Join us

लहानपणापासून प्रचंड हूशार असतात 'या' ४ सवयी असलेली मुलं; टेंशन घेणं सोडा-स्मार्ट होतील मुलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2024 10:20 IST

These 4 Activities Of Children These Habits : मुलांमध्ये अशा काही सवयी असू शकता ज्यामुळे तुमची मुलं हूशार  आहेत हे तुम्हाला आधीच कळेल. 

मुलांना वाढवणं काही सोपं काम नाही. मुलांची पर्सनॅलिटी आणि आयुष्य चांगले असावे यासाठी पालकत्वाची पद्धत फार महत्वाची असते. प्रत्येक आई वडील आपल्या मुलांना चांगेल शिक्षण देऊ इच्छितात. मुलांचे वळण बिघडू  नये यासाठी त्यांच्या वागण्याबोलण्यावरही लक्ष देतात. (Don't Get Trouble By These 4 Activities Of Children These Habits Can Be sign Of Intelligence)

अनेकदा मुलांच्या क्षमतेवर याचा परिणाम होतो. मुलांनी काही गोष्टी ऐकल्या नाहीत किंवा कोणत्याही गोष्टीसाठी नाही म्हटले तर त्यांना ओरडण्यापेक्षा इंटेलिजेंस लेव्हल तपासू शकता. मुलांमध्ये अशा काही सवयी असू शकता ज्यामुळे तुमची मुलं हूशार  आहेत हे तुम्हाला आधीच कळेल.  (Parenting Tips In Marathi)

लवकर न ऐकणं

सतत बोलावल्यानंतरही मुलं ऐकत नसतील आणि स्वत:च्या दुनियातच व्यस्त असतील तर जराही त्रास करून घेऊ नका. मुलं तुमच्याकडे दुर्लक्ष करतात असा त्याचा अर्थ नाही. मुलं कामात इतके व्यस्त झाले असतील की त्याकडे त्यांचे लक्ष गेले नसेल. मुलांमध्ये फोकस करण्याची क्षमता खूपच चांगली असते. 

इकडे तिकडे फिरत राहणं

मुलं शांतता न ठेवता इकडे तिकडे फिरत असतील किंवा इतर वस्तूंना स्पर्श करत असतील याचा अर्थ असा की तुमची मुलं जिज्ञासू वृत्तीची आहेत. जिज्ञासा असलेली मुलं गोष्टी वेगाने समजतात.

आई-वडीलांची मदत न घेणं

बऱ्याच मुलांना स्वत:ची काम स्वत: करायला आवडतात.  आई वडीलांनी मुलांची मदत नको असते. मुलांच्या या सवयींमधून त्यांचा आत्मविश्वास दिसून येतो. मुलांमध्ये आत्मविश्वास असेल तर ते स्वत: काहीही करण्याची तयारी ठेवतात.

स्टोरी सांगणं

अनेक मुलं वेगवेगळ्या प्रकारच्या घडलेल्या गोष्टी एखाद्या गोष्टीप्रमाणे सांगतात. अनेक आई वडिलांना वाटते की मुलं खोटं बोलू लागली आहेत. पण ही सवय सांगते की तुमच्या मुलांचा मेंदू खूपच एक्टिव्ह आणि क्रिएटिव्ह आहे. ज्यामुळे त्यांना प्रत्येक गोष्ट समजून घ्यायला आवडते.

टॅग्स :पालकत्व