणती पाहूया..
१. अक्रोलोमईट फोरमेशन- बटाटा तळला जातो (डीप फ्राय) तेव्हा त्यातून अक्रोलोमईट नावाचे केमिकल रिलीज होते. त्यामुळे अनेक आजार होतात. यामध्ये न्यूरो टॉक्सिसिटी, रिप्रोडक्टिव्ह टॉक्सिसिटी यांचा समावेश असतो. त्यामुळे प्रजनन क्षमता कमी होणे, कर्करोगला करणीभूत कर्सेनोजेनीक घटकांची निर्मिती होणे अशा समस्या उद्भवतात.
२. टॉक्सिक लिपीड ऑक्सीडेशन (TLO) - मोठमोठ्या नामांकित पिझ्झा, बर्गर चेनमध्ये मिळणारे फ्रेंच फ्राइज खायला मुलांना फारच आवडतात. पण या एक पॅक फ्रेंच फ्राइजमध्ये २५ सिगारेट इतके घातक घटक असतात. याची आपण कधी कल्पनाच केली नसेल.
३. मेथमिडोफोस नामक कीटकनाशक - फ्रेंच फ्राइजमध्ये मेथमिडोफोस नामक कीटकनाशक २००९ पासून वापरण्यात येत असल्याचे आढळून आले आहे. ज्याच मोठ्या प्रमाणात कॅलरीज, फॅट्स असतात, तसेच त्यातून कोणतेही पोषणमूल्य मिळत नाही. या घटकामुळे दीर्घकालीन गंभीर आजार उद्भवण्याची शक्यता असते.