Join us  

घरात अखंड बडबड पण चारचौघांत मुलं तोंड उघडत नाहीत? 3 गोष्टी- आत्मविश्वासाने बोलतील-स्मार्ट होतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2024 9:17 AM

How can we improve child's confidence parenting tips : पालकांनी लहानपणापासून काही गोष्टी त्यांच्याशी वागताना लक्षात ठेवल्या तर भविष्यात मुलांना त्याचा नक्कीच फायदा होतो.

मुलं घरात खूप बोलतात, अखंड गाणी-गोष्टी सांगतात. पण चारचौघात अजिबात तोंड उघडत नाहीत. समोर जाऊन काही कर म्हटलं की घाबरतात, लाजतात. अशावेळी पालक म्हणून आपला जीव वरखाली होत असतो. घरात चुरूचुरू बोलणारं मूल बाहेर मात्र असा भित्रेपणा करत असेल की आपल्याला नकळत त्यांचा थोडा रागही येतो. पण आत्मविश्वास नसल्याने मुलांना असं होतं. लोकांसमोर बोलायला ते बुजतात, घाबरतात. जे अगदीच स्वाभाविक आहे.  पालकांनी लहानपणापासून काही गोष्टी त्यांच्याशी वागताना लक्षात ठेवल्या तर भविष्यात मुलांना त्याचा नक्कीच फायदा होतो (How can we improve child's confidence parenting tips). 

आपली मुलं सगळ्याच गोष्टींबाबत ठिकाणांवर कॉन्फीडन्ट नसतात. तर काही ठराविक ठिकाणी आणि ठराविक लोकांसमोर, परिस्थितीतच ती कॉन्फीडन्ट असतात. जिथे स्पर्धा आहे असं मुलांना वाटत नाही तिथेच ते स्वाभाविक कम्फर्टेबल असतात आणि मग त्यांचा कॉन्फीडन्स त्याठिकाणी वाढतो. आपण मुलांना कम्फर्टेबल वाटेल अशी कोणती परिस्थिती आहे, गोष्टी आहेत हे शोधून काढून मुलांमधील या क्षमता शोधून काढायला हव्यात. आता हे कसं करायचं असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्यासाठी ३ महत्त्वाच्या गोष्टी करायला हव्यात. 

१. आव्हाने द्या

मुलं सहज करु शकतील अशा आव्हानात्मक गोष्टी किंवा टास्क त्यांना द्यायचे. एकदा त्यांना हे सोपे टास्क जमायला लागले की त्यांना आपल्या क्षमतांचा अंदाज येईल. मग नकळत त्यांचा आत्मविश्वास वाढायला याची चांगली मदत होईल. 

२. कौतुक करा 

प्रत्येक टप्प्यावर मूल काही प्रगती करत असेल तर त्याला प्रोत्साहन देऊन त्याचे त्या बाबतीत कौतुक करायला हवे. मूल आधीपेक्षा आता जास्त चांगले करत आहे हे त्याला सांगा आणि सकारात्मक प्रतिक्रिया द्या. यामुळे मुलांची कौशल्ये, क्षमता वाढण्यास नक्कीच मदत होईल. 

३. स्वत:शी सकारात्मक बोलायला शिकवा

मुलांना स्वत:शी स्वत:विषयी सकारात्मक बोलायला शिकवा. मी अमुक गोष्ट करु शकते किंवा करु शकतो असं मुलांना स्वत:शी बोलायला लावा. याचा मुलांच्या मानसिकतेवर चांगला परीणाम होतो आणि मुलं नकळत त्यांच्यामध्ये असलेल्या क्षमतांचा विकास करतात. 

 

टॅग्स :पालकत्वलहान मुलं