Join us  

मुलांनी यशस्वी व्हावं असं वाटतं? अपेक्षांचं ओझं मुलांवर न टाकता १ गोष्ट करा; विकास दिव्यकिर्तींचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 06, 2024 5:09 PM

मुलांच्या पालनपोषणाबाबत दृष्टी कोचिंग सेंटरचे संस्थापक आणि माजी आयएस विकास दिव्यकिर्ती यांनी  सांगितेल की पालकांनी आपल्या मुलांकडून फार अपेक्षा ठेवू नयेत.

मुलांचे पालन-पोषण करणं कोणत्याच आई वडिलांसाठी सोपं नसते. या दरम्यान मुलांना आणि पालकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. (Parenting Tips in Marathi) मुलांना चांगल्या सवयी शिकवाव्या लागतात. मुलांना वेळीच चांगली शिस्त किंवा वळण लावले  नाही तर भविष्यात याचा त्रास तुम्हालाच होतो. (Parenting Tips By Vikas Divyakirti)

मुलांच्या पालनपोषणाबाबत दृष्टी कोचिंग सेंटरचे संस्थापक आणि माजी आयएस विकासस दिव्यकिर्ती यांनी  सांगितेल की पालकांनी आपल्या मुलांकडून फार अपेक्षा ठेवू नयेत. मुलांसमोर जितकं साधेपणाने राहता येईल तसं राहालं. मुलावर कोमत्याही प्रकारचा  ताण येईल असे वागू नका. (Doctor Vikas Divyakirti Suggest Parents Should Not Pressurise Their Child To Become Successful) 

विकास सांगतात जास्त यश मिळवल्यानंतर काही मुलं आई-वडीलांच्या म्हातारपणात त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात. मुलं आपल्या पालकांना फक्त मनी ऑर्डर पाठवतात. म्हणूनच मुलांना  जास्त यशस्वी होण्यासाठी दबाव टाकू नका. त्यांच्या म्हणण्यानुसार मुलं आपल्या योग्यतेनुसारआयुष्यात काही ना काही करतील आणि पालकांसोबत आयुष्यभर राहतील ज्यामुळे आई-वडीलसुद्धा आनंदी राहतील. मुलांवर आपल्या इच्छा लादू नका कारण  तुमची मुलं खूष राहतील तरच तुम्ही आनंदी राहाल आणि घरातील वातारवणही चांगले राहील.

मुलांसोबत राहिल्याने तुम्हाला एक वेगळाच आनंद मिळेल. आपल्या मुलांवर ओझं टाकू नका, मुलं कठीण काळात तुमची साध देतील. इतर पालकांना पाहून तुमची पालकत्वाची पद्धत बदलू नका. टेडएक्स टॉकच्या एज्युकेटर ऑस्टेजा लँडबर्गिनी यांनी सांगितले की, न्युरोसायंटिस्ट्सना दिसून आलं की दीर्घकाळ ताण-तणावात राहिल्यामुळे मेंदूची संरचना आणि कार्यशैलीमध्ये बदल होतो.

जेव्हा आई-वडील जास्त  अपेक्षा ठेवतात तेव्हा  मुलं ताण-तणावखाली येतात. पुढे जाऊन त्यांना एंग्जायटी, डिप्रेशन, मूड स्विंग्स यांसारखे विकार उद्भवतात. पालकांच्या  अपेक्षा पूर्ण करता करता मुलं ताण-तणावाखाली येतात. ज्यामुळे त्यांना मानसिक आजार होऊ शकतात म्हणून मुलांकडून जास्त अपेक्षा न ठेवता त्यांच्या मानसिक आरोग्याची काळजी घ्यायला हवी. तर मुलं यशस्वी होण्यापासून राहणार नाहीत.

टॅग्स :पालकत्व