Lokmat Sakhi >Parenting > इंग्लंडच्या राणीच्या नात सुनेलाही छळतो 'मॉम गिल्ट';तेच नोकरी करणाऱ्या प्रत्येक आईचं दुःख..

इंग्लंडच्या राणीच्या नात सुनेलाही छळतो 'मॉम गिल्ट';तेच नोकरी करणाऱ्या प्रत्येक आईचं दुःख..

जगातील सर्वात चर्चित महिलांपैकी एक असणाऱ्या आणि राजघराण्याच्या सदस्य असणाऱ्या डचेस ऑफ केंब्रिज प्रिन्सेस केट मिडलटन यांनी "मॉम गिल्ट" विषयी केलेलं एक विधान प्रचंड व्हायरल झालं आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 01:32 PM2021-08-23T13:32:33+5:302021-08-23T15:49:26+5:30

जगातील सर्वात चर्चित महिलांपैकी एक असणाऱ्या आणि राजघराण्याच्या सदस्य असणाऱ्या डचेस ऑफ केंब्रिज प्रिन्सेस केट मिडलटन यांनी "मॉम गिल्ट" विषयी केलेलं एक विधान प्रचंड व्हायरल झालं आहे.

Duchess of Cambridge, Kate Middleton's statement about "Mom Guilt" | इंग्लंडच्या राणीच्या नात सुनेलाही छळतो 'मॉम गिल्ट';तेच नोकरी करणाऱ्या प्रत्येक आईचं दुःख..

इंग्लंडच्या राणीच्या नात सुनेलाही छळतो 'मॉम गिल्ट';तेच नोकरी करणाऱ्या प्रत्येक आईचं दुःख..

Highlightsकेट मिडलटन म्हणजे जगभरातील प्रभावी महिलांपैकी एक असणारे व्यक्तिमत्त्व. तिच्या स्टाईल, तिचे कपडे, तिचे फॅशन स्टेटमेंट किंवा अगदी गरोदरपणात तिला कशाचे डोहाळे लागले होते, याची चर्चाही जगाच्या कानाकोपऱ्यात होते.

"घार फिरे आकाशी, लक्ष तिचे पिल्लापाशी..." या ओळी कामानिमित्त घराबाहेर पडाव्या लागणाऱ्या प्रत्येक आईच्या मनस्थितीचे यथार्थ वर्णन करणाऱ्या आहेत. अगदी ब्रिटनच्या राजघराणातल्या बायकांनाही या मनस्थितीतून जावं लागलं आहे. हिच मनातली ठसठस व्यक्त केली आहे, इंग्लंडच्या राणीची नात सून म्हणजेच डचेस ऑफ केंब्रिज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रिन्सेस केट मिडलटन यांनी. म्हणजेच काय तर आपल्याकडे शेतावर काम करणारी एखादी अशिक्षित आई असो की थेट ब्रिटनच्या राजघराण्यातली सुनबाई... कामासाठी बाहेर पडणाऱ्या प्रत्येक आईची आपल्या लेकराप्रती असणारी भावना मात्र अगदी एकसारखी आहे. 

 

केट मिडलटन म्हणजे जगभरातील प्रभावी महिलांपैकी एक असणारे व्यक्तिमत्त्व. तिच्या स्टाईल, तिचे कपडे, तिचे फॅशन स्टेटमेंट किंवा अगदी गरोदरपणात तिला कशाचे डोहाळे लागले होते, याची चर्चाही जगाच्या कानाकोपऱ्यात होते. मातृत्व आणि स्त्रियांसंदर्भातही केटने अनेक विधानं केले आहेत आणि त्यांची जगभर चर्चाही झाली आहे. 

केटने काही महिन्यांपुर्वी "मॉम गिल्ट" याविषयी एक विधान केले होते. ही तिची पोस्ट आता पुन्हा एकदा प्रचंड व्हायरल झाली आहे. यामध्ये ती असं म्हणाली होती की, कामासाठी घराबाहेर पडणाऱ्या प्रत्येक आईला या भावनेतून जावं लागतं. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर "मॉम गिल्ट" म्हणजेच प्रत्येक वर्किंग वुमनला आपल्या मुलाबाळांची काळजी वाटून छळणारं दु:ख.

 

आपण घराबाहेर जातो, काम करतो, आपली स्वत:ची ओळख कमावतो, असा आनंद नोकरी करणाऱ्या प्रत्येक आईला असतोच. पण त्यासोबतच आपली नोकरी आपल्या आणि आपल्या अपत्याच्या आड येते आहे का, आपण नोकरी करण्याच्या नादात आपल्या मुलांकडे दुर्लक्ष तर करत नाही ना, ही भावना प्रत्येक आईला मनोमन छळत असते. हेच दु:ख केटनेही मांडलंय. ती म्हणते की आई असणाऱ्या प्रत्येकीला हे दु:ख छळतं असतं. पण तरीही जी नोकरी करणारी आई म्हणजे की मला "मॉम गिल्ट" वगैरे असं काही वाटत नाही, ती आई खाेटं बाेलत असते. 

 

नोकरी करणाऱ्या आईने हे लक्षात ठेवावं..
नोकरी आणि बाळ या दोन्ही गोष्टी सांभाळणाऱ्या आईला कायम एक प्रश्न छळत असतो, तो म्हणजे आपण करतोय ते योग्य आहे का, आपल्या बाळापेक्षा आपलं काम महत्त्वाचं आहे का, पण असे प्रश्न पडले आणि "मॉम गिल्ट" असला तरी आईने हे कायम लक्षात ठेवावं, की ती जे काम करत आहे, ते तिच्या पाल्याच्या अधिक चांगल्या आयुष्यासाठी आहे. काम आणि घर हे सांभाळून जो काही वेळ आपण मुलांना देऊ तो सर्वोत्तम असावा, याची काळजीही प्रत्येक वर्किंग वुमनने घ्यावी, असंही केट म्हणते.

 

Web Title: Duchess of Cambridge, Kate Middleton's statement about "Mom Guilt"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.