Join us  

मुलं खूप दंगा करतात, एक क्षण शांत बसत नाही? चिडचिड करण्यापेक्षा मुलांच्या ऊर्जेला द्या ‘पॉझिटिव्ह’ वळण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2023 4:28 PM

Do 1 thing if your child is hyper active : या मुलांशी नेमकं कसं वागावं म्हणजे आपलं म्हणणंही खरं होईल आणि मुलंही थोडी शांत होतील

मुलांना सांभाळणं हे वाटतं तितकं सोपं काम नाही. पूर्वी घरात भरपूर माणसं असायची त्यामुळे कोणाचं ना कोणाचं तरी मुलांकडे लक्ष असायचंच. आता कुटुंब लहान झाली त्यामुळे मुलांकडे लक्ष देणे हे फक्त आईचे किंवा बाबांचेच काम झाले. त्यात मूल हायपर अॅक्टीव्ह असेल तर विचारायलाच नको. अशा मुलांना शांत करणे आणि आपले ऐकायला लावणे हे महाकठिण काम असते. ही मुलं सतत इतक्या हालचाली आणि दंगा करतात की त्यांना एखादी गोष्ट सांगणं किंवा आपल्या म्हणण्याप्रमाणे काही करुन घेणं फारच अवघड जातं. अशीमुलं एकतर हायपर अॅक्टीव्ह असतात नाहीतर खूप स्टबर्न असतात. त्यामुळे त्यांना आपले म्हणणे पटवून देणे आणि तसे करायला लागणे हा एकप्रकारचा टास्कच असतो. अशावेळी या मुलांशी नेमकं कसं वागावं म्हणजे आपलं म्हणणंही खरं होईल आणि मुलंही थोडी शांत होतील ते पाहूया (Do 1 thing if your child is hyper active)...

(Image : Google)

उपाय काय? 

बरेचदा अशा मुलांना अमुक करु नको, तमुक करु नको असे सतत सांगावे लागते. ते काही करत नाहीत ना यासाठी त्यांच्याकडे बारकाईने लक्ष द्यावे लागते. अशावेळी मुलांच्या सतत नादी लागण्यापेक्षा त्यावर उत्तम असा उपाय शोधून काढणे केव्हाही जास्त चांगले. कारण तसे करण्याचा काहीच उपयोग होत नाही आणि आपल्यालाच त्यांना ओरडून किंवा सतत सांगून त्रास होतो. 

त्याऐवजी त्यांना शारीरिक कामात किंवा अॅक्टीव्हीटीजमध्ये एंगेज करणे केव्हाही जास्त चांगले. यामध्ये ग्राऊंडला घालणे, एखादा खेळाचा क्लास लावणे. त्यांना आवडणाऱ्या कलेचा क्लास लावणे यामुळे त्यांचे लक्ष एखाद्या नेमक्या गोष्टीत गुंतून राहते आणि सतत काहीतरी वेगळं करण्यापेक्षा त्यांच्या हातून चांगले काहीतरी शिकून किंवा करुन होते. यामुळे त्यांच्यातली असणारी जास्तीची एनर्जीही बाहेर पडायला मदत होते. त्यामुळे मूल ऐकत नाही किंवा खूप दमवते असं करत त्यांना दोष देण्यापेक्षा त्यावर उत्तम उपाय शोधून काढणे केव्हाही जास्त चांगले. 

 

टॅग्स :पालकत्वलहान मुलं