Lokmat Sakhi >Parenting > मुलं जेवताना फार नखरे करतात? पटापट पोटभर जेवत नाहीत, ५ टिप्स- लागेल एकाजागी बसून जेवण्याची सवय

मुलं जेवताना फार नखरे करतात? पटापट पोटभर जेवत नाहीत, ५ टिप्स- लागेल एकाजागी बसून जेवण्याची सवय

Effective tips to make kids finish the meal : यामुळे पालकांचं एक टेंशन कमी होईल आणि उपाशी असल्यामुळे मुलांची होणारी चिडचिड नियंत्रणात राहील.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2023 04:05 PM2023-01-25T16:05:51+5:302023-01-25T16:40:01+5:30

Effective tips to make kids finish the meal : यामुळे पालकांचं एक टेंशन कमी होईल आणि उपाशी असल्यामुळे मुलांची होणारी चिडचिड नियंत्रणात राहील.

Effective tips to make kids finish the meal : Getting Your Baby To Finish Food | मुलं जेवताना फार नखरे करतात? पटापट पोटभर जेवत नाहीत, ५ टिप्स- लागेल एकाजागी बसून जेवण्याची सवय

मुलं जेवताना फार नखरे करतात? पटापट पोटभर जेवत नाहीत, ५ टिप्स- लागेल एकाजागी बसून जेवण्याची सवय

मुलं पोटभर जेवत नाहीत. फार नखरे करतात. खातच नाहीत नीट. भाज्या तर नकोच असतात. पोटभर जेवत नाहीत मग किरकिर करतात. चटकमटक खातात अशा अनंत तक्रारी पालक करतात. अनेकदा मुलांच्या खाण्याच्या नखऱ्याने जेरीस येतात. अशावेळी काय करावं हे सांगणाऱ्या या काही साध्याशा टिप्स.


मुलांच्या आवडीच्या पदार्थांचा जेवणात समावेश असावा

मुलांनी जेवण लवकर संपवावं यासाठी  त्यांचे आवडीचे पदार्थ  ताटात असू द्या.  कोणताही विचार न करता खायला देऊ नका. जर मुलांना समोसा खायला आवडत असेल तर तुम्ही घरी समोसे बनवू शकता. समोसा बनवताना मैदा घालण्याऐवजी होल ग्रेन पीठाचा वापर करा. वाटाणे, बटाटे, गाजर यांचं हेल्दी फिलिंग तुम्ही त्यात भरू शकता. 

जेवणात विविधता असायला हवी

मुलं जेवण अर्धवट सोडतात कारण त्यांच्या तोंडाची चव बिघडलेली असते.  तुम्ही बाळाला एकाच प्रकारचं जेवण दिल्यानं असं होत असावं.  जर तुम्ही मुलांना जेवणाच्या ताटात एकापेक्षा जास्त पदार्थांचे ऑपश्न्स दिले तर ते पोटभर जेवतील.  आहारात रंगेबीरंगी पदार्थांचा समावेश करा.

मुलांना जास्त खायला देऊ नका

जास्त जेवण वाढल्यास मुलं व्यवस्थित खात नाहीत. म्हणून थोड्या थोड्या वेळानं मुलांना खायला देत राहा.  एकावेळी जास्त खायला  देणं टाळा. आपल्या आहारात रंगेबेरंगी फळं, भाज्यांचा समावेश करा.  वेगवेगळ्या स्टफिंगसह चपाती बनवा.  हार्ट, स्मायली, स्टारशेपच्या स्टफ चपात्या करा.

मुलांना कुकींग प्रकियेत  सहभागी करून घ्या

मुलांना स्वयंपाक करण्याच्या प्रक्रियेत समाविष्ट केले पाहिजे. मुलाला कसे खायचे, कसे बनवायचे ते समजावून सांगा. यामुळे जेवल्यासारखे वाटेल आणि मूल पोटभर निरोगी अन्न खाण्यास सक्षम होईल. तुम्ही मुलाला किराणा सामान आणायलाही सांगू शकता.

Web Title: Effective tips to make kids finish the meal : Getting Your Baby To Finish Food

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.