मुलांचा अभ्यास करून घेणं आणि वेळेवर झोपवणं या दोन्ही कामांसाठी पालकांना खूप स्ट्रगल करावे लागते. अशा स्थितीत आई वडील रागात मुलांवर हातही उचलतात. (Kids Health) पालकत्व ही गोष्ट आहे की संयम आणि समजून घेऊन केली तर मुलांना चांगले वळण लागते. कारण तुमची ही पद्धत चुकली तर शारीरिक, मानसिक आरोग्याला नुकसान पोहोचवू शकते. जर तुमची मुलं योग्यवेळी झोपत नसतील तर तज्ज्ञांनी सांगितलेले काही उपाय तुमच्या मुलांची स्लिप सायकल सुधारण्यात फायदेशीर ठरू शकतात. माऊन्ड्यूटी या इंस्टाग्राम पेजवर ६ टिप्स सांगण्यात आल्या आहेत. या टिप्स वापरून तुम्ही मुलांना न ओरडता शांततेत झोपू शकता. (Expert Tips To Improve Sleeping Cycle Of Child Parenting Tips Motherhood)
सगळ्यात आधी मुलांना रोज २ तास त्यांच्या आवडीचे आऊटडोअर गेम्स खेळायला पाठवा. ज्यामुळे मुलांचा शारीरिक आणि मानसिक विकास चांगला होईल याशिवाय मुलांचे शरीर थकणार नाही आणि मुलांना झोप चांगली येईल.
बेड टाईम म्हणजेच झोपायला जाण्याच्या ३ तास आधी मुलांना रात्रीचे जेवण द्या ज्यामुळे मुलांचे डायजेस्टिव्ह सिस्टिम चांगली होईल आणि झोपेची क्वालिटी चांगली होईल.
याव्यतिरिक्त तुम्ही बेड टाईमला मुलांना स्टोरी सांगायला विसरू नका. तुम्ही मुलांना मॉरल स्टोरीज ऐकवू शकता. ज्यामुळे मुलांमध्ये मॉरल वॅल्यूज वाढतील आणि मुलं चांगली व्यक्ती बनतील. याशिवाय क्रिएटिव्हिटीसुद्धा वाढेल.
मुलं मोठी असतील तर त्यांना बायोग्राफी वाचायला द्या. रोल मॉडेलही असतात. ज्यामुळे मुलं इंटेलिजेस वाढवण्याचे काम करतात.
मुलांना झोपवण्याच्या २ तास आधी मोबाईल अजिबात देऊ नका. कारण यामुळे त्यांची स्लिपिंग सायकल बिघडू शकते. बेड टाईमच्या आधी स्क्रीनच्या संपर्कात मुलांना येऊ देऊ नका.
शेवटची टिप अशी की दिवसा मुलांना रात्री किती वाजता झोपायचंय याचं टायमिंग सांगा, मुलांना समजावून सांगा की ते वेळेवर झोपले तर त्यांना रिवार्ड मिळेल. हे रूटीन तुम्ही २१ दिवस फॉलो केले तर मुलांना ओरडता शिस्त लागेल.