Lokmat Sakhi >Parenting > लहान बाळांना एकावेळी किती जेवण भरवावं? काय खायला द्यावं? बाळाला बळजबरी खाऊ घालाल तर..

लहान बाळांना एकावेळी किती जेवण भरवावं? काय खायला द्यावं? बाळाला बळजबरी खाऊ घालाल तर..

How much toddler need to eat diet tips from expert : १ ते ३ वर्षे वयोगटातील मुलांचा आहार साधारणपणे कसा असावा याबाबत...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2024 04:06 PM2024-01-25T16:06:58+5:302024-01-25T16:07:59+5:30

How much toddler need to eat diet tips from expert : १ ते ३ वर्षे वयोगटातील मुलांचा आहार साधारणपणे कसा असावा याबाबत...

How much toddler need to eat diet tips from expert : How many meals should be fed to small babies at a time? What to feed? If you force feed the baby... | लहान बाळांना एकावेळी किती जेवण भरवावं? काय खायला द्यावं? बाळाला बळजबरी खाऊ घालाल तर..

लहान बाळांना एकावेळी किती जेवण भरवावं? काय खायला द्यावं? बाळाला बळजबरी खाऊ घालाल तर..

घरात लहान मुलांचा जन्म झाला की त्याच्या झोपेच्या वेळा, आंघोळ, कपडे यांबरोबरच आणखी एक महत्त्वाचा विषय असतो तो म्हणजे बाळाचा आहार. पहिले ६ महिने साधारणपणे बाळ दुधावर असल्याने आहाराबाबत आपल्याला फारशी काळजी करावी लागत नाही. पण जसे बाळ मोठे होत जाते तशी त्याची भूक वाढत जाते. दात यायला लागतात आणि शारीरिक हालचाली वाढत असल्याने बाळाला आपण वरचा आहार सुरू करतो. सुरुवातीला पेज किंवा द्रव पदार्थ, त्यानंतर मऊ, हलके सहज पचू शकतील असे पदार्थ असं शक्य तितकं पौष्टीक आपण बाळांना देण्याचा प्रयत्न करतो. पण बाळाची भूक भागतीये की नाही, त्याला नेमका किती आणि काय प्रकारचा आहार गरजेचा आहे याकडे बारकाईने लक्ष देणे गरजेचे असते. १ ते ३ वर्षे वयोगटातील मुलांचा आहार साधारणपणे कसा असावा याबाबत लहान मुलांच्या आहारतज्ज्ञ असलेल्या तान्या मेहरा काही महत्त्वाच्या टिप्स देतात त्या कोणत्या पाहूया (How much toddler need to eat diet tips from expert)...

१. प्रथिने 

प्रथिने हा व्यक्तीच्या आहारातील अतिशय महत्त्वाचा घटक असून दिवसातील २ ते ३ खाण्यांमध्ये तरी आवर्जून प्रथिनांचा समावेश असायला हवा. यामध्ये अर्धे अंडे, २ चमचे शिजवलेली डाळ, पनीर, टोफू किंवा १ चमचा दाण्याचा कूट किंवा पिनट बटर यांपैकी एका पदार्थाचा समावेश अवश्य असायला हवा. 

(Image : Google)
(Image : Google)

२. फळं 

दिवसभरात मुलांना २ ते ३ वेळा फळं आवर्जून द्यायला हवीत. यामध्ये पाव ते अर्धे फळ, १ चमचा फळाची प्युरी किंवा २ ते ४ चमचे फ्रूट ज्यूस यापैकी काही ना काही अवश्य द्यायला हवे. 

३. भाज्या 

मुलांच्या वयानुसार त्यांना भाज्या द्यायला हव्यात. दिवसभरात २ ते ३ वेळा त्यांच्या पोटात वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या जातील याची काळजी घ्यायला हवी. मूल १ वर्षाचे असेल तर १ चमचा भाजी, २ वर्षाचे असेल तर २ चमचे भाजी आणि ३ वर्षाचे असेल तर ३ चमचे भाजी द्यायला हवी. 

४. दूध आणि दुग्धजन्य उत्पादने 

दूध आणि दुग्धजन्य उत्पादनांमध्ये कॅल्शियम, प्रथिने चांगल्या प्रमाणात असल्याने मुलांच्या आहारात या पदार्थांचा आवर्जून समावेश करायला हवा. यामध्ये अर्धा कप दूध, अर्धा कप दही, अर्धा कप पनीर आणि १५ ते २० ग्रॅम चीज या गोष्टींचा समावेश असायला हवा. 

५. कार्बोहायड्रेटस

हा आपल्या आहारातील महत्त्वाचा भाग असून दिवसातून ६ वेळा मुलांच्या आहारात कार्बोहायड्रेटस असतील असे पाहावे. यात अर्धी पोळी, पराठा, पुरी, ब्रेड, डोसा तसेच २ चमचे तांदळाचा भात, तृणधान्ये, बटाटा यांपैकी कशाचा समावेश अवश्य असायला हवा. 

६. फॅटस

फॅटस म्हणजेच स्निग्ध पदार्थ हेही आपल्या आहारातील महत्त्वाचे असून १ चमचा तूप, बटर, तेल, मलाई किंवा क्रिम , नटस असे काही ना काही आहारात जरुर असायला हवे. 
 

Web Title: How much toddler need to eat diet tips from expert : How many meals should be fed to small babies at a time? What to feed? If you force feed the baby...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.