Lokmat Sakhi >Parenting > मुलं अभ्यास करताना सारखी चुळबूळ करतात- एकाजागी बसतच नाहीत? ३ सोपे व्यायाम, मुलांची वाढेल एकाग्रता

मुलं अभ्यास करताना सारखी चुळबूळ करतात- एकाजागी बसतच नाहीत? ३ सोपे व्यायाम, मुलांची वाढेल एकाग्रता

Brain Exercise For Kids: मुलं शांत चित्ताने एका जागी बसून अभ्यासच करत नाहीत, अशी तुमचीही तक्रार असेल तर मुलांकडून हे व्यायाम करून घ्या (Exercise for improving concentration)...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2023 05:00 PM2023-10-16T17:00:49+5:302023-10-16T17:02:01+5:30

Brain Exercise For Kids: मुलं शांत चित्ताने एका जागी बसून अभ्यासच करत नाहीत, अशी तुमचीही तक्रार असेल तर मुलांकडून हे व्यायाम करून घ्या (Exercise for improving concentration)...

Exercise for improving concentration of children, How to improve concentration of kids? Brain exercise for kids | मुलं अभ्यास करताना सारखी चुळबूळ करतात- एकाजागी बसतच नाहीत? ३ सोपे व्यायाम, मुलांची वाढेल एकाग्रता

मुलं अभ्यास करताना सारखी चुळबूळ करतात- एकाजागी बसतच नाहीत? ३ सोपे व्यायाम, मुलांची वाढेल एकाग्रता

Highlightsतुमची मुलंही तुम्हाला असाच त्रास देत असतील तर त्यांच्याकडून हे काही व्यायाम करून घ्या

काही मुलं खूप जास्त ॲक्टीव्ह असतात. अतिशय चंचल आणि चपळ. एका जागी शांततेत बसून काही काम करणं त्यांना जमतच नाही. अशी मुलं अभ्यासाला बसायलाही खूपच त्रास देतात. ५- १० मिनिटे शांतपणे बसतील तर शपथ. अशा मुलांच्या आई मग खूपच वैतागून जातात. या मुलांना अभ्यासाला कसं बसवावं, त्यांचं अभ्यासात लक्ष लागावं म्हणून काय करावं, हा प्रश्न त्यांना सतत पडलेला असतो (How to improve concentration of kids?). तुमची मुलंही तुम्हाला असाच त्रास देत असतील तर त्यांच्याकडून हे काही व्यायाम करून घ्या (Brain Exercise For Kids). हे व्यायाम मुलांची एकाग्रता वाढविण्यासाठी निश्चितच उपयुक्त ठरतील. (Exercise for improving concentration of children)

 

मुलांची एकाग्रता वाढविणारे व्यायाम

हे काही व्यायाम इन्स्टाग्रामच्या maonduty या पेजवर शेअर करण्यात आले आहेत. व्यायाम अतिशय सोपे असून त्यांना ब्रेन एक्सरसाईज असं म्हणूनही ओळखलं जातं.

गरबासाठी करा खास हेअरस्टाईल, बघा ७ ट्रेण्डी- स्टायलिश पर्याय, गरबा खेळताना चारचौघीत उठून दिसाल

हे व्यायाम केल्यामुळे मुलांची एकाग्रता तर वाढतेच पण Fine Motor Skills, Visual Motor Skills, Eye Hard Coordination वाढण्यासही मदत होते. पुढे सांगितलेले व्यायाम तुम्हीही मुलांसोबत करा. म्हणजे त्यांना त्या व्यायामाची गोडी लागेल. फक्त हातांचा वापर करून हे व्यायाम करायचे आहेत. त्यामुळे बसल्या जागी कुठेही तुम्ही ते करू शकता. 

 

पहिला व्यायाम

हा व्यायाम करण्यासाठी दोन्ही तळहात मोकळे करा. आता एका हाताच्या सगळ्या बोटांची टोके एकमेकांना जोडून घ्या आणि ती एकत्रितपणे दुसऱ्या हाताच्या तळव्याला मध्यभागी लावा. आता दुसऱ्या हातानेही तसाच व्यायाम करा. हा व्यायाम २ ते ३ मिनिटे करावा.

स्वयंपाकघरात चटणी, मीठ, लोणच्यासाठी छोट्या नाजूक बरण्या घ्यायच्या? पाहा ३ सुबक पर्याय, किचनचा लूकच बदलेल

दुसरा व्यायाम

हा व्यायाम करण्यासाठी दोन्ही तळहात मोकळे करा. आता एका हाताचा अंगठा त्याच हाताच्या तळहातावर ठेवा, त्याचवेळी दुसऱ्या हाताची बोटे सरळ ठेवा. एकानंतर एका हाताने सलगपणे हा व्यायाम २ ते ३ मिनिटे करा.

करिश्माचं करिअर व्हावं म्हणून आई तिच्या पाठीशी उभी राहिली, माझ्यावेळी मात्र.. करिना कपूर सांगतेय..

तिसरा व्यायाम

दोन्ही हातांची बोटे एकमेकांमध्ये गुंफून घ्या. यानंतर एका हाताची बोटे उघडा, दुसऱ्या हाताची तशीच बंद ठेवा. एकानंतर एक दोन्ही हातांनी २ ते ३ मिनिटे हा व्यायाम करा. 

 

 

Web Title: Exercise for improving concentration of children, How to improve concentration of kids? Brain exercise for kids

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.