Lokmat Sakhi >Parenting > वाचून लक्षात राहत नाही-मुलांच्या अभ्यासाचं टेंशन येतं? ५ सवयी लावा, अभ्यासच घ्यावा लागणार नाही

वाचून लक्षात राहत नाही-मुलांच्या अभ्यासाचं टेंशन येतं? ५ सवयी लावा, अभ्यासच घ्यावा लागणार नाही

Five Tips To Make Your Child Smart And Intelligent : मुलांची बुध्दी वाढली तर त्यांच्यातील आत्मविश्वासही वाढतो आणि मुलं अधिक क्रिएटिव्ह बनतात.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2024 08:05 PM2024-07-28T20:05:08+5:302024-07-29T16:52:50+5:30

Five Tips To Make Your Child Smart And Intelligent : मुलांची बुध्दी वाढली तर त्यांच्यातील आत्मविश्वासही वाढतो आणि मुलं अधिक क्रिएटिव्ह बनतात.

Five Tips To Make Your Child Smart And Intelligent Tips For Raising Smart Kids | वाचून लक्षात राहत नाही-मुलांच्या अभ्यासाचं टेंशन येतं? ५ सवयी लावा, अभ्यासच घ्यावा लागणार नाही

वाचून लक्षात राहत नाही-मुलांच्या अभ्यासाचं टेंशन येतं? ५ सवयी लावा, अभ्यासच घ्यावा लागणार नाही

असं म्हटलं जातं की मुलं हे ओल्या मातीप्रमाणे असतात त्यांना  योग्य आकार देणं, त्यांच्याकडे लक्ष देणं हे आई वडीलांचे काम असते. (Parenting Tips) प्रत्येक आई वडिलांना असं वाटत असतं की आपण आपल्या मुलांना चांगले संस्कार द्यावेत मुलं बौद्धिक, मानसिक आणि भावनात्मक स्वरूपात मजबूत व्हायला हवीत अशी प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते. (Five Tips To Make Your Child Smart And Intelligent) मुलांची बुध्दी वाढली तर त्यांच्यातील आत्मविश्वासही वाढतो आणि मुलं अधिक क्रिएटिव्ह बनतात. (Tips For Raising Smart Kids)

१) मुलांना पुस्तकं वाचण्याची सवय लावा

मुलांना त्यांच्या शैक्षणिक अभ्यासाव्यतिरिक्त इतर पुस्तक वाचायला पण प्रोत्साहन द्या. ज्यामुळे मुलांचे ज्ञान वाढणार  नाही तर त्यांची कल्पना शक्ती आणि क्रिएटिव्हिटीपण वाढेल. मुलांना पुस्तक वाचण्याची सवय लावण्यासाठी तुम्ही झोपताना त्यांना गोष्टी ऐकवू शकतात. ज्यामुळे त्यांचा इन्टरेस्ट वाढेल आणि मुलं स्वत: पुस्तकं वाचू लागतील.

२) सकारात्मक राहण्यास प्रोत्साहन द्या

सकारात्मकता एक असा गुण आहे जो कठीण परिस्थितीत धैर्य ठेवण्यास आणि समस्यांचे समाधान शोधण्यास मदत करतो.  मुलांमध्ये हा गुण विकसित करण्यासाठी त्यांना प्रत्येक स्थितीत सकारात्मक विचार करण्याची शिकवण द्या.  सकारात्मक विचार मानसिक आरोग्यासाठी चांगले असतात. मुलांमध्ये आत्मविश्वास वाढतो.

प्रेग्नंसीनंतर शरीर सुटलं-PCOD त्रास; महिलेनं ३ महिन्यात १५ किलो घटवलं, पाहा कसं वजन घटवलं

३) चांगल्या सवयी लावा

शारीरिक आणि मानसिक विकासासाठी मुलांना चांगल्या सवयी लावा. स्वत:ला नेहमी स्वच्छ ठेवा. वेळेवर खाणं, पिणं ठेवा, रोज अभ्यास करणं, हेल्दी खाण्यापिण्याच्या सवयी मुलांसाठी फार आवश्यक असतात. 

४) व्यायाम आणि खेळणं

मुलांचे शारीरिक मानसिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी खेळणं आणि व्यायाम करणं फार महत्वाचे आहे. आपल्या मुलांना घराच्या बाहेर खेळण्यासाठी प्रोत्साहन द्या. सायकलिंग, स्विमिंग यांसारखे व्यायाम त्यांच्याकडून करून घ्या. ज्यामुळे मुलं फिजिकली एक्टिव्ह राहतील. 

शरीर कमजोर झालंय-थकवा येतो? B-12 कमतरता भरून काढतील ५ पदार्थ, रोज खा-फिट राहाल

५) प्रश्न विचारण्यासाठी प्रोत्साहन द्या

मुलं जिज्ञासू वृत्तीची असतात आणि सतत प्रश्न विचारणं त्यांना आवडतं. आई वडील मुलांमुळे अनेकदा वैतागू शकतात. मुलांना जास्त प्रश्न विचारल्यानंतर त्यांना उत्तर देण्यासाठी प्रोत्साहित करा. ज्यामुळे जिज्ञासू वृत्ती टिकून राहील आणि कोणत्याही विषयाबाबत ते जास्त समजू शकतील आणि मुलांच्या ज्ञानात भर पडेल.

Web Title: Five Tips To Make Your Child Smart And Intelligent Tips For Raising Smart Kids

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.