Lokmat Sakhi >Parenting > लहान मुलांच्या हातात मोबाइल देणं धोक्याचं, रिसर्चचा दावा- आक्रमक-आक्रस्ताळ्या मुलांचं भवितव्य काय?

लहान मुलांच्या हातात मोबाइल देणं धोक्याचं, रिसर्चचा दावा- आक्रमक-आक्रस्ताळ्या मुलांचं भवितव्य काय?

Early Access to Smartphones can Impact Mental Health of Kids as They Become Adults : लहान मुलांच्या हातात मोबाइल देत आता तर त्यांना तुम्ही एकाजागी बसवून ठेवाल पण त्यांच्या भवितव्याचं काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2023 10:11 AM2023-05-19T10:11:27+5:302023-05-19T16:07:52+5:30

Early Access to Smartphones can Impact Mental Health of Kids as They Become Adults : लहान मुलांच्या हातात मोबाइल देत आता तर त्यांना तुम्ही एकाजागी बसवून ठेवाल पण त्यांच्या भवितव्याचं काय?

Early Access to Smartphones can Impact Mental Health of Kids as They Become Adults :Early Access to Smartphones can Impact Mental Health of Kids as They Become Adults : Giving mobile phones to children at a young age? Growing up affects mental health... | लहान मुलांच्या हातात मोबाइल देणं धोक्याचं, रिसर्चचा दावा- आक्रमक-आक्रस्ताळ्या मुलांचं भवितव्य काय?

लहान मुलांच्या हातात मोबाइल देणं धोक्याचं, रिसर्चचा दावा- आक्रमक-आक्रस्ताळ्या मुलांचं भवितव्य काय?

मोबाइल किंवा टीव्ही पाहणे हे लहान मुलांसाठी अतिशय आवडीचे काम असते. त्यातही घरातील इतर मंडळी जर सतत स्क्रीनपुढे असतील तर ते पाहून मुलांनाही तीच सवय लागते. मुलं सतत स्क्रीनचा हट्ट करतात. काही केल्या ऐकत नाहीत आणि तासनतास स्क्रीनसमोर असतात अशा प्रकारच्या तक्रारी पालक नेहमीच करताना दिसतात. यावरुन अनेकदा मुलं ओरडा खातात, प्रसंगी मारही खातात. सध्या अगदी १ ते २ वर्षाच्या मुलांनाही या स्क्रीनचे वेड असते. स्क्रीनचे वेड इतके वाईट असते की ते एकदा लागले की त्याचे अक्षरश: व्यसन लागते. मग वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ पाहणे, कार्टून पाहणे, गेम्स खेळणे अशा एक ना अनेक गोष्टी मुलं मोबाईल किंवा टीव्हीवर करत राहतात (Early Access to Smartphones can Impact Mental Health of Kids as They Become Adults). 

सुरुवातीला मोबाइलचा वापर ही ओरडण्याची बाब असते. मात्र हळूहळू याचे रुपांतर व्यसनात कधी होते हे पालकांना आणि मुलांनाही लक्षात येत नाही. पालक मोबाइलवर असतील तर नकळत मुलंही मोबाइलची मागणी करतात. अनेकदा घरातली कामं, ऑफीसचे काम किंवा आणखी काही गोष्टींमुळे पालकच कमी वयात मुलांच्या हातात मोबाइल देतात. एकदा मुलांना मोबाइलची सवय लागली की ती कमी न होता दिवसेंदिवस वाढतच जाते. त्यामुळे मुलांना समजायला लागले की अभ्यास किंवा अन्य काही कारणांनी मुलांच्या हातात मोबाइल येतो. इतकेच नाही तर आता गरज म्हणूनही अनेक पालक मुलांकडे लहान वयात मोबाइल घेऊन देतात. याचा मुलांच्या शारीरिक, बौद्धिक आणि मानसिक वाढीवर विपरीत परीणाम होतो, तो कसा-पाहूया.

(Image : Google)
(Image : Google)

वॉशिंग्टनमधील सेपियन लॅब्स या स्वयंसेवी संस्थेने नुकतेच एक संशोधन केले आहे.  या अभ्यासात 18 ते 24 वर्षे वयोगटातील मुलांच्या मानसिक आरोग्याची तपासणी केली गेली. ज्या वयात त्यांना पहिल्यांदा स्वतःचा स्मार्टफोन किंवा टॅबलेट मिळाला. या अभ्यासात भारतातील 4000 व्यक्तींसह 27,969 प्रौढांचा डेटा गोळा करण्यात आला. 'एज ऑफ फर्स्ट स्मार्टफोन अँड मेंटल वेलबीइंग आउटकम्स' असे या संशोधनाला शीर्षक देण्यात आले होते. या अभ्यासानुसार, सध्याच्या 18 ते 24 वर्षांच्या वयोगटातील मुलांचे मानसिक आरोग्य खराब आहे. महिलांच्या बाबतीत याचा परिणाम जास्त प्रमाणात झाल्याची नोंद यामध्ये घेण्यात आली आहे. 

अर्धवट कळत्या वयात मोबाइल वापरल्याने आत्महत्येचे विचार, इतरांप्रती आक्रमकतेची भावना, वास्तविकतेपासून अलिप्त राहण्याची भावना आणि मतिभ्रम या समस्या तरुणांमध्ये दिसून आल्या. दक्षिण आशियासह भारतातही हे सगळे असेच असल्याचे या अभ्यासात नोंदवण्यात आले होते. कमी वयात स्मार्टफोन मालकीचा असणाऱ्या मुली आणि मुलांमध्ये या समस्यांचे प्रमाण जास्त असल्याचे दिसून आले असल्याची नोंद या अभ्यासात करण्यात आली आहे. तंत्रज्ञानाचा अतिरेक लहान मुले आणि युवकांच्या मानसिक आरोग्यावर किती परिणाम करतोय, हे यातून दिसून आले आहे. 

Web Title: Early Access to Smartphones can Impact Mental Health of Kids as They Become Adults :Early Access to Smartphones can Impact Mental Health of Kids as They Become Adults : Giving mobile phones to children at a young age? Growing up affects mental health...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.