Join us  

मुलांची उंचीच वाढत नाही? २ मिनिटांचा ‘हा’ व्यायाम रोज करून घ्या, ताडासारखी वाढेल उंची

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2024 4:56 PM

How Can Grow Fast Kids Height (Mulanchi unchi vadhvnyache upay) : मुलांची उंची चांगली वाढण्यासाठी ११ गोष्टी फॉलो करणं फार महत्वाचं आहे.

आपल्या मुलांची उंची व्यवस्थित वाढावी अशी प्रत्येक आई वडीलांची इच्छा असते यासाठी आई-वडील  आपल्या आरोग्याची खास काळजी घेतात. (Parenting Tips In Marathi) पण अनेकदा मुलांची उंची कमी राहून जाते. मुलांची उंची न वाढण्यामागे अनेक कारणं असू शकतात. हेल्थ एक्सपर्ट्सच्यामते डाएटबरोबर व्यायाम करण्याचा सल्ला दिला देतात. (How Can Grow Fast Kids Height)

योग्य पद्धतीने व्यायाम केल्यास मुलांची उंची वाढण्यास मदत होते. मुलांची चांगली वाढ होण्यासाठी  त्यांना दूध, पनीर, अंडी, पालेभाज्या अन्नधान्य, कडधान्य, फळं, फळांचा ज्यूस, ड्रायफ्रुट्स असे पौष्टीक पदार्थ भरवायला हवेत. सोपे व्यायाम प्रकार करून तुम्ही मुलांची उंची वाढवू (How to Increase Height Of Kids) शकता. 

फर्स्ट क्राय पेरेंटींगच्या रिपोर्टनुसार मुलांची उंची चांगली वाढण्यासाठी ११ गोष्टी फॉलो करणं फार महत्वाचं आहे. त्यात  संतुलित आहार, स्ट्रेचिंग , हँगिंग व्यायाम, योगा, दोरी उड्या, स्विमिंग, जॉगिंग, उत्तम झोप, झोपण्याची योग्य स्थिती, सुर्यप्रकाशात जाणं, सायकलिंग या गोष्टी करायला हव्यात. (Simple Way To Increase Height In Children) 

फक्त २ व्यायाम केल्यानं मुलांना भरपूर फायदे मिळतील (2 Exercise For Increase Kids Height)

मुलं सगळा दिवस उड्या मारून घालवतात त्याचा वर्कआऊट,  व्यायाम असाच होऊन जातो. दोन मिनिटांचा व्यायाम करायला जर तुम्ही त्यांना सांगाल तर ते हसत हसत करतील. कारण हा व्यायाम खूपच गमतीदार आहे. सगळ्यात आधी एका मॅटवर उभं राहा. त्यानंतर दोन्ही हात आपल्या पायांवर ठेवा. नंतर पायांवर  हात ठेवून उठून परत बसा आणि उभं राहा. उभं राहिल्यानंतर   खालच्या बाजूला पाहा नंतर वर पाहा.

हा व्यायाम केल्यानं शरीराला बरेच फायदे मिळतील

हा व्यायाम फक्त उंची वाढवण्यासाठीच फायदेशीर नाही तर या व्यायामाने मुलांनीही अनेक फायदे मिळतात. रोज हा व्यायाम केल्यानं शरीराला ताकद येते शरीर  लवचीक बनते.  यामुळे शरीराची क्षमता वाढते. या व्यायामाच्या मदतीने मुलांना कोणत्या गोष्टीवर फोकस करण्यासही मदत होते. मुलांची अभ्यासात एकाग्रता वाढते आणि शरीर अधिकच ताकदवान बनते. 

टॅग्स :पालकत्वलहान मुलं