Lokmat Sakhi >Parenting > मुलांच्या बौद्धिक विकासाला चालना देणाऱ्या ५ साध्या- सोप्या गोष्टी, करून बघा- मुले होतील तल्लख 

मुलांच्या बौद्धिक विकासाला चालना देणाऱ्या ५ साध्या- सोप्या गोष्टी, करून बघा- मुले होतील तल्लख 

Parenting Tips for Stimulating Child’s Brain: पालकांनी या काही गोष्टी नियमितपणे केल्या तरी मुलांच्या बौद्धिक विकासासाठी नक्कीच फायदा होऊ शकतो, असं मानसोपचार तज्ज्ञांचं मत आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2023 06:08 PM2023-01-09T18:08:33+5:302023-01-09T18:10:31+5:30

Parenting Tips for Stimulating Child’s Brain: पालकांनी या काही गोष्टी नियमितपणे केल्या तरी मुलांच्या बौद्धिक विकासासाठी नक्कीच फायदा होऊ शकतो, असं मानसोपचार तज्ज्ञांचं मत आहे.

Five simple activities to stimulate child’s brain and for improving child's concentration  | मुलांच्या बौद्धिक विकासाला चालना देणाऱ्या ५ साध्या- सोप्या गोष्टी, करून बघा- मुले होतील तल्लख 

मुलांच्या बौद्धिक विकासाला चालना देणाऱ्या ५ साध्या- सोप्या गोष्टी, करून बघा- मुले होतील तल्लख 

Highlightsयासाठी पालकांना खूप काही वेगळं करण्याची गरज नसते. फक्त आपल्याच काही कृतींमधून मुलांसाठी योग्य वातावरण तयार करणं आवश्यक असतं.

लहान मुलांमधील बौद्धिक- मानसिक क्षमतांचा पुरेपूर विकास होण्यासाठी त्यांना त्या दृष्टीने याेग्य चालना मिळणं, त्यांच्या भोवताली अनुकूल परिस्थिती निर्माण करणं गरजेचं असतं, असं मानसोपचार तज्ज्ञांचं मत आहे. यासाठी पालकांना खूप काही वेगळं करण्याची गरज नसते. फक्त आपल्याच काही कृतींमधून मुलांसाठी योग्य वातावरण तयार करणं आवश्यक असतं. ते कसं तयार करावं किंवा त्यासाठी पालकांनी कोणत्या गोष्टी आवर्जून कराव्या, याविषयीची माहिती मानसोपचार तज्ज्ञांनी parentingwithbrainify या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केली आहे.

मुलांच्या बौद्धिक विकासाला चालना देण्यासाठी...
१. मुलांशी भरपूर बोला

आजच्या पालकांना नेमका याच गोष्टींसाठी वेळ नाही. त्यामुळे मुले मोबाईल किंवा टीव्हीसमोर तर पालक कामानिमित्त लॅपटॉपवर आणि रिकाम्या वेळेत मोबाईलवर दिसून येतात. पण मुलांशी तुम्हाला शक्य होईल तेवढं बोला. त्यांना बोलतं करा. कारण यातून मुलांना ऐकण्याची, त्यांचे विचार मांडण्याची, व्यक्त होण्याची सवय लागते.

 

२. मुलांसाेबत कविता म्हणा
मुलांसमोर बडबड गीते किंवा कविता म्हणणे हा नुसताच टाईमपास नाही. यातून मुलांना नवनविन शब्द तर कळतातच, पण ताल- लय यांचं ज्ञान मिळतं. ताल- लयीचं गणित कळलं की त्यातून मेंदुचा विकास होत जातो.

दीपिका पादुकोणचा २१ हजारांचा पांढराशुभ्र मिडी ड्रेस, ड्रेसची किंमत ऐकूनच नेटिझन्स विचारत आहेत......

३. मुलांना पुस्तके वाचून दाखवा
मुलांना पुस्तकांतून वेगवेगळ्या गोष्टी वाचून दाखवल्या की आपोआपच त्यांचा शब्दसंग्रह विकसित होत जातो. शिवाय गोष्टीतलं एकेक पात्र डोळ्यासमोर आणताना त्यांची कल्पनाशक्ती, कृतीशिलता, एकाग्रता आणि विचार करण्याची क्षमता विकसित होत जाते.

 

४. मुलांसमोर एखादं वाद्य वाजवा
पालकांना जर एखादं वाद्य वाजवता येत असेल, तर त्यांनी ते मुलांसमोर आवर्जून वाजवावं. यामुळे मुलं त्यात गुंतून जातात. त्यामुळे मन एकाग्र होण्यास, मन शांत होण्यास मदत होते.

मराठी अभिनेत्रींचे संक्रांत स्पेशल लूक! बघा हलव्याचे दागिने आणि काळी साडी नेसून केलेला सुंदर साज

५. ॲक्टीव्ह खेळण्यांचा उपयोग करा
एखादा बॉल, फिरतं खेळणं असेल तर मुलांना सोबत घेऊन त्याच्याशी खेळा. यामुळे मुलांच्या डोळ्यांच्या आणि सोबतच त्यांच्या मेंदूचाही व्यायाम होतो. या खेळांमधून मुलं सुसंगती शिकतात. 

 

Web Title: Five simple activities to stimulate child’s brain and for improving child's concentration 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.