'दमलेल्या बाबाची कहाणी' प्रत्येक जण जाणतो (Parenting Tips). बाबा दिवसरात्र एक करून घरासाठी झटत असतो. घरातील सदस्यांना २ वेळचं जेवण मिळावे यासाठी मेहनत घेत असतो. अधिकतर घरात आपण पाहिलं असेल की, आई आणि मुलाचं बॉण्डिंग बाबासोबत असलेल्या बॉण्डिंगपेक्षा वेगळे असते. आई अधिक वेळ आपल्या पाल्यांसोबत असते, पण वडील कामानिमित्त दिवसभर घराबाहेर असतो. ज्यामुळे बहुतांश वेळी मुलं वडिलांना किंवा वडील आपल्या मुलांची बाजू व्यवस्थित समजून घेत नाही (Father's Bond).
वडील आणि मुलांमध्ये असलेलं बॉण्ड अधिक घट्ट व्हावे असे वाटत असेल तर, वडील म्हणून स्वतःमध्ये ४ बदल करा. यामुळे तुमच्यातील बॉण्ड अधिक घट्ट होईल शिवाय फुलेल(How can a father become a good friend of his children).
मुलांसाठी वेळ काढा
मेडिसिननेट या वेबसाईटनुसार, 'जर आपल्याला सपोर्टिव्ह वडील बनायचं असेल तर, मुलांसाठी खास वेळ काढा. आपण आठवड्यातील ६ दिवस कामात व्यग्र असतो. त्यामुळे मुलांना हवा तो वेळ देता येत नाही. त्यामुळे जसं वेळ मिळेल, तसं त्यांच्यासोबत खेळा, गप्पा गोष्टी करा, मार्गदर्शन द्या, काही चांगले क्षण तयार करा.
अफेअर्स-लग्न-घटस्फोट आणि मुलाची कस्टडी, बिग बॉसचा हिरो ठरलेल्या मुनव्वरच्या आयुष्याची चित्तरकथाच..
मुलांसमोर आईचा आदर करा
मुलं आपल्या पालकांकडून शिकतात. त्यांना फॉलो करतात. त्यामुळे मुलांसमोर नेहमी सगळ्यांचा आदर करा. विशेष म्हणजे, आईचा आदर करा. तुमच्या बायकोला प्रत्येक कामात मदत करा. त्यांची काळजी घ्या. यामुळे मुलांच्या विचारसरणीवर परिणाम होतो. या गोष्टी पाहून मुलं तुम्हाला आदर्श मानू लागतील.
पुस्तकांची गोडी लावा
मुलांना रोज काही चांगल्या गोष्टी वाचून दाखवा. त्यांना विविध पुस्तक वाचण्याची गोडी लावा. लहानपणापासूनच मुलांना पुस्तक वाचण्याची गोडी लावल्याने, ते अभ्यासातही हुशार होतील.
एकत्र जेवायला बसा
बऱ्याच पालकांना मुलांसोबत जेवण करायला वेळ मिळत नाही. यामुळे पालक मुलांना किंवा मुलं पालकांना नीट समजून घेत नाही. त्यामुळे जेवताना एकत्र बसा. यामुळे मुलं पालकांसोबत विवीध गोष्टी शेअर करतील. शिवाय बॉण्ड देखील घट्ट होईल.