Join us  

मुलांचे अभ्यासात मन लागत नाही? आई-वडिलांनी या 5 चुका टाळा, मन लावून अभ्यास करतील मुलं

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2024 11:28 PM

मुलांना चुकीच्या रस्त्यावर जाण्यापासून रोखण्यासाठी त्यांचे जुने छंद पुन्हा जोपासायला हवेत.

आजच्या युगात मुलांना चांगला रस्ता दाखवणं हे  आव्हान बनलं आहे. मुलांच्या हातात जेव्हापासून मोबाईल आला आहे तेव्हापासून मुलं अभ्यासात फारसं लक्ष देत नाही.  मुलांना मोबाईलचं व्यसन लागतं तेव्हा ते सोडवणं कठीण होतं. मुलं मोबाईलमध्ये तासनातस व्यस्त असतात. मोबाईल हातातून घेतला की मुलांची चिडचिड होते काही मुलं स्ट्रेसमध्ये येतात. मोबाईलचं व्यसन मुलांना लागलं की ते सोडवणं कठीण  असतं. मुलांचे आयुष्य खराब होऊ नये यासाठी तुम्ही काही सोप्या टिप्स वापरू शकता. (Expert Told That Parents Are The Reason For Not Having A child Know How)

मुलं का बिघडतात ?

जेव्हा मुलं लहान असतात तेव्हा आई वडील यांच्या आवडीनुसार छंदामध्ये इन्वॉल्वह करतात. डान्स, म्युझिक, क्रिकेट आणि दुसऱ्या खेळांमध्ये स्वत:ला बिझी ठेवतात. पण जसजसं मूल मोठं होऊ लागतं तसतसं मुलांवर अभ्यासाचे प्रेशर वाढतं आणि आई वडील प्रियॉरिटीमध्ये अभ्यासाला महत्व द्यायला सांगतात. या प्रेशरमधून मुलं बाहेर निघू शकत नाही. प्रेशर हलकं करण्यासाठी मोबाईल किंवा इतर गोष्टींमध्ये पडतात. मुलांशी न बोलता तुम्ही त्यांच्यावर अभ्यासाचं प्रेशर ठेवत असाल तर त्यांना चुकीच्या रस्त्यावर जाण्यासाठी प्रोत्साहन देऊ नका. 

मुलांना चुकीच्या रस्त्यावर जाण्यापासून रोखण्यासाठी त्यांचे जुने छंद पुन्हा जोपासायला हवेत. त्या छंदांमुळे मुलं आनंदी राहतील. मुलांना क्रिकेट, टेनिस, डान्स अशा छंदांशी जोडून ठेवा ज्यामुळे मुलं आनंदी राहतील.  अनेकदा असं पाहिलं जातं की मुलं आपला आवडता छंद जोपासतात तेव्हा खूपच आनंदी असतात.

टॅग्स :पालकत्वलहान मुलं