मुलं ड्राय फ्रुट्स खाण्याकडे फारच दुर्लक्ष करतात. हिवाळ्यात कोणत्या ना कोणत्या फळांचे किंवा ड्राय फ्रुट्सचे सेवन करायलाच हवे (Health Tips). यामुळे शरीराला गरमी मिळते आणि आवश्यक पोषक तत्वही मिळतात. सुका मेवा खाणं शरीरासाठी फायदेशीर ठरतं. पण मुलं या पौष्टीक पदार्थांपासून लांब पळतात. मुलं ड्राय फ्रूट्स खाण्यासाठी काही खास ट्रिक्सचा वापर करू शकतात. (Easiest Way To Feed Dry Fruits To Children)
मुलांच्या आहारात तुम्ही बदाम, अक्रोड, काजू, पिस्ता, मनुके या ड्राय फ्रुट्सचा समावेश करू शकता. हे सर्व पदार्थ एका ताटलीत काढून बारीक तुकड्यांमध्ये चिरून घ्या. नंतर सर्व नट्स आणि ड्राय फ्रुट्स मिक्स करून एका काचेच्या बरणीत भरा. सगळ्यात आधी ड्रायफ्रुट्स कापून नंतर त्यावर मध घाला. या पद्धतीनं ड्राय फ्रुट्स मधाच्या बरणीत भरा.
हिवाळ्यात सुका मेवा कसा खावा
सगळ्यात आधी ड्राय फ्रुट्समध्ये वाटलेला गरम मसाला मिसळा. गरम मसाला कमी प्रमाणात घाला जेणेकरून त्याची चव कळणार नाही. नंतर मधात बुडलेले ड्रायफ्रुट्सपैकी रोज १ ते २ चमचे मुलांना खाऊ घाला. यामुळे मुलांना पोषक तत्व मिळतील आणि वजनही वाढू लागेल.
वजन वाढवण्यासाठी ड्राय फ्रुट्स कसे खावेत?
टॉट्स एण्ड मॉम्सच्या रिपोर्टनुसार मुलं २-३ वर्षांची असतील तर तुम्ही ड्रायफ्रुट्स भिजवून नंतर बारीक करून त्याची पेस्ट मुलांना भरवू शकता. मुलांना दात आल्यानंतर त्यांना बारीक करून ड्रायफ्रुट्स चावता येतील असे बारीक तुकडे द्या. ज्यामुळे त्यांना व्यवस्थित चावायची सवय लागेल. भिजवलेले ड्राय फ्रुट्स दुधात घालून मुलांना देता येतील किंवा ड्राय फ्रुट्स पराठा हा सुद्धा चांगला पर्याय आहे. ड्राय फ्रुट्स हेवी असल्यामुळे पचायलाही जड असतात ज्यामुळे वजन वाढ टाळता येते.
गुडघे, कंबर खूपच दुखते? ५ मिनिटांत करा हेल्दी रेसिपी, चाळिशीनंतरही सांधे दुखणार नाहीत
या हेल्दी पद्धतीनं ड्राय फ्रुट्स खाल्ल्यास वजन वाढते. मधात काजू, बदाम आणि अक्रोड भिजवून खाल्ल्ल्यानं वजन वाढतं. मुलांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी ड्राय फ्रुट्स खायला हवेत. काही दिवसातंच सडपातळ मुलं निरोगी, सुदृढ दिसू लागतील. मधात भिजवलेले ड्रायफ्रुट्स घातल्यास याची चव मुलांना फार आवडेल. तुम्ही ही ट्रिक नक्की ट्राय करा.