मुलं शाळेतून घरी आल्यानंतर आपली बॅग बाजूला ठेवतात आणि टिव्हीसमोर बसतात किंवा खेळायला जातात. यामुळे मुलांचे व्यवस्थित शेड्यूल तयार होत नाही. संध्याकाळच्यावेळी मुलं अभ्यास घेऊन बसतात नंतर जेवण करून झोपतात यामुळे मुलांच्या बऱ्याच सवयी बिघडतात. जर तुम्हाला मुलांच्या या सवयी बदलायच्या असतील तर तुम्ही त्यांच्याकडून काही गोष्टी करून घेऊ शकता. ज्यामुळे मुलं चांगल्या सवयी शिकतील आणि त्यांना बरेच फायदे मिळतील. (Do these 4 things as soon as the kids come home from school)
शाळेतून आल्यानंतर मुलांना या गोष्टी करायला सांगा
मुलं शाळेत बऱ्याच विद्यार्थ्यांना भेटतात. खेळतात, मस्ती करतात आणि वेगवेगळ्या परिसराला हात लावातात. अशा स्थितीत मुलांना आजारांपासून दूर ठेवण्यासाठी तुम्ही त्यांना अंघोळ करायला सांगा. ज्यामुळे मुलांना फ्रेश वाटेल.
मुलं शाळेतून आल्यानंतर थकतात. अभ्यास इतर एक्टिव्हीटीजमुळे त्यांना थकवा येतो. शाळेतून आल्यानंतर मुलांना नॅप घ्यायला सांगा, अंघोळीनंतर आणि झोपून उठल्यानंतर मुलांना फ्रेश वाटेल आणि त्यांचा अभ्यासही चांगला होईल.
मुलं शाळेतून घरी आल्यानंतर बसून त्यांच्याशी बोला. दिवसभरातील त्यांचा वेळ त्यांनी कसा घालवला त्याबद्दल त्यांना विचारा. फक्त मोठी माणसंच नाही तर लहान मुलं सुद्धा ताण-तणावातून जात असतात. अशा स्थितीत मुलांना त्यांची दिनचर्या विचारायला विसरू नका.
मुलं बाहेर जाऊन खेळत राहतात. त्यापेक्षा शाळेतून आल्यानंतर त्यांना कोणता ना कोणता माईंड गेम खेळायला शिकवा. मुलांना कोड सोडवणं, चेस, पजल्स किंवा ऊनो हे खेळायला शिकवू शकता. याशिवाय बाहेर जाऊन मुलांना काही वेळ खेळ शिकवा.