Join us  

मुलींना घरात कोंडून घालण्यापेक्षा आईबाबांनी त्यांना शिकवायला हव्या ५ गोष्टी; मुलगी होईल खंबीर..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2024 5:10 PM

How do I interact with a ten year old girl? : १० व्या वर्षानंतर मुलींना पालकांनी शिकवाव्यात 'या' ५ गोष्टी..

आई - वडील (Parents) आपल्या मुलांना तळहाताच्या फोडाप्रमाणे जपतात (Parenting Tips). त्यांची काळजी घेतात. जस जसं त्याचं वय वाढतं, त्याप्रमाणे पालक त्यांच्या पालकत्वामध्ये बदल आणतात. पालक मुलींचं वय वाढल्यावर त्यांना मानसिक, भावनिक आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्याचा प्रयत्न करतात (Girl Child). शिवाय स्वतःच सरंक्षण कसं करायचं? याचेही धडे देतात.

साधारण १० वर्षांची मुलगी झाली की तिला अनेक गोष्टी कळू लागतात. त्यामुळे तिच्या वैयक्तिक आयुष्यासाठी काही गोष्टींची समज आणि शिकवण देणे हे पालकांचे आद्यकर्तव्य आहे. १० वर्षाच्या मुली झाल्यानंतर पालकांनी कोणत्या गोष्टी शिकवाव्यात? या टिप्स मुलींना नक्कीच उपयुक्त ठरतील(How do I interact with a ten year old girl?).

योग्य अयोग्याची शिकवण द्या

१० वर्षांच्या मुलांना योग्य अयोग्याची जाण नसते. त्यामुळे पालकांनी मुलांना करिअर किंवा वैयक्तिक आयुष्याबद्दल काही टिप्स द्यायला हवे. काय चूक काय बरोबर यातला फरक शिकवायला हवं. जेणेकरून मुली काय योग्य काय अयोग्य यातला फरक समजू शकेल.

चपाती खाऊन वजन वाढतं? 'या' पिठाच्या चपात्या खा; वेट लॉस होईल - भुकेवरही राहील कंट्रोल

फोन नंबर - पत्ता लक्षात ठेवा

जेव्हा मुलगी १० वर्षांची होईल, तेव्हा तिला मोबाईल फोन नंबर आणि घरचा पत्ता नक्कीच लक्षात ठेवायला सांगा. जेणेकरुन कोणतीही आपत्कालीन परिस्थिती आली तर, तिला कोणत्याही प्रकारच्या समस्येचा सामना करावा लागणार नाही. शिवाय चारचौघात इतरांशी कसे बोलायचे हे शिकवा.

योग्य अयोग्याची शिकवण द्या

मुलांना कोणावर विश्वास ठेवावे, कोणावर नाही याची शिकवण द्या. कारण विश्वास ही खूप मोठी गोष्ट आहे. गोड बोलून कोण आपलं घात करू शकते, याची माहिती द्या.

चांगले शिक्षण द्या

मुलींना शिक्षणाचे महत्व सांगा. जेणेकरून मुली त्यांचं ध्येय साध्य करू शकतील.

मॉर्निंग वॉक करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात? शारीरिक - मानसिक तणाव कमी करण्यासाठी..

खबरदारी घ्यायला शिकवा

मुलीला सुरक्षा नियम आणि खबरदारीबद्दल सांगा. याशिवाय आरोग्य आणि पोषणाचे महत्त्वही त्यांना सांगा. आरोग्याला कसे जपावे याबद्दल सांगा. 

टॅग्स :पालकत्वसोशल व्हायरल