Lokmat Sakhi >Parenting > लहान मुलं चहा पित असतील तर त्यांची उंच वाढत नाही?-हे खरं की खोटं?

लहान मुलं चहा पित असतील तर त्यांची उंच वाढत नाही?-हे खरं की खोटं?

Does Tea Stunt Your Growth? Facts vs Myths उंची वाढणार नाही म्हणून अनेक पालक मुलांना चहा पिऊ देत नाहीत,चहाचा आणि उंचीचा काय संबंध?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2023 07:05 PM2023-07-27T19:05:53+5:302023-07-27T19:11:23+5:30

Does Tea Stunt Your Growth? Facts vs Myths उंची वाढणार नाही म्हणून अनेक पालक मुलांना चहा पिऊ देत नाहीत,चहाचा आणि उंचीचा काय संबंध?

Does Tea Stunt Your Growth? Facts vs Myths | लहान मुलं चहा पित असतील तर त्यांची उंच वाढत नाही?-हे खरं की खोटं?

लहान मुलं चहा पित असतील तर त्यांची उंच वाढत नाही?-हे खरं की खोटं?

आपल्या मुलांची उंची चांगली असावी असं प्रत्येक आई - वडिलांना वाटतं. एका विशिष्ट वयानंतर मुलांची उंची पुढे वाढत नाही. मुलांची उंची योग्य वाढावी, यासाठी पालक आपल्या पाल्यांना विविध हेल्दी ड्रिंक, फूड किंवा व्यायाम करायला सांगतात. परंतु, उंची वाढण्यासाठी मुलांनी काय खावं काय टाळावं, या गोष्टी माहित असणं गरजेचं आहे. असं म्हणतात चहा जास्त प्यायल्याने उंची खुंटते. जास्त प्रमाणात कॅफिन घेतल्याने मुलांची उंची थांबते. मात्र, या दाव्यामागे काय खरं आणि काय खोटं हे कोणालाच ठाऊक नाही(Does Tea Stunt Your Growth? Facts vs Myths).

यासंदर्भात, बाबू ईश्वर शरण हॉस्पिटलचे डॉ समीर सांगतात, ''मुलांची उंची वाढणं हे त्यांच्या अनुवांशिकत्वेवर अवलंबून असतं. चहा प्यायल्याने मुलांच्या उंचीवर परिणाम होतो का? तर नाही होत. असे अमेरिकेत झालेल्या संशोधनातून समोर आले आहे. चहामध्ये कॅफीन आढळते. कॅफीन मुलांच्या आरोग्यासाठी चांगले नाही. यामुळे शरीरातील कॅल्शियमचं प्रमाण कमी होतं.''

लहान मुलांना चहा प्यायला द्यावा की नाही? वाढीच्या वयात चहा पिणं फायद्याचं की तोट्याचं?

चहा पिण्याचे तोटे

जास्त चहा पिणे मुलांच्या आरोग्यासाठी हानिकारक मानले जाते. याचे जास्त सेवन केल्यास आरोग्याचे काही प्रमाणात नुकसान होऊ शकते. चहा प्यायल्याने पचनक्रिया कमकुवत होऊ शकते. पोटात गॅससारखा त्रास निर्माण होऊ शकतो.

जास्त चहा प्यायल्याने झोपेचं चक्र बिघडतं, झोप कमी लागते.

जास्त चहा प्यायल्याने छातीत जळजळ आणि नर्वसनेसची समस्या देखील उद्भवते.

मुलांना नियमांत करकचून बांधून ठेवलं तर मुलं ऐकतच नाहीत! ४ गोष्टी पालकांनी करायलाच हव्यात

जास्त चहा पिणे पोट आणि आतड्यांसाठी हानिकारक मानले जाते.

चहा प्यायल्याने शरीरातील चयापचय क्रिया बिघडू शकते.

चहा ऐवजी मुलांनी काय प्यावे?

निरोगी राहण्यासाठी मुलांनी चहाऐवजी दूध किंवा फ्लेवर्ड दूध प्यावे. लहान मुलांनी चहा कमी प्यावे, टाळले तर अतिउत्तम. कारण चहा प्यायल्याने उंची तर नाही, परंतु आरोग्य बिघडू शकते.

Web Title: Does Tea Stunt Your Growth? Facts vs Myths

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.