बऱ्याच पालकांना असा अनुभव येतो की त्यांचं मुलं त्यांच्यावर बऱ्याचदा चिडतं. थोडं मनाविरुद्ध झालं की मुलांचा ताल जातो. ते लगेच आरडाओरडा करायला लागतात. मग अशावेळी ते घरात आहेत, बाहेर आहेत की एखाद्या पाहुण्यांकडे गेलेले आहेत, याचंही त्यांना भान राहात नाही. अशावेळी मुलांचा असा सगळा गोंधळ पाहून पालकांनाही राग येतो आणि ते ही मुलांवर ओरडतात. पालकांचं असं वागणं अगदी साहजिक आहे. पण हे काही तुमच्या प्रश्नाचं सोल्यूशन नाही. यामुळे ताण जास्तच वाढत जातो आणि त्यातून काहीच निष्पन्न होत नाही. म्हणूनच अशावेळी मुलांचा राग शांत करण्यासाठी ही एक युक्ती करून पाहा (how to handle the anger and rude behaviour of kids?). यामुळे मुलांचा आरडाओरडा कमी होण्यास नक्कीच मदत होईल.(what to do If your child gets rude sometimes?)
मुलं रागाच्या भरात ओरडून बोलत असतील, आरडाओरडा करत असतील तर?
मुलं जेव्हा तुमच्याशी उद्धटासारखं बोलत असतील, तुमच्यावर चिडत असतील तर अशावेळी पालकांनी थोडा संयम ठेवून ही एक कृती करून पाहावी. मुलांचं असं वागणं पालकांना सहन होत नाही. पण तरीही स्वत:वर थोडा संयम ठेवा आणि हा प्रयोग करा, असं पॅरेण्टिंग एक्सपर्टने ishinna_b_sadana या इन्स्टाग्राम पेजवर सुचवलं आहे.
पालकांच्या 'या' गोष्टी वाढवतात मुलांवरचा ताण; म्हणूनच मुलं शाळेतून घरी आल्यावर त्यांना कधीच.....
यामध्ये त्या सांगतात की मुल जेव्हा चिडेल तेव्हा तुम्ही एकदम शांत व्हा आणि अतिशय हळुवारपणे मुलांना म्हणा की बाळा तु बरा आहेस ना? काय झालं तुला? या पद्धतीने का बोलत आहेस? तरीही मुल शांत झालं नाही तर लगेच त्यांना म्हणा की मला दिसत आहे की तुला कशाचा तरी त्रास होत आहे. काय त्रास होतो आहे तुला नेमका? या दोन प्रश्नातच मुलांच्या आवाजाची पट्टी बऱ्यापैकी खाली आलेली असेल.
पण जर असं नाहीच झालं तर त्याला जवळ बोलवा, प्रेमाने मिठी मारा आणि सांगा की बाळा मला तुझी काळजी वाटते आहे. तुला काय झालं आहे, तु का चिडला आहेस, हे मला ऐकायचं आहे, तुझ्याशी बोलायचं आहे.
धुतल्यानंतर स्वेटर, लोकरीचे कपडे सैलसर होतात, फिटींग बिघडते? ४ चुका टाळा, कपडे राहतील नव्यासारखे
पण या शब्दांत आपण नको बोलायला. तू आधी शांत हो आणि नंतर तुला काय हवं आहे, काय होतं आहे हे सांग. तुमचे हे प्रेमाचे बोल नक्कीच मुलांना मृदू करतील.