कधी कधी मुलं (kids) खूपच त्रास देतात. अजिबातच ऐकत नाहीत. अभ्यास करण्यासाठी किटकिट, जेवण करण्यासाठी किटकिट ... असं प्रत्येक गोष्टीतच खूप त्रास देतात. काम तर अजिबातच ऐकत नाहीत. शिवाय घरभर नुसता पसारा आणि गोंधळ... अशी अनेक पालकांची तक्रार असते. बिचारे पालकही दिवसभर थकलेले असतात. मग मुलांचा असा त्रास त्यांना सहन होत नाही. शेवटी एका क्षणाला पालक खूपच वैतागतात आणि मुलांना एखादा फटका (slapping) मारतात. सुरुवातीला कधीतरीच होत जाणारी ही गोष्ट मग नंतर मात्र वारंवार होत जाते.
पालक मुलांना मारतात, सुरुवातीला काही काळ त्यांना वाईट वाटतं. पण नंतर मात्र ते हे सगळं विसरून जातात. पण मुलांच्या मनावर मात्र ही गोष्टी खूप खाेलवर रुजत जाते. त्यांना काय वाटतं हे त्यांना व्यक्तही करता येत नाही.
शर्मिला टागोर म्हणतात, लग्न केलं-मुलं झाली- बिकिनीही घातली म्हणून लोकांनी नावं ठेवली पण..
त्यामुळे मग ते आणखी जास्त आरडाओरडा करणं, रडणं अशाप्रकारे त्यांच्या भावना मोकळ्या करतात. पण असं होणं मुलांच्या दृष्टीने अजिबातच योग्य नाही. मुलांना कधीतरीच मारतो, असं म्हणून पालकांनी त्यांच्या कृत्याचं कधीच समर्थन करू नये. कारण त्यामुळे नेमकं काय होतं, याविषयीचा एक व्हिडिओ इन्स्टाग्रामच्या ishinna_b_sadana या पेजवर शेअर करण्यात आला आहे.
मुलांना मारत असाल तर....
१. ऐकत नाहीत म्हणून मुलांना तुम्ही मारत असाल तर तुमच्याविषयी मुलांच्या मनात भीती निर्माण होते. ते तुमच्याशी मोकळेपणाने वागू किंवा बोलू शकत नाहीत. अशामुळे पुढे चालून मुले तुमच्यापासून त्यांच्या अनेक गोष्टी लपवून ठेवतील.
केस खूप गळाल्याने कपाळाच्या दोन्ही बाजूला टक्कल दिसतंय? १ खास उपाय, २ आठवड्यातच केस वाढतील
२. पालक मुलांना सतत मारत असतील तर मुलांचा आत्मविश्वास कमी होऊ लागतो आणि मुलांना स्वत:विषयी न्यूनगंड वाटतो.
३. सतत मार खाऊन खाऊन मुले कोडगी होतात. मग काही काळाने तुमच्या बोलण्याचा त्यांच्यावर काहीच परिणाम होत नाही.
४. तुम्ही ज्याप्रकारे त्यांच्याशी वागता तसेच त्यांचे व्यक्तिमत्त्व घडत जाते. त्यांनाही मग मित्रमैत्रिणींवर, लहान भावंडांवर हात उगारण्याची सवय लागू शकते.