Join us  

दिवाळी सुटीत मुलांसाठी 4 भन्नाट ॲक्टिव्हिटीज, नव्या गोष्टी शिकतील, टीव्ही- मोबाईलपासून राहतील दूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 08, 2023 5:04 PM

Diwali Vacation Activities for Childrens parenting tips : मुलं सहज करु शकतील आणि एन्जॉय करतील अशा अॅक्टीव्हीटीज कोणत्या ते पाहूया...

मुलांना शाळेला सुट्टी लागली की त्यांची सतत बोअर होतंय, मी काय करु अशी भूणभूण सुरू होते. नुकतीच परीक्षा संपलेली असल्याने आणि करायला वेगळं काहीच नसल्याने ते आपल्याला काहीच सुधरु देत नाहीत. अशावेळी त्यांच्या डोक्याला, हाताला चांगले काहीतरी काम देण्याची आवश्यकता असते. नाहीतर तर स्वत: तर वैतागतातच पण आपल्यालाही वैताग देतात. सुट्टी लागल्यावर पहिला ४ दिवस चांगले जातात मात्र नंतर मुलांना कंटाळा यायला लागतो. आपल्या डोक्यावर ऑफीस, घरकाम, साफसफाई, फराळ, खरेद्या अशा असंख्य गोष्टी असताना त्यात मुलांना एंटरटेन करणे खरंच शक्य नसतं. मग मुलं आपला मोबाईल, लॅपटॉप नाहीतर टीव्ही यांचा पर्याय स्वीकारतात आणि तासनतास स्क्रीनसमोर घालवतात. मात्र योग्य नियोजन केले तर आपण मुलांना अशावेळी चांगल्या काही अॅक्टीव्हीटीज नक्कीच देऊ शकतो. त्यासाठी आधीपासून काही गोष्टींची तयारी मात्र असायला हवी. पाहूयात मुलं सहज करु शकतील आणि एन्जॉय करतील अशा अॅक्टीव्हीटीज कोणत्या (Diwali Vacation Activities for Childrens parenting tips)...

१. दिवाळी तयारी

लहान मुलांना रंगवायला किंवा क्राफ्टच्या गोष्टी करायला खूप आवडते. अशावेळी आपण मुलांना थर्माकोल ग्लासपासून, फुगा आणि दोऱ्यापासून करता येतील असे आकाशकंदील, पणत्या रंगवणे, पणत्या सजवणे अशा काही अॅक्टीव्हिटीज नक्की देऊ शकतो. यासाठी मुलांची आवड लक्षात घेणे, त्यानुसार घरात उपलब्ध असलेले किंवा सहज आणू शकतो असे सामान यांची जुळवाजुळव करणे आवश्यक असते. पण यामुळे आपली दिवाळीची घराची सजावट होते आणि मुलांचाही वेळ चांगला जाण्यास मदत होते. 

(Image : Google )

२. गॅलरी सजावट

आपण दिवाळीच्या निमित्ताने घर आवरायला काढतो. यावेळी आपण गॅलरीत किंवा खिडकीच्या ग्रीलमध्ये नाहीतर इनडोअरही काही रोपं नव्याने लावतो. ही रोपं लावणं हे एक महत्त्वाचे काम असते. तसेच कुंड्या रंगवणे किंवा सजवणे असेही एक काम असू शकते. दिवाळीत आपण गॅलरी लायटींग आणि इतर सजावटीच्या गोष्टींनी मस्त सजवतो. मुलं थोडी मोठी असतील आणि हे काम करताना आपण त्यांची नक्कीच मदत घेऊ शकतो.

३. क्रिएटीव्ह अॅक्टीव्हीटीज

हल्ली बाजारात बरीच अॅक्टीव्हीटी पुस्तकं किंवा गेम्स मिळतात. दिवाळीत आपल्याला पाडवा, भाऊबीज किंवा एकूण दिवाळीच्या निमित्ताने काही ना काही गिफ्ट द्यायचे असते. यामध्ये अगदी साध्या ग्रिटींगपासून ते मोठ्या भेटवस्तूपर्यंत बऱ्याच गोष्टींचा समावेश असतो. लहान मुलांना करायला आवडेल असा ग्रिटींगचा सेट, होम डेकोरेशन वस्तू, दागिने असे काही गेम सेट आणल्यास मुलं अगदी सहज घरात हे तयार करु शकतात. त्यांनी हाताने केलेल्या गोष्टी आपण गिफ्ट म्हणून आपल्या जवळच्या मंडळींना दिल्या तर त्यांनाही खूप मस्त वाटते. 

(Image : Google )

४. छंद जोपासणे 

एरवी मुलांना खेळ, कला यांच्याशी निगडीत काही ना काही गोष्टी करायच्या असतात. पण शाळा, क्लासेस यांमध्ये त्यांचे शेड्यूल पूर्ण पॅक झालेले असते. मात्र दिवाळीत शाळा, क्लासेसना सुट्ट्या असतात. अशावेळी मुलांना आवडेल असा एखादा क्लास, अॅक्टीव्हीटी लावल्यास ते नक्कीच एन्जॉय करु शकतात. साधारण महिन्याभरातच नाताळची सुट्टी असल्याने मुलं हा दिवाळीत लावलेला क्लास किमान २ ते ३ महिने तरी नक्की करु शकतात. त्यामुळे या गोष्टीचा नक्की विचार करायला हवा. 

टॅग्स :दिवाळी 2023पालकत्वलहान मुलं