मुलांना जन्म दिल्याने आपण पालक होतो. पण या मुलांचा शारीरिक, मानसिक, बौद्धिक विकास करणे हे मुलं मोठी होत जातात तसे आव्हानात्मक काम असते. आपले मूल उत्तम माणूस, यशस्वी व्यक्ती व्हावेत यासाठी लहानपणापासून आपण मुलांना असंख्य गोष्टी शिकवत आणि सांगत असतो. मुलांवर योग्य ते संस्कार करणे, त्यांना चांगली शिस्त लावणे आणि त्यांनी अभ्यास, कला, क्रिडा या सगळ्यामध्ये हुशार व्हावे यासाठी आपला कायम प्रयत्न सुरू असतो. मुलांची बुद्धी तल्लख असावी आणि त्यांनी सगळ्या गोष्टींमध्ये प्राविण्य मिळवावं अशी आपली प्रत्येकाची पालक म्हणून किमान अपेक्षा असते (Five foods to boost your child’s brain development).
मुलांचा मेंदू तल्लख होण्यासाठी ज्याप्रमाणे उत्तम शिक्षण, वातावरण मिळण्याची आवश्यकता असते त्याचप्रमाणे मुलांचे आहारातून चांगले पोषण होणेही आवश्यक असते. आहार हा मुलांना केवळ शारीरिकदृष्ट्या सक्षम करत नाही तर बौद्धिक वाढ चांगली होण्यासाठीही आहाराची महत्त्वाची भूमिका असते. पॅरेंटींग विथ ब्रेनिफाय या इन्स्टाग्राम अकाऊंटवर मुलांच्या मेंदूची चांगली वाढ व्हावी यासाठी नेमकं काय करायला हवं याविषयीचा सांगण्यात आलं आहे. यामध्ये मुलांच्या आहारात कोणत्या ५ गोष्टींचा समावेश करायला हवा त्याविषयी सांगितले आहे. हे ३ पदार्थ कोणते पाहूया...
१. आक्रोड आणि अॅव्हाकॅडो
सुकामेव्यातील आक्रोड आणि अॅव्हाकॅडो या फळात DHA म्हणजेच चांगले फॅटस भरपूर प्रमाणात असतात. मुलांच्या मेंदूचा विकास होण्यासाठी हा घटक आवश्यक असून मुलाना नियमितपणे हे दोन्हीही द्यायला हवे.
२. दूध आणि चीज
दूध आणि चीज यांमध्ये लोह आणि DHA हे २ घटक सोडून शरीराला आवश्यक असणारे बहुतांश घटक भरपूर प्रमाणात असतात. म्हणूनच आपल्याकडे दुधाला पुर्णान्न म्हटलेले असून लहान मुलांच्या आहारात दुधाचा आणि दुग्धजन्य पदार्थांचा आवर्जून समावेश करायला हवा.
३. हिरव्या पालेभाज्या
पालेभाज्या सगळ्यांनीच आवर्जून खायला हव्यात असं वारंवार सांगितलं जातं. याचं महत्त्वाचं कारण पालेभाज्यांमध्ये व्हिटॅमिन बी आणि लोह चांगल्या प्रमाणात असल्याने मेंदूचे पोषण होण्यासाठी त्या उपयुक्त ठरतात.
जंक फूड खाणे टाळून पोेषक पदार्थ आहारात भरपूर असणे. समतोल आहार वाढत्या वयात अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. आहारातून पुरेसं पोेषण न मिळाल्यानं मुलांची वाढ खुंटते. कुपोषणासह सुपोषण आणि खुरटलेली वाढ हे नव्या काळात मुलांचे प्रश्न गंभीर होत आहेत. त्यामुळे आहाराविषयी सजग असणं गरजेचं आहे.