Lokmat Sakhi >Parenting > Hand Foot and Mouth Symptoms : पावासाळ्यात मुलं तापानं फणफणली, अंगावर पुरळ? मंकीपॉक्स म्हणून घाबरू नका, वाचा डॉक्टरांचा सल्ला....

Hand Foot and Mouth Symptoms : पावासाळ्यात मुलं तापानं फणफणली, अंगावर पुरळ? मंकीपॉक्स म्हणून घाबरू नका, वाचा डॉक्टरांचा सल्ला....

Hand Foot and Mouth Symptoms : चुकीच्या दिशेनं उपचार सुरू करण्याआधी कोणत्याही प्रकारची लक्षण उद्भवल्यानंतर डॉक्टरांचा सल्ला घ्यायलाच हवा.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2022 04:02 PM2022-08-03T16:02:09+5:302022-08-03T17:04:48+5:30

Hand Foot and Mouth Symptoms : चुकीच्या दिशेनं उपचार सुरू करण्याआधी कोणत्याही प्रकारची लक्षण उद्भवल्यानंतर डॉक्टरांचा सल्ला घ्यायलाच हवा.

Hand Foot and Mouth Symptoms : hand foot and mouth precautions hand foot and mouth disease vs monkeypox | Hand Foot and Mouth Symptoms : पावासाळ्यात मुलं तापानं फणफणली, अंगावर पुरळ? मंकीपॉक्स म्हणून घाबरू नका, वाचा डॉक्टरांचा सल्ला....

Hand Foot and Mouth Symptoms : पावासाळ्यात मुलं तापानं फणफणली, अंगावर पुरळ? मंकीपॉक्स म्हणून घाबरू नका, वाचा डॉक्टरांचा सल्ला....

पावसाळ्याच्या वातावरणात लहानांसह मोठ्यांमध्ये आजार पसरण्याचं प्रमाण वाढतं. सर्दी, ताप, खोकल्यासह इतर स्किन इन्फेशिअल आजारांचीही लागण मुलांना होत आहे. मुलांना स्किन इन्फेक्शन उद्भवल्यास त्याचा प्रकार आणि कारणं माहित नसल्यानं पालक संभ्रमात पडत आहे. सध्या हॅण्ड, फूट अँड माऊथ या रोगाची साथ परसत आहे. (Health tips)  मुलांना होणारं हे इन्फेक्शन मंकीपॉक्स किंवा चिकनपॉक्स तर नाहीना असा प्रश्न पालकांना पडतोय. चुकीच्या दिशेनं उपचार सुरू करण्याआधी कोणत्याही प्रकारची लक्षण उद्भवल्यानंतर डॉक्टरांचा सल्ला घ्यायलाच हवा. डॉ. परिक्षित शेवडे यांनी लोकमत सखीला याबाबत अधिक माहिती दिली आहे. (Hand foot and mouth precautions)

लहान मुलांमध्ये उद्भवणारा हा प्रकार काय आहे? 

डॉ. परिक्षित सांगतात की, या केसेस मंकीपॉक्सच्या नसून ही हॅण्ड, फूट अँड माऊथ नामक रोगाची साथ आहे. या रोगात लहान मुलांत हाता-पायांवर पुरळ, ताप आणि ताप गेल्यावर तोंडात वेदनादायक असलेले फोड अशी लक्षणं असतात. लहानमुलांमध्ये पेन टॉलरंस कमी असल्यानं त्यांना हा त्रास जास्त होऊ शकतो. बहुतेक वेळेस केवळ लाक्षणिक उपाय पुरेसे असतात. वेळेत आयुर्वेदीय उपचार घेतल्यास तोंडात येणारे फोड सहज टाळता येतात. भारतात आढळलेली मंकीपॉक्सची लक्षणं अन्य देशांच्या तुलनेत खूपच सौम्य आहेत. 

हॅण्ड, फूट अँड माऊथ इन्फेक्शन उद्भवल्यास काय काळजी घ्यायची

१) हा व्हायरल आजार असून लक्षणं दिसताच मुलांना शाळेत पाठवणे थांबवावे आणि तातडीने आपल्या वैद्यांचा सल्ला घ्यावा. शक्यतो आपल्या पाल्याला दवाखान्यात तपासणीसाठी न नेता लक्षणे आणि मोबाईलवर फोटो घेऊन जाण्यास प्राधान्य द्यावे. घरात एकाहून अधिक मुले असल्यास ज्याला लक्षणे आहेत त्याला अन्य मुलांपासून काही दिवस लांब ठेवणे. साथ ओसरेपर्यंत शाळेत डब्याची वाटावाटी न करण्याबाबत आपल्या मुलांना समजावणे.

२) लक्षणे असता (पण ताप नसताना) अंघोळीच्या पाण्यात कडुनिंबाची पाने घालणे, एरवीही सध्या घरात नियमित धूपन करणे आणि त्यात कडुनिंब घालणे. आपले पालकांचे WhatsApp Group वा अन्य माध्यमांत ही माहिती पोहचवून जागरूकता निर्माण करणे. जेणेकरून अनाठायी भीती निर्माण न होता सजगपणे योग्य ती काळजी घेतली जावी. 

Web Title: Hand Foot and Mouth Symptoms : hand foot and mouth precautions hand foot and mouth disease vs monkeypox

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.