"कितीवेळा अंगावर पांघरुण घालायचे", "थंडी नाही का वाजत?", असे पालक आणि मुलांमधील संवाद प्रत्येक घरात आपण ऐकलेच असतील. आपल्याला बरेचदा घरातील लहान मुलांच्या बाबतीत हा एक कॉमन अनुभव आला असेल, झोपेत मुलांच्या अंगावर कितीहीवेळा पांघरूण घातले तरीही ते पांघरुण अंगावरुन काढून टाकतात. रात्री मुलांच्या अंगावर आई - वडील पांघरूण घालून थकतात परंतु मुलं काही केल्या पांघरुण अंगावर घेत नाहीत. मुलांना थंडी लागेल या थंडीमुळे त्यांची झोपमोड होईल किंवा त्यांना गार लागून सर्दी - ताप येईल या विचाराने आई - वडील मुलांची खूप काळजी घेतात(Baby Sleep Without Blankets).
घरातील नवजात बाळापासून ते छोट्या मुलांपर्यंत कुणीच अंगावर पांघरुण ठेवत नाही अशी प्रत्येक पालकांची तक्रार असते. विशेष करुन पावसाळ्यात आणि हिवाळ्यात वातावरणात गारवा असतो अशावेळेस मुलांना थंडी लागून मुलं आजारी पडू नये अशी पालकांना भीती असते. परंतु मुलं काही केल्या ऐकत नाहीत. अशावेळी पालकांच्या मनात अनेक प्रश्न उभे राहतात. मुलांना नक्की थंडी लागत असेल की नसेल ? किंवा मुलांना आपल्यापेक्षा कमी थंडी लागत असेल का ? तसेच मुलांना ऐन थंडीच्या वातावरणात देखील गरम होत असेल का ? असे अनेक प्रश्न पालकांच्या मनात डोकावतात. लहान मुलं अंगावर पांघरुण घेत नसल्याचे नेमके कारण काय असू शकते ते पाहूयात(Do babies feel less cold than adults).
लहान मुलं अंगावर पांघरुण का घेत नाही ?
खरंतर, लहान मुलांना आपल्यापेक्षा खूप कमी थंडी वाजते. बाळ जेव्हा आईच्या पोटात असते तेव्हा त्याच्या शरीराचे तापमान मेंटेंन करायचे मुख्य काम आईचे गर्भाशय करते. पण बाळ जेव्हा बाहेर येते तेव्हा बाहेरच्या तापमानाशी जुळवून घेण्यासाठी बाळांमध्ये एक सिस्टम अॅक्टिव्ह होते ज्याला 'नॉन शिवरिंग थर्मोजेनसीसी' आणि हे होत आपल्या शरीरातील ब्राऊन फॅट्समुळे.
ब्राऊन फॅट्समुळे आपल्या शरीरात उष्णता तयार होते. याउलट, आपल्या संपूर्ण शरीरात उष्णता तयार करण्याचे मुख्य काम हे ब्राऊन फॅट्सच करते. १ ग्रॅम ब्राऊन फॅट्सपासून आपल्या शरीरात इतर टिशूंपेक्षा ३०० पट जास्त उष्णता तयार होते. याचबरोबर हे ब्राऊन फॅट्स आपल्या शरीरात काही विशिष्ट जागेवरच असतात. आपल्या शरीरातील मणका, हृद्य, किडनी अशा अवयवांजवळ हे ब्राऊन फॅट्स फार मोठ्या प्रमाणात असतात.
W सीटिंग पोझिशनमुळे मुलांना होतात आजार, करा ५ व्यायाम - ' हे ' गंभीर त्रास टाळा...
आपल्या शरीरातील ब्राऊन फॅट्स जिथून रक्ताला अतिशय सोप्या पद्धतीने गरम ठेवू शकतात त्याच जागी ते फार मोठ्या प्रमाणात असतात. लहानपणी आपल्या शरीरात या ब्राऊन फॅट्सची संख्या फार मोठ्या प्रमाणात असते. याचबरोबर जसजसे आपले वय वाढत जाते तसे आपल्या शरीरातील या ब्राऊन फॅट्सची संख्या कमी कमी होत जाते. याच मुख्य कारणामुळे लहान मुलांना आपल्यापेक्षा कमी थंडी वाजते याचे ब्राऊन फॅट्स हे मुख्य कारण आहे. याच कारणामुळे लहान मुलं अंगावर पांघरुण घेत नाही. कितीहीवेळा त्यांच्या अंगावर पांघरुण घातले तरीही ते पांघरुण सरळ झटकून देतात.
लहान मुलांच्या शरीरात असणाऱ्या ब्राऊन फॅट्समुळे त्यांच्या शरीरात सतत उष्णता तयार होत असते. याचबरोबर लहान मुलानांच्या शरीरात जितक्या मोठ्या प्रमाणावर उष्णता सारखी तयार होते असते तितक्या पटकन ही उष्णता कमी देखील होते. या कारणांमुळे मुलांना हलकी चादर किंवा कॉटनच्या कापडाच्या चादरीत कव्हर करुन ठेवणे देखील तितकेच गरजेचे असते.