Lokmat Sakhi >Parenting > आपण नाही का लहानपणी मार खाल्ला, काय बिघडलं मुलांना रट्टे दिले तर असं वाटतं तुम्हालाही?

आपण नाही का लहानपणी मार खाल्ला, काय बिघडलं मुलांना रट्टे दिले तर असं वाटतं तुम्हालाही?

Do You Hit Your Child For Discipline : मुलांवर हात उगारल्याने त्याचा त्यांच्या मनावर चुकीचा परीणाम होतो.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2023 09:54 AM2023-04-18T09:54:41+5:302023-04-18T12:56:42+5:30

Do You Hit Your Child For Discipline : मुलांवर हात उगारल्याने त्याचा त्यांच्या मनावर चुकीचा परीणाम होतो.

Do You Hit Your Child For Discipline : Do you hit children to discipline them? This has 3 effects on their mind... | आपण नाही का लहानपणी मार खाल्ला, काय बिघडलं मुलांना रट्टे दिले तर असं वाटतं तुम्हालाही?

आपण नाही का लहानपणी मार खाल्ला, काय बिघडलं मुलांना रट्टे दिले तर असं वाटतं तुम्हालाही?

आपल्या मुलांना चांगली शिस्त असावी, त्यांनी लोकांसमोर नीट वागावं, बोलावं म्हणून आपण मुलांना लहान असल्यापासूनच चांगल्या सवयी लावायचा प्रयत्न करतो. असे करणे मुलांच्या भवितव्यासाठी योग्य असते असे पालक म्हणून आपल्याला वाटत असते. मूल एक चांगला व्यक्ती, नागरीक व्हावा यासाठी आपण लहानपणापासूनच त्याला वेगवेगळ्या गोष्टी शिकवण्याचा प्रयत्न करतो. काही वेळा आपण त्यांना या गोष्टी समजावून सांगतो (Do You Hit Your Child For Discipline).

ऐकले नाही तर ओरडतो किंवा धाक दाखवतो आणि तरीही ऐकले नाही तर आपण मुलांवर हातही उगारतो. मुलांनी ऐकावे आणि त्यांना चांगल्या सवयी लागाव्यात हाच आपला त्यामागचा मुख्य उद्देश असतो. पण अशाप्रकारे मुलांवर हात उगारल्याने त्याचा त्यांच्या मनावर चुकीचा परीणाम होतो. त्यामुळे मुलांवर हात उगारण्याआधी ४ वेळा विचार करावा. त्याचा त्यांच्या मानसिकतेवर काय परीणाम होईल याचा अंदाज घ्यायला हवा. मुलांना मारल्याने नेमके काय होते पाहूया.

१. मुलं अग्रेसिव्ह होतात- मारणं हा काहीसा हिंसक पर्याय असल्याने मुलांच्या मनावर त्याचा चुकीचा परीणाम होतो. त्यामुळे मारणे आणि अशाप्रकारे हिंसा करणे हे योग्य असते असे त्यांना लहान वयातच वाटायला लागते. 


२. मुलं जास्त हट्टी होतात - मुलांना आपण त्यांनी ऐकावं म्हणून नेहमी मारत असू तर मारल्यानंतरच ऐकायचं असतं असा त्यांचा समज होण्याची शक्यता असते. त्यामुळे तुम्ही त्यांना मारत नाही तोपर्यंत ते ऐकत नाहीत. 

३. आत्मविश्वास कमी होतो - कोणत्याही वयातील व्यक्तीला समोरच्या व्यक्तीकडून आदर मिळावा अशी किमान अपेक्षा असते. पण या मुलांना हा आदर स्वत:च्याच घरात न मिळाल्याने त्यांचा आत्मविश्वास कमी होण्याची शक्यता असते.


 

Web Title: Do You Hit Your Child For Discipline : Do you hit children to discipline them? This has 3 effects on their mind...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.