पाल्यांना आकार देण्याचं काम पालकांचे असते. पालकांच्या देखरेखीत मुलांची वाढ होते. जन्मापासून ते मुलांचे करिअर घडण्यापर्यंत पालक मुलांच्या पाठीशी उभे असतात. यामुळे मुलांचे योग्य विकास होते. बरेचसे पालक आपल्या मुलांच्या उत्तम विकासासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करतात आणि त्यांचे भविष्य घडविण्यासाठी कठोर परिश्रम घेतात. पण बऱ्याचदा नकळत घडणाऱ्या चुकांमुळे मुलांच्या संगोपनावर नकारात्मक परिणाम होतो. ज्यामुळे मुलांचा आत्मविश्वास कमी होतो, व त्यांना ध्येयापर्यंत पोहचण्यात अडचण निर्माण होते (Parenting Tips).
पाल्यांच्या करिअर ग्रोथसाठी पालकांनी नेमक्या कोणत्या चुका टाळायला हव्या, याची माहिती अध्यात्मिक गुरु गौर गोपाल दास (Gaur Gopal Das) यांनी दिली आहे(Follow These 4 Parenting Tips By Spiritual Speaker Gaur Gopal Das).
पॅरेण्टिंगदरम्यान पालकांनी कोणत्या चुका टाळायला हव्या
मुलांचे दृष्टीकोन समजून घ्या
बऱ्याचदा आपण टेक्निकली बरोबर असतो. पण आपले मुल जर प्रॅक्टिकली विचार करत असेल तर, त्याची बाजू समजून घ्या. जर आपले मुल आउट ऑफ द बॉक्स विचार करीत असेल तर, त्याला विचार करू द्या, अडवू नका. मुलांच्या दृष्टीकोनातून त्यांची बाजू समजून घ्या.
पझेसिव्ह होणं कमी करा
मुलांसाठी पालकांनी जास्त पझेसिव्ह होणं चांगले नाही. मुलांच्या प्रायव्हेट आयुष्यात वारंवार ढवळाढवळ करणे देखील चुकीचे आहे. यासह प्रत्येक गोष्टीचे ज्ञान देणे टाळायला हवे. आपल्या मुलांना स्पेस द्या. पण त्यांच्यावर तितकेच लक्ष ठेवा. शिवाय मुलं अडचणीत अडकल्यास त्यांना यातून बाहेर पडण्यासाठी जास्त मदत करू नका.
बाबाही बनेल मुलांचा जीवाभावाचा दोस्त! करा स्वत:त ४ सोपे बदल-बापलेकरांचं नातं होईल घट्ट
जास्त प्रॉटेक्टिव्ह बनू नका
बरेच पालक आपल्या मुलांना त्यांच्या समस्या स्वतः सोडवू देत नाही. त्यांना इतकं प्रॉटेक्ट करतात, की त्यांच्या लहान समस्या देखील स्वतःवर घेतात. असे केल्याने मुले त्यांच्या समस्या स्वतः सोडवायला शिकत नाहीत. अशा मुलांचा आत्मविश्वास कमी होतो आणि आयुष्यातील महत्त्वाचे किंवा छोटे निर्णयही ते स्वतः घेऊ शकत नाहीत.
पालकांनो, तुमच्या चुकांमुळे मुलांचा होतो कॉन्फिडन्स कमी, ३ टिप्स; आत्मविश्वास वाढवायचा तर...
निर्णय घेऊ न देणे
मुलांना त्यांच्या आयुष्यातील निर्णय स्वतः घेऊ द्या. मुलांना आपण सल्ले देऊ शकता, पण आपला निर्णय त्यांच्यावर लादू नका. सुरुवातीचे निर्णय चुकतील. पण चुकीमधूनच माणूस शिकतो. भविष्यत चुकीच्या निर्णयांमधून शिकून योग्य निर्णय घेऊन पुढे जातील.